LSG VS KKR: ईडन गार्डन वर लखनऊ नवाब, कोलकातावर 4 धावांनी विजय

LSG VS KKR : आज ८ एप्रिल २०२५ रोजी आयपीएल २०२५ मधील २१ वा सामना कोकलत नाईट रायडर्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात ईडन गार्डन्स कोलकाता येथे खेळाला गेला. दोन्ही संघांनी यापूर्वी  दोन दोन विजय मिळवलेले होते. दोन्ही संघांना या हंगामातील आपला तिसरा विजय मिळवण्याची प्रतीक्षा होती. मात्र या लढाईत LSG ने KKR ला हरवून बाजी मारली.

lsg vs kkr

LSG VS KKR: मिचेल मार्श , निकोलस पूरण ची झंझावती अर्धशतके

कोलकात्याचा कर्णधार अजिंक्य रहाणेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. लखनऊचे सलामीवीर मारक्रम आणि मार्श यांनी सुरुवातीला सावध खेळी केली. त्यानंतर त्यांनी खेळाचा वेग वाढवत तुफानी फटकेबाजी केली व पॉवरप्ले मध्ये लखनऊ संघाला मजबूत स्थितीत पोहचवले. मारक्रमला हर्षित राणाने बाद केले. मारक्रमने २८ चेंडूत ४ चौकार व २ षटकारांच्या मदतीने ४८ धावा काढल्या.

मारक्रम बाद झाल्यानंतर खेळपट्टीवर मिचेल मार्शची साथ द्यायला निकोलस पूरण आला. या दोघांनी अतिशय तुफानी फटकेबाजी केली . मिचेल मार्शने ४८ चेंडूत ६ चौकार व ५ षटकार मारत ८१ धावा काढल्या. दुसऱ्या बाजूने निकोलस पूरणने सुद्धा अतिशय झंझावाती फलंदाजी केली. त्याने आंद्रे रसेलच्या षटकात २४ धावा काढल्या. त्याने ३६ चेंडूत तब्बल ८ षटकार आणि ७ चौकार मारत एकूण ८७ धावा काढल्या.

कोलकात्याच्या गोलंदाजीची लखनऊच्या फलंदाजांनी पिसे काढली. आज संघात समाविष्ट झालेला कोलकात्याचा गोलंदाज स्पेन्सर जॉन्सन सगळ्यात महागडा गोलंदाज ठरला. त्याच्या तीन षटकांमध्ये लखनऊच्या फलंदाजांनी ४६ धावा कुटल्या. मिचेल मार्श आणि निकोलस पूरण यांच्या झंझावाती अर्धशतकांच्या जोरावर लखनऊ ने कोलकात्या समोर २३८ धावांचे विशाल लक्ष्य ठेवले.

LSG VS KKR : कोलकाताचा अयशस्वी पाठलाग

२३९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना कोलकाताच्या डावाची सुरुवात सलामीवीर सुनील नारायण आणि क्विंटन डिकॉक यांनी केली. कोलकाताला सुरवातीलाच डिकॉक च्या रूपाने धक्का बसला. तो १५ धावांवर असताना आकाशदीप च्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यांनतर आलेल्या कर्णधार अजिंक्य रहाणेने डाव सावरला. सुनील नारायण आणि अजिंक्यने १५ च्या गतीने ६ षटकांमध्ये कोलकाताची धावसंख्या ९० वर पोहचवली.

सुनील नारायणाच्या रूपाने कोलकाताला दुसरा धक्का बसला. सुनील नारायण १२ चेंडूत ४ चौकार व २ षटकारांच्या मदतीने ३० धावा बनवून झेलबाद झाला. १३ व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर अजिंक्य रहाणे बाद झाला. त्याने ३५ चेंडूत ८ चौकार व २ षटकार मारत ६१ धावा बनवल्या. अजिंक्य रहाणे बाद झाल्यानंतर कोलकाताचा डाव गडगडला. कोलकाताची मधली फळी सपशेल नाकाम ठरली , लखनऊच्या गोलंदाजांनी ठराविक अंतराने विकेट्स घेत सामन्यात पुनरागमन केले. रिंकू सिंग ने सामना वाचवण्याचा प्रयत्न केला. त्याने १५ चेंडूत ३८ धावा बनवल्या.

LSG VS KKR सामन्यात लखनऊने कोलकातावर ४ धावांनी विजय मिळवला. या विजयासह लखनऊने आईपीएल २०२५ मध्ये आपला तिसरा विजय नोंदवला तर कोलकात्याला अजून प्रतीक्षाच करावी लागणार आहे.

SEE TRANSLATION

LSG VS KKR: On April 8, 2025, the 21st match of IPL 2025 was played between Kolkata Knight Riders and Lucknow Super Giants at Eden Gardens, Kolkata. Both teams had won two matches each before this game. Both were eyeing their third win of the season. In this clash, LSG defeated KKR and came out on top.

 

LSG VS KKR: Fiery Half-Centuries from Mitchell Marsh and Nicholas Pooran

Kolkata’s captain Ajinkya Rahane won the toss and chose to bowl first. LSG openers Markram and Marsh started cautiously. They then accelerated the scoring with some explosive shots, putting the team in a strong position during the powerplay. Markram was dismissed by Harshit Rana after scoring 48 runs off 28 balls, which included 4 fours and 2 sixes.

After Markram’s dismissal, Nicholas Pooran joined Mitchell Marsh at the crease. The duo unleashed a brutal assault on the bowlers. Mitchell Marsh smashed 81 runs off 48 balls, hitting 6 fours and 5 sixes. On the other hand, Nicholas Pooran was equally aggressive, especially smashing 24 runs in an over bowled by Andre Russell. He scored a blistering 87 runs off just 36 balls, including 8 sixes and 7 fours.

LSG’s batsmen dominated KKR’s bowling attack. Spencer Johnson, who was included in the Kolkata squad today, turned out to be the most expensive bowler, conceding 46 runs in just 3 overs. Riding on the explosive half-centuries from Marsh and Pooran, LSG posted a massive target of 238 runs for KKR.

LSG VS KKR: Kolkata’s Unsuccessful Chase

Chasing a mammoth target of 239 runs, KKR’s innings started with openers Sunil Narine and Quinton de Kock. KKR received an early blow as De Kock was dismissed for 15 runs by Akashdeep. Skipper Ajinkya Rahane then stabilized the innings. Along with Narine, he accelerated the score to 90 runs in just 6 overs at a run rate of 15.

KKR suffered their second blow when Narine was caught out after scoring 30 runs off 12 balls, including 4 fours and 2 sixes. At the end of the 13th over, Ajinkya Rahane was dismissed after scoring 61 runs off 35 balls, hitting 8 fours and 2 sixes. After his departure, KKR’s innings collapsed. Their middle order failed to deliver, and LSG bowlers kept picking up wickets at regular intervals to claw their way back into the game. Rinku Singh tried to rescue the team, scoring 38 runs off 15 balls.

In the end, Lucknow won the match by 4 runs. With this win, LSG registered their third victory in IPL 2025, while Kolkata is still waiting for their third win.

Leave a Comment