Ind Vs Aus मालिकेतील पाचवा आणि अंतिम सामना बँगलोर येथील चिन्नास्वामी इंटरनॅशनल स्टेडियम वर खेळवला गेला. भारताने या मालिकेत अगोदरच ३-१ अशी बढत घेतलेली होती. ऑस्ट्रेलियन कर्णधार मॅथ्यू वेड्स ने नाणेफेक जिंकुन प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात भारताने ६ धावांनी विजय मिळवत मालिका सुद्धा ४-१ अशी जिंकली.
Ind Vs Aus 5th T-20: ऑस्ट्रेलिया समोर विजयासाठी १६१ धावांचे लक्ष्य
Ind Vs Aus सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलिया समोर विजयासाठी १६१ धावांचे आव्हान उभे केले. भारताची सलामी जोडी यशस्वी जयस्वाल आणि ऋतुराज गायकवाड हे लवकरच परतले. यशस्वीने फटकेबाजी करत डावाची सुरुवात केली खरी पण तो लवकरच झेलबाद झाला. त्यापाठोपाठ ऋतुराज गायकवाड सुद्धा बाद झाला. धावसंख्या ३३ असताना २ गडी येऊन परतले सुद्धा होते.
त्यांनतर कर्णधार सूर्यकुमार आणि उपकर्णधार श्रेयस अय्यर यांच्यावर संपूर्ण मदार अवलंबून होती. परंतु सूर्यकुमार सुध्दा लवकरच बाद झाल्याने भारताचा डाव गडगडला. सातव्या षटकात भारताची धावसंख्या ३ गडी बाद ४६ अशी होती.
उपकर्णधार श्रेयस अय्यरने एका बाजूने सावध खेळी करताना डावाला सावरण्याचे काम केले. त्याने ३७ चेंडूत ५३ धावा केल्या. त्याने ५ चौकर आणि २ षटकार मारले. त्याचे हे T-20 कारकिर्दीतले आठवे अर्धशतक आहे.
श्रेयसला जितेश शर्मा आणि अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल यांनी मोलाची साथ देऊन भारताला एका सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहचवले. जितेशने १६ चेंडूत २४ धावा केल्या तर अक्षरने २१ चेंडूत जलद ३१ धावा केल्या.
भारताने २० षटकांमध्ये भारताने ऑस्ट्रेलिया समोर ८ गडी बाद १६१ धावांचे लक्ष्य ठेवले. ऑस्ट्रेलियाकडून जेसन बेहरेनडॉर्फ आणि बेन डोर्सिसने प्रत्येकी दोन गडी बाद केले. एरॉन हार्डी, नॅथन एलिस आणि तन्वीर संघाला प्रत्येकी एक एक विकेट मिळाली.
भारतीय गोलंदाजांची चमकदार कामगिरी
ऑस्ट्रेलियन सलामवीरांनी फलंदाजीला सुरूवात करताच आपले मनसुबे स्पष्ट केले. ट्रेविस हेडने अर्शदीपच्या पहिल्याच षटकात १४ धावा काढल्या. अशा दमदार सुरुवाती नंतर भारतीय गोलंदाजांनी वेळोवेळी ऑस्ट्रेलियन फलंदाजांना बाद करत खेळ आपल्या नियंत्रणात ठेवला.
ऑस्ट्रेलियाकडून बेन मॅकडरमॉटने सर्वाधिक ५४ धावा केल्या, मात्र त्याचे हे प्रयत्न संघाला विजयापर्यंत नेऊ शकले नाहीत. ट्रॅव्हिस हेडने २८ आणि मॅथ्यू वेडने २२ धावा केल्या. या तिघांशिवाय इतर कोणत्याही फलंदाजाने २० धावांचा पल्ला गाठता आला नाही. टीम डेव्हिड १७ धावा करून बाद झाला, तर मॅथ्यू शॉर्ट १६ धावा करून बाद झाला. एरॉन हार्डी सहा तर जोश फिलिप चार धावांची भर घालून बाद झाले.
शेवटच्या षटकात अर्शदीपच्या धारदार गोलंदाजीने मिळवून दिला विजय
अर्शदीप सिंगने अप्रतिम गोलंदाजी करत शेवटच्या षटकात १० धावा वाचवल्या. ऑस्ट्रेलिया ला शेवटच्या षटकात १० धावांची गरज होती. त्याने पहिल्या आणि दुसऱ्या चेंडूवर वेडला धावा काढू दिल्या नाहीत. तिसऱ्या चेंडूवर तो बाद झाला. अर्शदीपने २० व्या षटकात ऑस्ट्रेलियन कर्णधार मॅथ्यू वेडला बाद करून भारताचा विजय निश्चित केला.
जेसन बेहरेनडॉर्फ चौथ्या चेंडूवर केवळ एक धाव काढू शकला. शेवटच्या दोन चेंडूंत ऑस्ट्रेलियाला नऊ धावांची गरज होती. पाचव्या चेंडूवर नॅथन एलिसने धाव घेतली. त्याच्यापाठोपाठ बेहरेनडॉर्फनेही शेवटच्या चेंडूवर एकच धाव घेतली. अशा प्रकारे टीम इंडियाने सहा धावांनी सामना जिंकला.
भारताकडून मुकेश कुमारने तीन, रवी बिश्नोईने आणि अर्शदीपने यांनी प्रत्येकी दोन दोनतर अक्षर पटेलने एक गडी बाद केले.
या सामन्यात अक्षर पटेलने २१ चेंडूत वेगवान ३१ धावा काढल्या तर १ गडी सुध्दा बाद केला. त्याच्या या कामगिरीसाठी सामनावीर म्हणून त्याची निवड करण्यात आली. तर या संपूर्ण मालिकेत रवी बिश्नोईने सर्वाधिक ९ गडी बाद केले. त्यासाठी त्याचा मालिकावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.
FAQs
१) श्रेयस अय्यरने टी-२० मधील कितवे अर्धशतक झळकावले?
– श्रेयस अय्यरने टी-२० मधील आठवे अर्धशतक झळकावले.
२) बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर भारताने ऑस्ट्रेलिाविरुद्ध कितवा टी -२० सामना जिंकला?
– बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर भारताने ऑस्ट्रेलिाविरुद्ध पहिला टी -२० सामना जिंकला. यापूर्वी भारताने या मैदानावर ऑस्ट्रेलिया विरूध्द एकही टी-२० सामना जिंकलेला नव्हता.
३) Ind Vs Aus टी-२० मधील पाचव्या सामन्यात सामनावीर पुरस्कार कोणाला दिला गेला?
– Ind Vs Aus टी-२० मधील पाचव्या सामन्यात सामनावीर पुरस्कार अक्षर पटेल याला दिला गेला.
४) Ind Vs Aus टी-२० मालिकेत रवी बिश्नोई याने एकूण किती विकेट घेतल्या?
– Ind Vs Aus टी-२० मालिकेत रवी बिश्नोई याने एकूण आठ विकेट घेतल्या.
५) Ind Vs Aus टी-२० मालिका भारताने किती फरकाने जिंकली?
– Ind Vs Aus टी-२० मालिका भारताने ४-१ अशी जिंकली.
६) Ind Vs Aus टी-२० मालिकेत मालिकावीर पुरस्कार कोणाला मिळाला?
– Ind Vs Aus टी-२० मालिकेत मालिकावीर पुरस्कार रवी बिश्नोई याला मिळाला.