KKR VS PBKS: कोलकाता 111 धावांचे आव्हान पार करण्यात अपयशी, पंजाबने 95 धावांवर रोखले

KKR VS PBKS: 15 एप्रिल 2025 रोजी, IPL 2025 चा 31 वा सामना महाराजा यादविंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, मुल्लानपूर येथे कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आणि  पंजाब किंग्स (PBKS) यांच्यात झाला. हा सामना पंजाब किंग्सने 16 धावांनी जिंकला, ज्यामध्ये त्यांनी 111 धावांचे आव्हान बचावले. पंजाबने आयपीएलच्या इतिहासातील सर्वात कमी धावांचे आव्हान वाचवण्याचा विक्रम केला.

kkr vs pbks

KKR VS PBKS: कोलकाताने पंजाबला १११ धावांवर रोखले

KKR VS PBKS सामन्यात पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला, ज्यामागे मुल्लानपूरच्या खेळपट्टीची स्वाभाविक गती आणि दवामुळे दुसऱ्या डावात गोलंदाजी कठीण होण्याची शक्यता होती. खेळपट्टी फिरकी गोलंदाजांसाठी अनुकूल होती.

पंजाबची सुरुवात चांगली झाली, प्रभसिमरन सिंगने 15 चेंडूत, 2 चौकार, 3 षटकारांच्या मदतीने 30 धावा बनवल्या तर प्रियांश आर्याने २२ धावांचे योगदान दिले. पंजाबची 3.1 षटकांत 39/0 अशी स्थिती होती, पण नंतर त्यांचा डाव ढासळला. ते 6 षटकांत 54/4 अशा स्थितीत होते, आणि शेवटी 15.3 षटकांत सर्वबाद 111 धावांवर मागे पडले. पंजाबकडून शशांक सिंग 18 धावा बनवल्या . इतर फलंदाजांनी फारसे योगदान दिले नाही, श्रेयस अय्यर 0 धावांवर बाद झाला. पंजाबचे तब्बल 6 फलंदाज एक अंकी धावसंख्येवर बाद झाले तर केवळ 2 फलंदाज 20 धावांचा आकडा पार करू शकले.

कोलकाताकडून पॉवरप्लेमध्ये हर्षित राणाने 3 विकेट्स घेतल्या ज्यामध्ये प्रियंश आर्या , श्रेयस अय्यर, आणि प्रभसिमरन सिंग यांचा समावेश होता.वरुण चक्रवर्तीने  ग्लेन मॅक्सवेल आणि जोश इंग्लिस यांना बाद केले. सुनील नरेनने 2 विकेट्स घेतल्या, तर वैभव अरोराने आणि अन्रिच नॉर्टजेने प्रत्येकी 1 विकेट घेतली. कोलकाताच्या गोलंदाजांनी ठराविक अंतराने विकेट्स घेत पंजाबचा डाव अवघ्या 111 धावांवर समाप्त केला.

KKR VS PBKS: पंजाबचे ११२ धावांचे आव्हान पार करण्यात कोलकाता विफल

पंजाबने KKR ला अवघ्या 112 धावांचे आव्हान दिले, पण त्यांची फलंदाजी पूर्णपणे विफल ठरली. कोलकाताची सुरुवात अतिशय खराब झाली. दोन्ही सलामीवीर सुनील नरेन आणि क्विंटन डी कॉक अवघ्या 7 धावांचे योगदान देऊन तंबूत परतले. त्यानंतर आलेल्या कर्णधार अजिंक्य रहाणे (17 धावा) आणि अंगक्रिश रघुवंशीने (37 धावा) डाव सावरायचा प्रयत्न केला. कोलकाताची मधल्या फळीची फलंदाजी अक्षरशः पत्त्यांच्या बंगल्या प्रमाणे कोसळली. आंद्रे रसेलने सामना जिंकण्याच्या आशा जिवंत ठेवल्या होत्या परंतु दुसऱ्या बाजूने त्याला पुरेशी साथ भेटली नाही. त्याने 17 धावा बनवल्या.

पंजाबच्या गोलंदाजांमध्ये युझूवेंद्र चहलने विकेट्स घेत कोलकाताच्या फलंदाजांना गारद केले. त्याने एकूण ४ विकेट्स घेतल्या ज्यामध्ये रहाणे, रघुवंशी, रमनदीप सिंग आणि रिंकू सिंग  यांचा समावेश होता. या व्यतिरिक्त मार्को यान्सेनने ३ विकेट्स घेत कोलकाताला सर्वबाद ९५ धावांवर रोखले. एकवेळ कोलकाता 71 धावांवर ३ बाद अशा अवस्थेत होता, परंतु चहलच्या फिरकीच्या जादूने त्यांची अवस्था 8 गडी बाद 79 धावा अशी झाली.

पंजाब किंग्सने 16 धावांनी विजय मिळवला, ज्यामुळे त्यांचे IPL 2025 चे गुणतालिकेतील स्थान मजबूत झाले. युझवेंद्र चहल सामनावीर ठरला, त्याने 4 विकेट्स घेत पंजाबला विजय मिळवून दिला. KKR साठी हा सामना निराशाजनक होता, कारण त्यांची फलंदाजी अपयशी ठरली, विशेषतः कमी धावसंख्येच्या आव्हानासमोर. पंजाबने आयपीएलच्या इतिहासातील सर्वात कमी धावांचे आव्हान वाचवण्याचा विक्रम केला. याआधी, आयपीएल २०२४ मध्ये सुद्धा पंजाबने सर्वोच्च २६२ धावांचे आव्हान पूर्ण करण्याचा विक्रम केला होता.

Leave a Comment