RCB VS MI: इंडियन प्रीमियर लीग २०२५ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ने मुंबई इंडियन्स विरुद्ध वानखेडे स्टेडियमवर एक ऐतिहासिक विजय मिळवला. हा सामना ७ एप्रिल २०२५ रोजी झाला आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने १२ धावांनी विजय मिळवत मुंबईच्या घरच्या मैदानावर एक संस्मरणीय कामगिरी केली. वानखेडे स्टेडियमवर मुंबईविरुद्ध विजय मिळवणे हे नेहमीच आव्हानात्मक मानले जाते. या सामन्याचे महत्त्व केवळ विजयापुरते मर्यादित नव्हते, तर रॉयल चॅलेंजर्स बंगलोरच्या संघाने दाखवलेल्या संयम, रणनीती आणि सामूहिक प्रयत्नांमुळे हा विजय खास ठरला.
RCB VS MI: विराट आणि पाटीदार ची अर्धशतके, मुंबई समोर २२१ धावांचे आवाहन
RCB VS MI सामन्याची सुरुवात मुंबई इंडियन्सच्या कर्णधार हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी निवड करून केली. रॉयल चॅलेंजर्स बंगलोरच्या फलंदाजांनी या निर्णयाला आव्हान देत २० षटकांत २२१/५ अशी धावसंख्या उभारली. RCB VS MI सामन्याच्या दुसऱ्याच चेंडूवर ला धक्का बसला, फील सॉल्ट ४ धावांवर बाद झाला. त्यांनतर विराट ने देवदत्त पडिकलच्या बरोबरीने डाव सावरला.
विराट कोहली ६७ (४२) आणि कर्णधार रजत पाटीदार ६४ (३२) यांनी अर्धशतके झळकावली, ज्यामुळे संघाला मजबूत पायावर उभे राहता आले. कोहलीने आपल्या अनुभवाचा पुरेपूर फायदा घेत संयमी खेळी करताना आकर्षक फटके खेळले, तर पाटीदारने आक्रमक फलंदाजी करत मुंबईच्या गोलंदाजांवर दबाव टाकला. या दोघांच्या भागीदारीने रॉयल चॅलेंजर्स बंगलोरला मोठी धावसंख्या उभारण्यात यश मिळाले. याशिवाय, लियाम लिव्हिंगस्टोन आणि देवदत्त पडिकल यांनीही छोट्या पण महत्त्वपूर्ण खेळी खेळून योगदान दिले.
RCB VS MI: मुंबईची झुंज अपयशी
रोहितने आक्रमक सुरुवात केली पण तोव लवकरच बाद झाला. त्या नंतर आलेले रिकल्टन, जॅक्स आणि सूर्यकुमार हे ठराविक अंतराने बाद झाले. एक वेळ अशी आली होती कि मुंबई खूप मोठ्या अंतराने पराभूत होणार , परंतु तिलक वर्मा आणि हार्दिक पंड्या ने मुंबईचा डाव सावरला. मुंबईकडून तिलक वर्मा ५६(२९) आणि हार्दिक पांड्या ४२ (१५) यांनी चांगली फलंदाजी केली, पण RCB च्या गोलंदाजांनी शेवटच्या षटकांत अप्रतिम कामगिरी करत विजय खेचून आणला.
जोश हॅझलवूड आणि क्रुणाल पांड्या यांनी अखेरच्या टप्प्यात महत्त्वपूर्ण बळी घेत मुंबईला रोखले. हॅझलवूडने हार्दिक पांड्याला बाद करत मुंबईच्या आशा मावळवल्या, तर क्रुणालने आपल्या फिरकीने सेंटनर आणि चहर यांना बाद करत सामन्याला कलाटणी दिली. भुवनेश्वर कुमारनेही तिलक वर्माला बाद करत मुंबईवर दबाव वाढवला होता. प्रत्युत्तरात, मुंबई इंडियन्सने २०९/८ अशी धावसंख्या गाठली, परंतु ते धावांचा पाठलाग करण्यात अपयशी ठरले.
वानखेडेवर रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा ऐतिहासिक विजय
वानखेडे स्टेडियमवर RCB चा हा विजय ऐतिहासिक ठरला, कारण मुंबईने या मैदानावर रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध ११ पैकी ८ सामने जिंकले होते. २०१५ नंतर रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ला येथे विजय मिळाला नव्हता, आणि त्यानंतर सहा पराभव पत्करावे लागले होते. या विजयाने रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने आपला हा दुष्टचक्र मोडला आणि संघाच्या आत्मविश्वासाला नवी उभारी मिळाली. हा सामना IPL २०२५ मधील २० वा सामना होता आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने यासह चार सामन्यांत तिसरा विजय मिळवला, ज्यामुळे ते गुणतालिकेत मजबूत स्थितीत पोहोचले.
