Fathima Beevi : वकील ते सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश एक प्रेरणादायी जीवनप्रवास

सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायधिश फातिमा बिवी यांनी घेतला अखेरचा श्वास

सुप्रीम कोर्टाच्या पहिल्या महिला न्यायाधीश Fathima beevi यांचे २३ नोव्हेंबर २०२३ रोजी वयाच्या ९६ व्या वर्षी निधन झाले. जाणून घेऊयात त्यांच्या प्रेरणादायी जीवन प्रवासा बद्दल …!

Fathima Beevi

Fathima Beevi यांचे प्रारंभिक जीवन

Fathima Beevi यांचा जन्म ३० एप्रिल १९२७ रोजी केरळ मधील पथनामथिट्टा या गावात झाला. त्यांचे पूर्ण नाव मीरा साहिब फातिमा बीवी असे आहे. फातिमा बीवी यांच्या वडिलांचे नाव मीर साहिब तर आईचे नाव खदिजा बिवी आहे. त्यांचा वकिली ते सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश पर्यंतचा प्रवास प्रेरणादायी आहे.

शालेय शिक्षण

Fathima Beevi यांचे शालेय शिक्षण पथनामथिट्टा येथील टाऊन स्कूल आणि कॅथलिक हायस्कूल येथे झाले. तिरूअनंतपुरम विद्यापीठातून त्यांनी विज्ञान शाखेची पदवी संपादन केली तर तिरुअनंतपुरम च्या सरकारी लॉ कॉलेजमधून एलएलबी ही कायद्याची पदवी प्राप्त केली.

वकिली ते सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश असा प्रेरणादायी प्रवास

Fathima beevi यांची १४ नोव्हेंबर १९५० रोजी वकील म्हणून नाव नोंदणी झाली. १९५० च्या बार कौन्सिलच्या परीक्षेत त्या अव्वल आल्या होत्या. बार कौन्सिल परीक्षेत सुवर्णपदक मिळविणाऱ्या त्या पहिल्या महिला होत्या.

मे १९५८ मध्ये केरळ सब-ऑर्डीनेट ज्युडिशियल सर्विसेस मध्ये त्यांची मुन्सिफ म्हणून नियुक्ती करण्यात आली. १९६८ मध्ये सब-ऑर्डीनेट जज म्हणून त्यांनी काम पाहिले. १९७२ मध्ये मुख्य न्याय दंडाधिकारी म्हणून त्यांनी काम केले.

१९७४ मध्ये त्यांची जिल्हा आणि सत्र न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली. १९८० मध्ये आयकर अपील लवादामध्ये त्यांनी न्यायिक सदस्य म्हणून काम केले. ४ ऑगस्ट १९८३ रोजी केरळ उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश बनल्या. फातिमा बिवी पहिल्या मुस्लिम महिला न्यायाधीश होत्या. २९ एप्रिल १९८९ मध्ये उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून निवृत्त झाल्या.

६ ऑक्टोंबर १९८९ मध्ये राष्ट्रपती आर व्यंकट रमण यांनी फातिमा बिवी यांची सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश म्हणून नियुक्ती केली. या आधी सर्वोच्च न्यायालयात एकही महिला न्यायाधीश नव्हती. भारताला सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायधीशासाठी ३९ वर्षे वाट पाहावी लागली.

२९ एप्रिल १९९२ मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश म्हणून त्या निवृत्त झाल्या. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश म्हणून निवृत्त झाल्यानंतर १९९३ ते १९९७ या काळात त्यांनी भारतीय राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य म्हणून काम पाहिले.

१९९७ मध्ये तत्कालीन राष्ट्रपती शंकर दयाळ शर्मा यांनी फातिमा बिवी यांची तामिळनाडूच्या राज्यपाल पदी नियुक्ती केली. तामिळनाडूच्या राज्यपाल असताना त्यांनी तामिळनाडू विद्यापीठाच्या कुलगुरु म्हणूनही काम पाहिले.केरळ मागासवर्गीय आयोगाच्या अध्यक्षा म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली.

