भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया तिसरा T-20 सामना
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच टी-२० सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना आज गुवाहाटी येथे बरसापारा स्टेडियम खेळला गेला. Ind Vs Aus यांच्यातील तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने Glenn Maxwell च्या तुफानी शतकाच्या जोरावर भारतावर ५ विकेट्स ने मात करत मालिकेतील आपले आव्हान कायम राखले.
भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान आतापर्यंत २८ टी-२० सामने खेळले गेले आहेत. त्यापैकी भारतने १७ वेळा विजय मिळवला आहे तर ऑस्ट्रेलिया १० वेळा विजेता संघ राहिला आहे.
Ind Vs Aus: मालिकाविजयासाठी भारताला करावी लागणार प्रतिक्षा
२३ नोव्हेंबर ला विशाखापट्टणम येते झालेल्या पहिल्या मालिका सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा दोन गडी राखून पराभव केला. तर २६ नोव्हेंबरला तिरूअनंतपुरम येते झालेल्या दुसऱ्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा ४४ धावांनी पराभव केला. आतापर्यंत भारतीय संघाने Ind Vs Aus T-20 मालिकेत २-० अशी आघाडी घेतलेली होती. आजचा सामना जिंकताच भारताने मालिका खिशात घातली असती. परंतू तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा ५ गडी राखून पराभव करत आपले आव्हान कायम राखले.
ऋतुराज गायकवाडचे पहिले T-20 शतक
गुवाहाटीतील बरसापारा स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. भारताकडून यशस्वी जयस्वाल आणि ऋतुराज गायकवाड यांनी डावाची सुरूवात केली. यशस्वीने आपल्या नेहमीच्या अंदाजात फलंदाजी करण्यास सुरूवात केली. परंतु फटकेबाजीच्या नादात तो यष्टिरक्षक वेडच्या हातात सोपा झेल देऊन बाद झाला.
त्यांनतर फलंदाजीस आलेला ईशान किशनही खास छाप सोडू शकला नाही. केन रिचर्डसनच्या गोलंदाजीवर मार्कस स्टोईनिसकडे झेल देऊन बाद झाला. त्यानंतर कर्णधार सूर्यकुमार आणि ऋतुराज गायकवाड यांनी डावाची पडझड थांबवली.
एका बाजूने सूर्यकुमार फटकेबाजी करत होता तर दुसऱ्या बाजूने ऋतुराज सावध खेळ करत धावा बनवत होता. सूर्यकुमारने २९ चेंडूचा सामना करत ३९ धावा काढल्या. धावफलकावर ८१ धावसंख्या असताना अरॉन हार्डीच्या गोलंदाजीवर यष्टिरक्षक वेडकडे झेल देत सूर्यकुमार यादव बाद झाला.
सूर्यकुमार नंतर फलंदाजीस आलेला तिलक वर्माने दुसऱ्या टोकाने ऋतुराज ची चांगलीं साथ दिली. सूर्यकुमार यादव बाद झाल्यानंतर ऋतुराज गायकवाड ने खऱ्या अर्थाने खेळाची सूत्रे आपल्या हातात घेतली.
ऋतुराजने ५८ चेंडूमध्ये १३ चौकार व ७ षटकारांच्या मदतीनें १२३ धावा तर तिलक वर्माने २४ चेंडूमध्ये ३१ धावा बनवत भारतीय संघाची धावसंख्या ३ बाद २२२ वर नेऊन ठेवली व ऑस्ट्रेलिया समोर विजयासाठी २२३ धावांचे मोठे आव्हान ठेवले. ऋतुराज ने आपल्या कारकिर्दीतले T-20 मधील पहिले शतक झळकावले.
Glenn Maxwell तुफानी शतक: Ind Vs Aus मालिकेतील ऑस्ट्रेलियाचे आव्हान कायम
भारताच्या २२२ धावांच्या आव्हनाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाच्या सलामीच्या फलंदाजांनी डावाची सुरुवात चांगली केली. सलामीचे फलंदाज ट्रॅव्हिस हेड आणि एरॉन हार्डी यांनी डावाची वेगवान सुरुवात करत आपले मनसुबे स्पष्ट केले. सलामीच्या फलंदाजांनी ४ षटकांमध्ये ऑस्ट्रेलियाची धावसंख्या ४६ वर पोहचवली.