या विजयाचे श्रेय रॉयल चॅलेंजर्स बंगलोरच्या सर्वांगीण कामगिरीला जाते. फलंदाजीतील सातत्य, गोलंदाजीतील शिस्त आणि क्षेत्ररक्षणातील चपळाई यामुळे हा विजय शक्य झाला. चाहत्यांसाठी हा सामना एक उत्सव ठरला, कारण त्यांचा संघ कित्येक वर्षांपासून वानखेडेवर विजयासाठी झगडत होता. या विजयाने रॉयल चॅलेंजर्स बंगलोरच्या “ई साला कप नमदे” या स्वप्नाला नवे बळ मिळाले आणि पुढील सामन्यांसाठी संघाला प्रेरणा मिळाली.
SEE RANSLATION
RCB vs MI: Royal Challengers Bangalore Score Historic Win Over Mumbai Indians in IPL 2025
In the Indian Premier League 2025, Royal Challengers Bangalore secured a historic win against Mumbai Indians at the Wankhede Stadium. The match took place on April 7, 2025, and Royal Challengers Bangalore emerged victorious by 12 runs, achieving a memorable triumph on Mumbai’s home ground. Winning against Mumbai at the Wankhede has always been considered a tough task. This win was not just about the result it was made special by Royal Challengers Bangalore’s patience, strategy, and collective team effort.
RCB vs MI: Fifties by Virat and Patidar, RCB Set a Target of 221 Runs
The RCB vs MI match began with Mumbai Indians’ captain Hardik Pandya winning the toss and electing to bowl first. However, Royal Challengers Bangalore’s batters challenged that decision by posting a strong total of 221/5 in 20 overs. Royal Challengers Bangalore faced an early blow on just the second ball when Phil Salt got out for 4 runs. Virat Kohli and Devdatt Padikkal then steadied the innings.
Virat Kohli scored 67 off 42 balls, and captain Rajat Patidar hammered 64 off just 32 balls, both registering fifties that provided a solid foundation for Royal Challengers Bangalore. Kohli played a composed yet stylish innings using all his experience, while Patidar went on the attack, putting pressure on MI’s bowlers. Their partnership helped Royal Challengers Bangalore build a big total. Liam Livingstone and Devdatt Padikkal also made small but crucial contributions.
RCB vs MI: Mumbai’s Fightback Falls Short
Rohit Sharma gave MI a blazing start but got out early. The following batters—Rickelton, Jack, and Surya Kumar—fell at regular intervals. At one stage, it seemed like MI would suffer a heavy defeat, but Tilak Varma and Hardik Pandya brought some stability back to the innings. Tilak Varma scored 56 off 29, while Hardik added 42 off just 15 balls. Despite their efforts, Royal Challengers Bangalore’s bowlers delivered an excellent performance in the final overs to clinch the win.
Josh Hazlewood and Krunal Pandya took crucial wickets in the death overs, halting MI’s momentum. Hazlewood dismissed Hardik Pandya, dashing Mumbai’s hopes, while Krunal’s spin sent back Santner and Chahar, turning the game in Royal Challengers Bangalore’s favor. Bhuvneshwar Kumar also took Tilak Varma’s wicket, adding pressure. In response, MI reached 209/8 but fell short in their chase.
A Historic Victory for RCB at Wankhede
This win for Royal Challengers Bangalore at the Wankhede was historic because Mumbai had won 8 of the last 11 matches played here against them. Royal Challengers Bangalore hadn’t won at this venue since 2015 and had suffered six straight losses here since then. This victory broke that streak and gave the team a fresh surge of confidence. This was the 20th match of IPL 2025, and with this win, Royal Challengers Bangalore secured their third victory in four matches, placing them in a strong position on the points table.
The credit for this win goes to Royal Challengers Bangalore’s all-round performance—consistent batting, disciplined bowling, and agile fielding made it possible. For the fans, it was a celebration, as their team had been struggling to win at Wankhede for years. This victory gave renewed energy to Royal Challengers Bangalore’s dream of “Ee Saala Cup Namde” (This year, the cup is ours), and inspired them for the matches ahead.