Ayodhya Ram Mandir : प्राणप्रतिष्ठा सोहळा 22 जानेवारी 2024

राममय झाली अयोध्या नगरी

Ayodhya Ram Mandir

२२ जानेवारी २०२४ रोजी या मंदिरात प्रभू श्री रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार असून त्याच्याशी संबंधित विविध विधींना १६ जानेवारीपासूनच सुरुवात झालेली होती. संपूर्ण अयोध्या नगरी राममय होऊन गेलेली आहे. या सोहळ्याचा उत्साह संपूर्ण देशभर ओसंडून वाहत आहे. अयोध्या राम मंदिर उदघाटन सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे.

Ayodhya Ram Mandir पार्श्वभूमी

अयोध्या हे उत्तर प्रदेश राज्यातील शरयू नदीच्या काठावर वसलेले एक प्राचीन धार्मिक शहर आहे. हे शहर विष्णूचा अवतार प्रभू रामचंद्राचे जन्मस्थान मानले जाते. येथे भव्य श्रीराम मंदिर होते. १५ व्य शतकात हे मंदिर मोगल बादशाह बाबरच्या आदेशामुळे उध्वस्त केले गेले. आणि त्या मंदिराच्या जागी एक वादग्रस्त मशिद उभारली गेली. ०६ डिसेंबर १९९२ रोजी बाबरी मशीद पाडण्यात आली. २०२० मध्ये पुन्हा या ठिकाणी मंदिराचे काम सुरु झाले आणि २२ जानेवारी २०२४, म्हणजेच उद्या या ठिकाणी प्रभू श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापना होणार आहे.

Ayodhya Ram Mandir वैशिष्ट्ये

Ayodhya Ram Mandir बांधकाम हे कोणार्कच्या सूर्यमंदिराप्रमाणे करण्यात आले आहे. या मंदिराच्या उभारणी साठी नागर शैली उपयोगात आणण्यात अली असून अनेक प्राचीन ऐतिहासिक मंदिरांचा अभ्यास करून या मंदिराची रचना केली गेलेली आहे. हे मंदिर १००० वर्षांपर्यंत टिकू शकते असा दावा केला गेला आहे . या मंदिरात कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिर प्रमाणे दुपारी १२ वाजता प्रभू श्री रामाच्या चरणांवर सूर्याची किरणे पडतील असे तंत्रज्ञान वापरले गेले आहे. Ayodhya Ram Mandir ची एकूण लांबी ३६० फूट , २३५ फूट रुंदी तर उंची १६१ फूट आहे. मंदिराच्या गर्भगृहाची रचना अष्टकोणाकार आहे. एकूण ७० एकरांवर हे मंदिर स्थापले गेले आहे.

प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची वैशिष्ट्ये

प्रभू श्रीरामांची बालरूप मूर्ती एकाच काळ्या पाषाणापासून घडवण्यात आली आहे. या मूर्तीची उंची ५१ इंच असून वजन जवळ जवळ २०० किलो आहे. हि मूर्ती कमळाच्या फुलावर उभी असून मूर्तीसोबत असलेल्या चौकटीच्या एका बाजूला बजरंगबली हनुमंत तर दुसऱ्या बाजूला गरुड उभे आहेत.

कोण कोण राहणार उपस्थित

या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. बरोबर इतर राजकीय नेतेमंडळी, विविध क्षेत्रातील दिग्गज मंडळी या कार्यक्रमासाठी उपस्थिती नोंदवणार आहेत. २२ जानेवारी २०२४ रोजी होत असलेल्या श्रीराम मूर्ती प्रतिष्ठा कार्यक्रमात सर्व नागरिकांना सहभागी होण्याचे आमंत्रण देण्यात आले आहे. या सोहळ्यात ४००० च्या वर संतांना तसेच २५०० हुन अधिक प्रतिष्ठित लोकांना आमंत्रित करण्यात आले आहे.

हे पण वाचा

Leave a Comment