किंग कोहलीची मास्टर ब्लास्टरच्या ४९ शतकांच्या विश्वविक्रमाशी बरोबरी

विश्वविक्रमी विराट

५ नोव्हेंबर रोजी ईडन गार्डन मैदानावर खेळल्या गेलेल्या भारत विरुद्ध कोहलीची साऊथ आफ्रिका एकदिवसीय क्रिकेट सामन्यात विराट कोहलीने आपले ४९ वे शकत झळकावत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या सर्वात जास्त एकदिवसीय क्रिकेट शतकांच्या विश्वविक्रमाची बरोबरी केली.
किंग कोहली ने या सामन्यात १२१ चेंडूचा सामना करताना १० चौकारांच्या मदतीने १०१ धावा काढल्या.

किंग कोहली

चाहत्यांना किंग कोहली चे वाढदिवशी गिफ्ट 

किंग कोहलीने १४ वर्षांपूर्वी याच मैदानावर आपल्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतले पहिले शतक झळकावले होते. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने हा विश्वविक्रम ४५२ इनिंग्ज मध्ये केला होता तर किंग कोहलीने २७७ इनिंग्ज मध्ये या विश्वविक्रमाला गवसणी घातली.

नोव्हेंबर हा विराट कोहलीचा जन्मदिवस आहे. विराटने वाढदिवशी शतक झळकावून चाहत्यांना आगळीवेगळी भेट दिली आहे. अशी कामगिरी करणारा किंग कोहली हा तिसरा भारतीय आणि जगातील सातवा खेळाडू ठरला आहे. यापूर्वी वाढदिवशी शतक झळकावण्याची कामगिरी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी या भारतीय खेळाडूंनी केली आहे.

किंग कोहलीने २००८ साली मलेशियातील १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषकासाठी खेळविल्या गेलेल्या सामन्यांमध्ये विजेत्या संघाचे कर्णधारपद भूषविले. ऑगस्ट २००८ मध्ये,१९ वर्षांचा असताना भारताकडून श्रीलंकाविरुद्ध च्या एकदिवसीय सामन्यात पदार्पण केले.२०११ मध्ये पहिला कसोटी सामना वेस्ट इंडीज विरुद्ध किंगस्टन येथे खेळला.भारतीय एकदिवसीय क्रिकेट संघाचा उपकर्णधार म्हणून २०१२ मध्ये विराट कोहलीची नियुक्ती झाली.२०१४ मध्ये विराट कोहली भारतीय संघाचा कर्णधार झाला.

इंडियन प्रीमियर लीगच्या रॉयल चलेंजर्स बंगलोर संघाकडून विराट कोहली खेळतो. २०१३ पासून किंग कोहली रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाचा कर्णधार आहे. २०२३ च्या आयपीएल मध्ये किंग कोहली ने बाहेरच्या मैदानावर झालेल्या सामन्यामध्ये ३००० धावांचा टप्पा पार केला. आयपीएल च्या इतिहासात अशी कामगिरी करणारा किंग कोहली हा पहिला फलंदाज बनला आहे. किंग कोहलीने कोलकत्ता विरुद्ध हा विक्रम केला आहे.

“विराट द रन मशीन”म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विराट कोहलीच्या नावे अनेक विश्वविक्रम आहेत.सलग चार वर्षे सर्वात जास्त किमान १००० धावा करणारा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा खेळाडू आहे.२०१५ मध्ये आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये सर्वात जास्त १००० धावा करणारा खेळाडू ठरला आहे.आंतरराष्ट़्रीय टी-२० मध्ये १६ अर्धशतक पूर्ण करणारा एकमेव खेळाडू आहे.सर्वात फास्ट १० शतके असे बरेच विक्रम किंग कोहलीच्या नावावर आहे.

किंग कोहलीला आता पर्यंत अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे

– २०१२ आयसीसी सर्वोत्कृष्ट एकदिवसीय खेळाडू.
– २०१३ मध्ये अर्जुन पुरस्कार.
– २०१७ सीएनएन आयबीएन इंडियन आँँफ द ईयर पुरस्कार.
– २०१७ भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मश्री.
– २०१८ भारताचा सर्वोच्च क्रिडा सन्मान खेलरत्न पुरस्कार.
– २०१८ चा “आयसीसी क्रिकेटर आँँफ द इयर” पुरस्कार.

२०१४, मध्ये विराट कोहली इंडियन सुपर लीगच्या क्लब एफसी गोवाचा सह-मालक झाला. “फुटबॉलच्या उत्सुकतेपोटी” आणि “भारतात फुटबॉल वाढीस लागावा” म्हणून त्याने क्लब मध्ये गुंतवणूक केली

आतापर्यंत विराट कोहलीला अनेक ब्रँड्स ने करारबद्ध केले आहे. ज्या मध्ये पेप्सिको, बुस्ट, मंच, क्लियर हेयर केयर, रॉयल चॅलेंज, आदिदास, एमआरएफ, मॅटरेल, ओकले, टीव्हीएस् मोटर्स, विक्स, फास्ट्रॅक, संगम सुटिंग्स, हर्बलाईफ, फ्लाईंग मशीन, रेड चीफ शुज, टोयोटा मोटर्स, सेलकॉन मोबाईल्स, सिंथॉल आणि ३सी कंपनी यासह इतर अनेक ब्रँड्स चा समावेश आहे.

विराटची पत्नी अनुष्का शर्मा हि बॉलिवुडमधील आघाडीची अभिनेत्री आहे. अनुष्का शर्माने पिके, बँड बाजा बारात, परी अशा सिनेमांमधून कमाल भूमिका साकारल्या आहेत. अनुष्का आणि विराट यांनी एकमेकांना डेट केल्यानंतर २०१७ मध्ये लग्नगाठ बांधली. त्यांना वामिका नावाची मुलगी आहे.

FAQ.

१) विराट कोहलीने आपले एकदिवसीय कारकिर्दीतील ४९ वे शतक कोणाविरुद्ध केले?

– विराट कोहलीने आपले एकदिवसीय कारकिर्दीतील ४९ वे शतक दक्षिण आफ्रिके विरुध्द केले. त्याने हे शतक ११९ चेंडूत १० चौकरांच्या मदतीने केले .

२) वाढदिवशी वनडेत शतक झळकावणारा विराट कोहली कितवा फलंदाज ठरला?

– वाढदिवशी वनडेत शतक झळकावणारा विराट कोहली सातवा फलंदाज ठरला.

३) विराट कोहलीचा जर्सी नंबर काय आहे?

– विराट कोहलीचा जर्सी नंबर १८ आहे.

४) २०२३ मध्ये विराट कोहलीने किती धावा केल्या?

२०२३ मध्ये विराट कोहलीने ५४३ धावा केल्या.

५) विराट कोहलीचे पूर्ण नाव काय आहे?

– विराट कोहलीचे पुर्ण नाव विराट प्रेम कोहली असे आहे.

६)  विराट कोहली आयपीएल मधे कोणत्या संघाकडून खेळतो ?

– विराट कोहली आयपीएल मध्ये रॉयल चॅलेंजर बंगलोर संघाकडून खेळतो.

७) विराट कोहली ने गरिबांना मदत करण्यासाठी कोणती संस्था सुरू केली?

– विराटने गरिबांना मदत करण्यासाठी ‘विराट कोहली फाउंडेशन’ ही संस्था २०१३ मध्ये सुरु केली.

You May also Like

5 thoughts on “किंग कोहलीची मास्टर ब्लास्टरच्या ४९ शतकांच्या विश्वविक्रमाशी बरोबरी”

Leave a Comment