IND VS ENG: Dhruv jurel याचे कसोटी मालिकेतून भारतीय संघात पदार्पण

IND vs ENG कसोटी मालिका

IND vs ENG

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची असलेली IND VS ENG कसोटी मालिका २५ जानेवारीपासून सुरू होत आहे. मायदेशात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार असून त्यासाठी बीसीसीआयने शुक्रवारी भारतीय संघाची घोषणा केली. यात सध्या चर्चेत असलेले नाव म्हणजे Dhruv Jurel होय.

या १६ सदस्यीय संघात उत्तर प्रदेशचा Dhruv Jurel याला देखील स्थान मिळाले आहे. बीसीसीआयने स्थानिक क्रिकेट मधील नेत्र दीपक कामगिरी पाहून ध्रुवची भारतीय संघात कसोटी मालिकेसाठी पहिल्यांदाच निवड केली आहे

IND VS ENG या सिरीज साठी रोहित शर्माची कर्णधार म्हणून निवड झाली असून उपकर्णधार पदाची धुरा जसप्रीत बुमराह सांभाळणार आहे. अनेक युवा खेळाडूंना संघात संधी मिळाली आहे.तर शार्दुल ठाकूर,प्रसिद्ध कृष्णा,मोहम्मद शमी आणि ईशान किशन या खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला आहे. बीसीसीआयने पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी 16 खेळाडूंची निवड केली असून त्यापैकी पाच खेळाडू असे आहेत जे पहिल्यांदाच इंग्लंड विरुद्ध सामना खेळणार आहेत.

IND VS ENG या मालिकेतील हैदराबाद आणि विशाखापट्टणम येथे होत असलेल्या पहिल्या दोन सामन्यांसाठी संघाची घोषणा झाली आहे. परंतु सध्या या संघात निवड झालेल्या एका नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. ते नाव म्हणजे राजस्थान रॉयल्स चा विकेटकीपर Dhruv Jurel. IND VS ENG होत असलेल्या कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी युवा खेळाडू यष्टीरक्षक Dhruv Jurel याला टीम इंडियात स्थान मिळाले आहे.

ध्रुव जुरेल हा २२ वर्षांचा असून राजस्थान रॉयल्स मधील स्फोटक खेळीने तो प्रथमच प्रसिध्दीच्या झोतात आला आहे. Dhruv Jurel भारतीय संघात कसोटी मालिकेसाठी पहिल्यांदाच निवड करण्यात आली आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये उत्तर प्रदेश चे नेतृत्व करणाऱ्या ध्रुव जुरेल याला मागच्या वर्षी डिसंबरमध्ये इंडीया ए टीमकडून खेळण्याची संधी मिळाली होती.रणजी ट्रॉफी मध्ये देखील त्याने चांगली कामगिरी केली आहे.

Dhruv Jurel

Dhruv Jurel
ध्रुव जुरेलचा जन्म २१ जानेवारी २००१ मध्ये उत्तरप्रदेश मधील आग्रा या ठिकाणी झाला. तो एक भारतीय क्रिकेटपटू असून उजव्या हाताने फलंदाजी करतो. देशांतर्गत क्रिकेटमध्ये उत्तर प्रदेश कडून आणि इंडियन प्रीमियर लीग मध्ये तो राजस्थान रॉयल्स कडून खेळतो.

शाळेतील उन्हाळी शिबिरात (समर कॅम्प) त्याने क्रिकेट खेळायला सुरुवात केली. आणि तेथेच त्याला क्रिकेट या खेळात आवड निर्माण झाली. Dhruv Jurel उत्तर प्रदेशच्या अंडर -१४, अंडर-१६ आणि अंडर-१९ युवा क्रिकेट संघासाठी  खेळलेला आहे . ध्रुव जुरेल ने १० जानेवारी २०२१ मध्ये २०२० -२०२१ सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये उत्तर प्रदेश साठी T-२० डेब्यू केलं होतं.

जुरेल याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये १५ सामन्यात एक शतक आणि पाच अर्धशतकासह ७९० धावा केल्या आहेत. १७ फेब्रुवारी २०२२ रोजी २०२१-२०२२ रणजी ट्रॉफी मध्ये उत्तर प्रदेशसाठी प्रथम श्रेणी पदार्पण केले. Dhruv Jurel ने ५ एप्रिल २०२३ मध्ये गुवाहाटी येथे पंजाब किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स कडून पदार्पण केले.

Dhruv Jurel चे वडील कारगिल युद्धाचे हिरो

ध्रुव जुरेलचे वडील नेम सिंह सैन्य दलात हवालदार होते. १९९९ साली झालेल्या कारगिल युद्धात सहभागी झाले होते. त्यामुळे त्यांच्या मुलाने सैन्याधिकारी व्हावं असं त्यांचंही स्वप्न होतं. ध्रुवला देखील वडिलांसारखीच देशाची सेवा करायची होती. पण त्याला क्रिकेटचे वेड असल्याने तो क्रिकेटच्या दिशेने वळला. महेंद्रसिंग धोनी हा त्याचा आदर्श.

अंडर-१९ वर्डकप मध्ये उत्कृष्ट कामगिरी

ध्रुव जुरेल भारताकडून अंडर – १९ विश्वचषक खेळला आहे. या स्पर्धेत ध्रुवच्या खांद्यावर उपकर्णधार पदाची धुरा देण्यात आली होती. बांगलादेश विरुद्ध झालेल्या वर्ल्ड कप फायनल मध्ये भारताला बांगलादेश कडून पराभवाचा सामना करावा लागला. ध्रुव जुरेलने या स्पर्धेत सहा सामने खेळले. तीन डावात फलंदाजी करताना त्याने ४४.५० च्या सरासरीने ८९ रन केले आणि अर्धशतक ही ठोकले.

राजस्थान रॉयल संघाचा भाग

ध्रुव जुरेल राजस्थान रॉयल संघाचा भाग आहे. राजस्थान रॉयल्स ने त्याला वीस लाख रुपयांच्या मूळ किमतीत विकत घेतले. जुरेल ने त्याच्या पदार्पणाच्या आयपीएल हंगामात १७२.७३ च्या उत्कृष्ट स्ट्राइक रेटने १५२ रन्स केले होते. यावेळी नाबाद ३८ रन्स ही त्याची सर्वोच्च धावसंख्या होती.

IND VS ENG पहिल्या दोन सामन्यांसाठी भारतीय संघ

रोहित शर्मा (कॅप्टन), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल(विकेटकीपर), के एस भरत (विकेटकीपर), Dhruv Jurel (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार आणि आवेश खान.

पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेचे वेळापत्रक:

पहिला सामना : २५ जानेवारी ते २९ जानेवारी, हैदराबाद

दुसरा सामना : २ फेब्रुवारी ते ६ फेब्रुवारी, विशाखापट्टणम

तिसरा सामना : १५ फेब्रुवारी ते १९ फेब्रुवारी, राजकोट

चौथा सामना : २३ फेब्रुवारी ते २७ फेब्रुवारी, रांची

पाचवा सामना : ७ मार्च ते ११ मार्च, धर्मशाळा.

Leave a Comment