IND vs AUS T-20: भारतीय वंशाचा तन्वीर सांघाला ऑस्ट्रेलियन संघात संधी

IND vs AUS T-20 मालिका

आयसीसी वनडे विश्वचषक जिंकल्यानंतर यजमान भारतासोबत ऑस्ट्रेलिया संघ ५ सामन्यांची T-20 मालिका खेळत आहे. त्यातील पाहिला सामना  विशाखापट्टणम येथ २३ नोव्हेंबर रोजी विशाखापट्टणम येथे खेळवीला गेला. या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाकडून भारतीय वंशाचा तन्वीर सांघा प्रथमच भारताविरुद्ध लेगस्पिनर म्हणून खेळला.तन्वीर सांघा सोशल मीडियावर देखील सध्याचा चर्चेचा विषय ठरला.
Ind vs Aus T-20

तन्वीर सांघा 

तन्वीर सांघाचा जन्म २१ नोव्हेंबर २००१ मध्ये ऑस्ट्रेलियाच्या सिडनी येथे झाला. परंतु त्याचे वडील जोगा सांघा हे भारतीय वंशाचे आहेत. जोगा सांघा हे मूळचे पंजाब मधील रहिमपूर येथील आहेत.

१९९७ मध्ये जोगा सांघा ऑस्ट्रेलियाला गेले व स्थायिक झाले. त्यांनी उदरनिर्वाहसाठी टॅक्सी चालवण्याचे काम केले. तर तन्वीरची आई उपनीत कौर सिडनीतच अकाउंटंट म्हणून काम करते.

भारतीय वंशाचा सांघा हा लेगस्पिनर आहे. तसेच गुरींदर संधू यांच्या नंतर ऑस्ट्रेलियाच्या संघात स्थान मिळविणारा तो भारतीय वंशाचा दुसरा क्रिकेट खेळाडू ठरला आहे.

तन्वीर सांघाची कारकीर्द

२०१८ मध्ये तन्वीर सांघा क्वीन्सलँड येथे झालेल्या U17 नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये न्यू साउथ वेल्स मेट्रोकडून खेळला. त्याने अंडर १९ राष्ट्रीय चॅम्पियनशिपमध्ये ऑस्ट्रेलिया इलेव्हनसाठी जोरदार कामगिरी केली. या कामगिरीच्या जोरावर जानेवारी २०१९ मध्ये श्रीलंकेतील U19 दौऱ्यासाठी त्याची निवड झाली.

सांघाने त्यानंतर दक्षिण आफ्रिकेतील २०२० च्या U19 विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व केले आणि केवळ ११.४६ च्या सरासरीने १५ विकेट्स घेतल्या.

तन्वीर सांघाने सिडनी थंडरसाठी बिग बॅश लीग सीझन २०२०-२१ साठी डिसेंबर २०२० मध्ये मेलबर्न स्टार्स विरुद्ध पदार्पण केले. या स्पर्धेत २१ विकेट्स घेऊन तो तिसरा सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला.

जानेवारी २०२१ मध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाच्या आंतरराष्ट्रीय संघात वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी तन्वीरला स्थान देण्यात आले.

तन्वीर सांघाने ऑक्टोबर २०२१ मध्ये न्यू साउथ वेल्ससाठी शेफील्ड शिल्ड हंगामात प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. ऑगस्ट २०२२ मध्ये द हंड्रेडमध्ये खेळण्यासाठी बर्मिंगहॅम फिनिक्सने त्याला करारबद्ध केले.

ऑगस्ट २०२३ मध्ये, त्याने किंग्समीड येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध T-20 मध्ये पदार्पण केले.

तन्वीर सांघा बिग बॅश लीगमध्ये सिडनी थंडर या संघाकडून खेळतो. सिडनी क्लब कडून खेळताना त्याने चांगली कामगिरी केली आहे. २०२० मध्ये अंडर १९ क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत १५ विकेट्स घेणारा आघाडीचा गोलंदाज होता.

जानेवारी २०२१ मध्ये सांघाला १९ व्या वर्षी न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाच्या ट्वेंटी-ट्वेंटी आंतरराष्ट्रीय संघात स्थान देण्यात आले. द हंड्रेड मध्ये खेळण्यासाठी बर्मिंगहॅम फिनिक्स ने तन्वीर सांघाला ऑगस्ट २०२० मध्ये करारबंद केले.

सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात टीम इंडिया

IND vs AUS T-20 मालिकेसाठी भारतीय संघ सूर्यकुमार यादवच्या नेतृत्त्वात खेळणार आहे. सूर्यकुमार कर्णधार तर ऋतुराज गायकवाड हा सुरुवातीच्या तीन सामन्यांसाठी उपकर्णधार असणार आहे. शेवटच्या दोन सामन्यांसाठी श्रेयस अय्यर उपकर्णधार असणार आहे. विशाखापट्टणम येथे झालेल्या पहिल्या T-20 सामन्यात टीम इंडियामध्ये अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली. तर ऑस्ट्रेलियाच्या संघात देखील नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली. त्यापैकी तन्वीर सांघा हा एक आहे.

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलिया ने जोश इंग्लिसच्या ५० चेंडूमध्ये ११० धावांच्या जोरावर २० षटकांमध्ये २०३ धावांचे लक्ष्य भारतीय संघासमोर ठेवले.प्रत्तुतरात भारतीय संघाने सूर्यकुमार यादव आणि ईशान किशन यांच्या वेगवान अर्धशतकी खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाचा २ गडी राखून पराभव केला.

IND vs AUS

पहिल्या IND vs AUS T-20 सामन्यासाठी भारत आणि ऑस्ट्रेलिया संघ

भारत : सूर्यकुमार यादव (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, यशस्वी जैस्वाल, ईशान किशन, तिलक वर्मा, रिंकू सिंग, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार आणि प्रसिद्ध कृष्णा.

ऑस्ट्रेलिया : मॅथ्यू वेड (कर्णधार), ॲरोन हार्डी, जेसन बेहरेनडोर्फ, सीन एबोट, टिम डेव्हिड, नॅथन एलिस, जोश इंग्लिस, तन्वीर सांघा, मॅट शॉर्ट, स्टीव्ह स्मिथ, मार्कस स्टोइनिस.

FAQs

१) २०२३ विश्वचषक स्पर्धेनंतर भारतीय संघ पहिली T-20 मालिका कोणत्या संघाविरुध्द खेळणार आहे?

– २०२३ विश्वचषक स्पर्धेनंतर भारतीय संघ पहिली T-20 मालिका ऑस्ट्रेलिया संघाविरुध्द खेळणार आहे.

२)IND vs AUS T-20 मालिकेतील सामने कोठे-कोठे खेळविले जाणार आहे?

– IND vs AUS T-20 मालिकेतील पहिला सामना विशाखापट्टणम येथे, दुसरा सामना तिरुअनंतपुरम, तिसरा सामना गुवाहाटी येथे खेळविला जाईल. तर चौथा आणि पाचवा सामने अनुक्रमे रायपूर आणि बेंगुळूरुत खेळविले जाणार आहेत.

३) IND vs AUS T-20 मालिकेसाठी कोणाची कर्णधार आणि उपकर्णधार म्हणून निवड करण्यात आली आहे?

– IND vs AUS T-20 मालिकेसाठी सूर्यकुमार यादव याची कर्णधार म्हणून निवड करण्यात आली आहे. तर पहिल्या तीन सामन्यासाठी ऋतुराज गायकवाड उपकर्णधार असेल तर चौथ्या आणि पाचव्या सामन्यासाठी श्रेयस अय्यर सामन्यात सामील होईल व श्रेयस अय्यर उपकर्णधार असेल.

४)IND vs AUS T-20 मालिकेचे थेट प्रसारण कोणते चॅनल करणार आहेत?
– IND vs AUS T-20 मालिकेचे थेट प्रसारण स्पोर्ट्स १८ आणि कलर्स सिनेप्लेक्स वर प्रसारित केले जाईल. जिओ सिनेमा वर देखील प्रेक्षक या सामन्यांचा आनंद घेऊ शकतील.

५) IND vs AUS T-20 मालिकेतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून कोणत्या खेळाडूने शतकी खेळी केली?

– IND vs AUS T-20 मालिकेतील पाहिल्या सामन्यांत ऑस्ट्रेलिया संघाकडून जोश इंग्लिस याने शतकी खेळी केली. जोश ने ४७ चेंडू मध्ये शतक झळकावून T-20 क्रिकेट मध्ये वेगवान शतक झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत स्थान मिळवले.

६) IND vs AUS पाच टी-२० मालिकेतील पहिला सामना कोणी जिंकला?

– IND vs AUS पाच टी-२० मालिकेतील पहिला सामना भारताने दोन विकेट्स राखून जिंकला. या मालिकेत सूर्यकुमार यादव ला ‘मॅन ऑफ द मॅच’ चा किताब मिळाला.

1 thought on “IND vs AUS T-20: भारतीय वंशाचा तन्वीर सांघाला ऑस्ट्रेलियन संघात संधी”

Leave a Comment