पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांसाठी चार चरणातले मतदान पार पडले
३० नोव्हेंबर रोजी छत्तीसगढ, राजस्थान, मध्यप्रदेश, तेलंगणा आणि मिझोराम या ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांसाठी ७ नोव्हेंबर पासून चार चरणांमध्ये सुरु असलेले मतदान पार पडल्यानंतर Exit Poll समोर आले आहेत.
या निवडणुकांची मतमोजणी ३ डिसेंबर रोजी होणार आहे. मतदान आटोपल्यानंतर कोणत्या राज्यात कोणत्या पक्षाला बहुमत मिळणार, कोणता पक्ष सरकार स्थापन करणार याबाबत बऱ्याच वृत्त वाहिन्यांनी आपआपले Exit Poll प्रदर्शित केलेले आहेत.
२०२४ च्या लोकसभेच्या निवडणुका नजरेसमोर ठेऊन या ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांकडे २०२४ लोकसभेची सेमीफायनल म्हणून पाहिले जात आहे. या निवडणुकांच्या निकालामुळे २०२४ च्या लोकसभा निवडणुकीचे निकाल प्रभावित होऊ शकतात.
य राज्यांतील निवडणुकांच्या रिंगणातील प्रमुख पक्ष भारतीय जनता पक्ष तसेच काँग्रेस यांनी या राज्यांतील निवडणुका जिंकण्यासाठी पूर्ण जोर लावलेला आहे. दोन्ही बाजूंनी जनतेला विविध आश्वासन दिली गेली आहेत. आता जनता कोणत्या राज्यात कुणाला कौल देणार हे पाहणे खुप महत्वपूर्ण ठरणार आहे. जनतेच्या कौलावरच या निवडणुकांचा निकाल अवलंबून आहे.
Exit Poll चे निकाल आले समोर
या Exit Poll च्या अंदाजावर राज्य निहाय एक नजर
मध्यप्रदेश : एक्झीट पोल्स नुसार मध्यप्रदेशात काँग्रेस ला ११० ते १२५ जागा भेटण्याचं अनुमान आहे तर भारतीय जनता पक्षाला १०० ते १२० जागा भेटण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. एकंदरीत पोल्स पाहता काँग्रेस आणि भाजप मधे काट्याची टक्कर होण्याची चिन्हे दिसताहेत.
राजस्थान: एक्झीट पोल्सच्या अंदाजानुसार काँग्रेसला ८६ – १०६ जागा भेटण्याची शक्यता आहे तर भारतीय जनता पक्षाला १०० – १२० जागा भेटण्याची शक्यता वर्तविण्यात आली. एक्झिट पोल्सच्या अंदाजानुसार भारतीय जनता पक्ष राजस्थान मध्ये सरकार स्थापन करण्यात यशस्वी होईल.
आता एक्झीट पोल्सनुसार भाजप सरकार स्थापन करण्यात यशस्वी होणार की काँग्रेस आपले सरकार कायम राखण्यात यशस्वी होणार हे निवडणुकांचे निकाल आल्यानंतरच समजेल.
छत्तीसगढ : छत्तीसगढ मध्ये सध्या भूपेश बघेल यांच्या नेतृत्वात काँग्रेसचे सरकार आहे. छत्तीसगढ मध्ये काँग्रेस पुन्हा एकदा आपले सरकार राखण्यात यशस्वी होईल असा अंदाज एक्झीट पोल्सनुसार दिसत आहे. काँग्रेसला ४५ – ६० जागा तर बीजेपी ला ३५ – ५० जागा भेटण्याचं अनुमान एक्झिट पोल्सनी वर्तवले आहे.
तेलंगणा: तेलंगणामध्ये केसीआर यांच्या नेतृत्वातील बीआरएस चे सरकार आहे. तेलंगणामधे एक्झीट पोल्सनुसार काँग्रेसला स्पष्ट बहुमत असेल. काँग्रेस ५०- ७० जागांवर विजय मिळवेल तर बीआरएस ला ४५ – ५० जागा भेटण्याची शक्यता आहे. तेलंगणामधे भाजप ५ – १० जागांसह तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष राहील.