Fathima Beevi बार कौन्सिल परीक्षेत सुवर्णपदक मिळविणाऱ्या त्या पहिल्या महिला होत्या. त्या भारतातील कोणत्याही न्यायालया मध्ये नियुक्त होणाऱ्या पाहिल्या मुस्लीम महिला न्यायधीश होत्या. त्या आशिया खंडातील कोणत्याही देशाच्या सर्वोच्च न्यायालयात महिला न्यायाधीश होणाऱ्या पहिल्या महिला न्यायाधीश होत्या.

राजकीय कारकिर्द

फातिमा बिवी यांनी दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या करणाऱ्या चार आरोपींचा दयेचा अर्ज फेटाळला होता.

२००१ साली फातिमा बिवींनी तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांचे बहुमत स्वीकारून त्यांना सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण दिले होते. त्यांचा हा निर्णय वादग्रस्त ठरला. त्यांच्यावर या निर्णयासाठी खुप टीका झाली होती. केंद्रीय मंत्रिमंडळाने त्यांना परत बोलावण्यासाठी राष्ट्रपतींकडे शिफारस केली होती. त्यानंतर त्यांनी राजीनामा दिला होता.

पुरस्कार व सन्मान

सर्वोच्च क्षेत्रात काम करणाऱ्या Fathima Beevi यांना १९९० मध्ये ‘डी. लिट’ पदवी आणि ‘शिरोमणी पुरस्काराने’ सन्मानित करण्यात आले. तसेच त्यांना ‘भारत ज्योती पुरस्कार ‘आणि ‘यू. एस. इंडिया बिझनेस कौन्सिल’ जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

बिवि यांच्या जीवनावर आधारित माहितीपट प्रदर्शित

आशियाई देशातील सर्वोच्च न्यायालयाची पहिली महिला फातिमा बिवी यांच्या जीवनावर आधारीत ‘निथिपथाइले धीरा वनिता ‘ हा माहितीपट प्रदर्शित करण्यात आला. ३० मिनिटाच्या या माहितीपटात त्यांचा सुप्रीम कोर्टा पर्यंतच्या प्रवासावर प्रकाश टाकण्यात आला आहे.

FAQ

१) सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश होणारी पहिली महिला न्यायाधीश कोण?
– सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश होणारी पहिली महिला न्यायाधीश न्यायमूर्ती Fathima Beevi होय.त्या ६ ऑक्टोंबर १९८९ ते २९ एप्रिल १९९२ या काळात सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश होत्या.

२) सर्वोच्च न्यायालयाची दुसरी महिला न्यायाधीश कोण?
– सर्वोच्च न्यायालयाची दुसरी महिला न्यायमूर्ती सुजाता व्ही मनोहर होय.त्या नोव्हेंबर १९९४ ते एप्रिल १९९९ या दरम्यान न्यायाधीश होत्या.

३) सर्वोच्च न्यायालयात २०२३ मध्ये किती महिला न्यायाधीश आहेत?
– सर्वोच्च न्यायालयात सध्या तीन महिला न्यायाधीश आहेत.सध्या सर्वोच्च न्यायालयात हिमा कोहली,न्या. बेला एम. त्रिवेदी आणि न्या.बीव्ही नागरत्ना यांची १ सप्टेंबर २०२१ रोजी नियुक्ती झाली.

४) भारताच्या सर्वोच्च न्यायालयात सर्वाधिक काळ काम करणाऱ्या महिला न्यायाधीश कोण?
– भारताच्या सर्वोच्च न्यायालयात सर्वाधिक काळ काम करणाऱ्या महिला न्यायाधीश रूपा पाल या आहेत.त्यांनी २८ जानेवारी २००० ते २ जून २००६ या काळात सर्वोच्च न्यायालयात काम केले.

५) सर्वोच्च न्यायालयात बार कौन्सिल ऑफ इंडिया मधून थेट पदोन्नती मिळालेल्या पहिल्या महिला न्यायाधीश कोण?
– सर्वोच्च न्यायालयात बार कौन्सिल ऑफ इंडिया मधून थेट पदोन्नती मिळालेल्या पहिल्या महिला न्यायाधीश इंदू मल्होत्रा होय.

You may also like

3 thoughts on “Fathima Beevi : वकील ते सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश एक प्रेरणादायी जीवनप्रवास”

Leave a Comment