PBKS vs CSK: घरच्या मैदानावर पंजाबच किंग, चेन्नईला 18 धावांनी हरवले

PBKS VS CSK (पंजाब किंग्ज आणि चेन्नई सुपर किंग्ज) यांच्यात IPL (इंडियन प्रीमियर लीग) 2025 चा 22 वा सामना 8 एप्रिल 2025 रोजी, मुल्लांपूर, चंदीगड येथील महाराजा यादविंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर  खेळला गेला. PBKS VS CSK सामन्यात पंजाब ने चेन्नई ला १८ धावांनी हरवले. पंजाबने या हंगामातील आपला तिसरा विजय मिळवला तर चेन्नईला सलग चौथ्या पराभवास सामोरे जावे लागले.

pbks vs csk

PBKS VS CSK: प्रियांश आर्या आणि शशांक सिंग यांचा जलवा

PBKS ची सुरुवात काहीशी अडखळती झाली होती. पॉवरप्लेमध्ये त्यांनी 75 धावांवर 3 गडी गमावले होते. पंजाबचे श्रेयस अय्यर, प्रभसिमरण सिंह, ग्लेन मॅक्सवेल यांच्यासह ५ फलंदाज दोन अंकी धावसंख्या सुद्धा गाठू शकले नाहीत. एका बाजूने पंजाबचे एकामागून एक गडी बाद होत होते तर दुसऱ्या बाजूने प्रियांश आर्या डावाला सावरत होता.  प्रियांश आर्या, जो आपल्या पहिल्याच IPL हंगामात खेळत होता, त्याने अवघ्या 39 चेंडूंमध्ये शतक झळकावले. त्याने IPL मधील सर्वात वेगवान शतकांच्या यादीत स्थान मिळवले.

त्याने 103 धावांची खेळी खेळली, ज्यात 9 षटकार आणि 7 चौकारांचा समावेश होता. ही IPL मधील चौथी सर्वात वेगवान शतकी खेळी ठरली. त्याच्या या खेळीने PBKS ला मजबूत पायावर उभे केले. दुसरीकडे, शशांक सिंगने शेवटच्या टप्प्यात नाबाद अर्धशतक (52 धावा) करत संघाला 219 धावांपर्यंत पोहोचवले. या दोघांनी 71 आणि 65 धावांच्या भागीदाऱ्या रचल्या, ज्यामुळे PBKS ची धावसंख्या 219 पर्यंत वाढली.

CSK च्या गोलंदाजांना सुरुवातीला यश मिळाले, पण मधल्या आणि शेवटच्या षटकांत त्यांना PBKS च्या फलंदाजांना रोखता आले नाही. मथीशा पाथिराना याने प्रियांश आर्याला बाद करत त्याच्या शतकानंतर त्याला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. लॉकी फर्ग्युसनने 2 बळी घेतले, तर खलील अहमद आणि रविचंद्रन अश्विन यांनीही प्रत्येकी एक गडी बाद केला. तरीही, CSK च्या गोलंदाजांना प्रियांश आणि शशांक यांच्या आक्रमक फलंदाजीसमोर हतबल व्हावे लागले.

PBKS VS CSK : चेन्नईचा अपयशी पाठलाग

220 धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या CSK ची सुरुवात ठीक झाली. रचिन रविंद्र आणि रुतुराज गायकवाड लवकर बाद झाल्याने CSK ची अवस्था 62/2 अशी झाली होती. डेव्हॉन कॉन्वे याने अर्धशतक झळकावले (67* धावा) केल्या.  चेन्नई कडून डेव्हॉन कॉन्वे आणि शिवम दुबे यांनी डाव सावरायचा प्रयत्न केला पण त्यांना इतर फलंदाजांची साथ मिळाली नाही.

सुरुवातीच्या धक्क्यानंतर CSK ची मधली फळी PBKS च्या गोलंदाजांसमोर टिकू शकली नाही.यानंतर महेंद्रसिंग धोनी मैदानात उतरला, पण त्याला फारशी चमक दाखवता आली नाही. शेवटच्या 18 चेंडूंवर CSK ला 59 धावांची गरज होती, पण PBKS च्या गोलंदाजांनी त्यांना संधीच दिली नाही. युझवेंद्र चहल आणि अर्शदीप सिंग यांनी शेवटच्या षटकांत कडक गोलंदाजी करत CSK चा पराभव निश्चित केला.

SEE TRANSLATION

The 22nd match of IPL (Indian Premier League) 2025 between PBKS (Punjab Kings) and CSK (Chennai Super Kings) was played on April 8, 2025, at the Maharaja Yadavindra Singh International Cricket Stadium in Mullanpur, Chandigarh. In this match, Punjab defeated Chennai by 18 runs. This was Punjab’s third win of the season, while Chennai suffered their fourth consecutive loss.

PBKS vs CSK: Priyansh Arya and Shashank Singh steal the show

PBKS had a shaky start, losing 3 wickets for 75 runs in the powerplay. Five of their batters  including Shreyas Iyer, Prabhsimran Singh, and Glenn Maxwell failed to reach double figures. While wickets kept falling at one end, Priyansh Arya steadied the innings from the other. Playing in his debut IPL season, Priyansh scored a century in just 39 balls, earning a place among the fastest centuries in IPL history.

He played a blistering knock of 103 runs, which included 9 sixes and 7 fours. This turned out to be the fourth-fastest century in IPL history. His innings gave PBKS a solid foundation. On the other hand, Shashank Singh remained unbeaten with a half-century (52 runs) towards the end, helping the team reach a total of 219. The two put together partnerships of 71 and 65 runs, which pushed PBKS’s score to 219.

CSK’s bowlers found success early on, but they couldn’t contain the PBKS batters in the middle and death overs. Matheesha Pathirana dismissed Priyansh Arya after his century. Lockie Ferguson took 2 wickets, while Khaleel Ahmed and Ravichandran Ashwin picked up one wicket each. However, CSK’s bowling attack had no answer to the aggressive batting by Priyansh and Shashank.

PBKS vs CSK: Chennai’s unsuccessful chase

Chasing 220, CSK had a decent start. However, with early dismissals of Rachin Ravindra and Ruturaj Gaikwad, they were reduced to 62/2. Devon Conway scored an unbeaten half-century (67* runs). Conway and Shivam Dube tried to stabilize the innings, but they didn’t get much support from the rest of the batting lineup.

After the initial setbacks, CSK’s middle order failed to stand up against PBKS’s bowling attack. MS Dhoni came in later but couldn’t make a significant impact. With 59 runs needed off the last 18 balls, PBKS bowlers gave no breathing room. Yuzvendra Chahal and Arshdeep Singh bowled brilliantly in the final overs to seal CSK’s defeat.

Leave a Comment