मिझोराम: मिझोराम या नॉर्थईस्टकडील राज्यात एक्झीट पोल्स अनुमानानुसार काँग्रेस आणि भाजप यांच्यापैकी कुणालाही बहुमत मिळणार नाही. मिझोराममधे प्रादेशिक पक्ष झोरम पीपल्स मुव्हमेंटला बहुमत प्राप्त होईल. झेडपीएम ने सध्याचा सत्ताधारी पक्ष मिझो नॅशनल फ्रंट समोर आव्हान उभे केले आहे. झेडपीएमला १५ – २५ जागा तर एमएनएफला १५ – २० जागा मिळतील असा अंदाज आहे. तर काँग्रेस २ – ५ आणि भाजप ० – २ जागा मिळवू शकतील.
Exit Polls च्या अंदाजावर वर्तविलेल्या शक्यता
या एक्झीट पोल्स नुसार भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेसला बऱ्याच अंशी मिळतेजुळते अंदाज वर्तविण्यात आलेले आहेत. त्यामुळे मध्यप्रदेशात काट्याची टक्कर होणारं असल्याचा अंदाज असल्याने कोण सत्ता स्थापन करण्यात यशस्वी होईल हे पाहणे रंजक ठरेल.
राजस्थानचा राजकीय पार्श्वभूमीकडे नजर टाकली तर प्रत्येक पाच वर्षांत सत्तबदल झालेला पाहायला मिळतो. यावेळीही exit Poll नुसार सत्ताबदल पाहायला मिळू शकतो.
छत्तीगडमधे जरी काँग्रेस आपले सरकार राखण्यात यशस्वी होत असल्याचा exit polls चा अंदाज असला तरी काँग्रेस आणि भाजपला मिळणाऱ्या जागांच्या अंदाजात जास्त फरक दिसून येत नसल्याने येथे सुद्धा सत्ता स्थापनेसाठी रस्सीखेच होऊ शकते. भाजप बाकीच्या पक्षांना बरोबर घेऊन सत्ता स्थापनेसाठी दावा करू शकतो.
तेलंगणामधे काँग्रेसला बहुमत मिळणार असल्याचा अंदाज आहे. परंतु बीआरएस भाजप बरोबर युती करुन सरकार स्थापण्याचा दावा करण्याची शक्यता आहे.
मिझोराम मधे प्रादेशिक पक्षांमध्ये चुरस असणार आहे. मिझोराम मधे त्रीशंकू सरकार स्थापन होण्याची शक्यता वर्वण्यात येत आहे.
FAQs
१) मिझोराममधे सध्या कोणाचे सरकार आहे?
– मिझोराममधे सध्या मिझो नॅशनल फ्रंट यांचे सरकार असून जोरामथंगा हे सध्याचे मुख्यमंत्री आहेत.
२) तेलंगणा विधानसभेमधे एकूण किती सदस्य आहेत?
– तेलंगणा विधानसभेमधे एकूण ११९ निर्वाचित सदस्य आहेत.
३) मध्यप्रदेश विधानसभेत एकूण किती सदस्य आहेत?
– मध्यप्रदेश विधानसभेत एकूण २३० निर्वाचित सदस्य आहेत.
४) राजस्थानमधे कोणाचे सरकार आहे?
– राजस्थानमधे अशोक गेलहोत यांच्या नेतृत्वातील काँग्रेस चे सरकार आहे.
५) मध्यप्रदेशात भाजप चे सरकार कधी स्थापन झाले ?
– मध्यप्रदेशात भाजप चे सरकार २०२० मध्ये स्थापन झाले.
2 thoughts on “Exit Poll 2023 : कोण जिंकणार लोकसभेची सेमीफायनल ?”