पुढच्या षटकात अर्शदिप सिंगच्या गोलंदाजीवर एरॉन हार्डी भारतीय यष्टिरक्षक ईशान किशनच्या हातात झेल देत बाद झाला. त्यांनतर जोस इंग्लिस फलंदाजीसाठी आला. ६ व्या षटकात आवेश खानच्या गोलंदाजीवर ट्रेवीस हेड झेलबाद झाला. रवी बिश्नोईने त्याचा झेल टिपला.
ट्रॅव्हिस हेड बाद झाल्यानंतर Glenn Maxwell ने त्याची जागा घेतली. पुढच्याच षटकात रवी बिश्नोई जोस इंग्लिसला बाद केले. भारतीय गोलंदाजांनी सामन्यावर पकड मिळवायला सुरूवात केली.
पुढचा फलंदाज मार्कस स्टोईनिस आणि Glenn Maxwell यांनी १० च्या धावगतीने धावा बनवण्यास सुरुवात . १३ व्या षटकात शेवटच्या चेंडूवर अक्षर पटेलने स्टोईनिसला बाद केले. त्यांनतर आलेला टीम डेव्हिड स्वस्तातच बाद झाला. रवी बिश्नोईने त्याची विकेट टिपली.
टीम डेव्हिडनंतर खेळण्यासाठी आलेल्या मॅथ्यू वेड आणि Glenn Maxwell यांनी भारतीय गोलंदाजीची पीसे काढली. Glenn Maxwell ने ४८ चेंडू मध्ये ८ चौकार व ८ षटकारांच्या मदतीने १०४ धावा काढल्या. Glenn Maxwell ने आपल्या कारकिर्दीतले T-20 मधले चौथे शतक झळकावले.
Glenn Maxwell च्या या तुफानी शतकी खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने Ind Vs Aus ५ सामन्यांच्या या मालिकेतील आव्हान कायम राखले आहे. Glenn Maxwell ला या सामन्यात सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
Ind Vs Aus: ३ऱ्या सामन्यासाठी भारत आणि ऑस्ट्रेलिया संघ
भारत : सूर्यकुमार यादव (कर्णधार), यशस्वी जायसवाल, ऋतुराज गायकवाड, ईशान किशन (विकेटकीपर), तिलक वर्मा, रिंकू सिंह, अक्षर पटेल, रवि बिश्नोई, अर्शदीप सिंह, आवेष खान, प्रसिद्ध कृष्णा.
ऑस्ट्रेलिया : मॅथ्यू वेड (C), जेसन बेहरेनडॉर्फ, टिम डेव्हिड, ग्लेन मॅक्सवेल, नॅथन एलिस, आरोन हार्डी, ट्रॅव्हिस हेड, मार्कस स्टोईनिस, जोस इंग्लिस, तन्वीर संघा, केन रिचर्डसन.
FAQs
१)भारताकडून टी-२० मध्ये शतक झळकावणारा ऋतुराज गायकवाड कितवा भारतीय खेळाडू ठरला?
– भारताकडून टी-२० मध्ये शतक झळकावणारा ऋतुराज गायकवाड आठवा भारतीय खेळाडू ठरला. हे ऋतुराजचे कारकिर्दीतले पहिले टी-२० शतक आहे.
२) टी-२० मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध शतक झळकावणारा ऋतुराज गायकवाड कितवा खेळाडू ठरला आहे?
– टी-२० मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध शतक झळकावणारा ऋतुराज गायकवाड पहिला भारतीय ठरला आहे.
३) Ind vs Aus टी-२० मालिकेतील तिसरा सामना कोठे पार पडला?
– Ind vs Aus टी-२० मालिकेतील तिसरा सामना गुवाहाटी येथे बारसापारा स्टेडियमवर पार पडला.
४) Glenn Maxwell टी-२० मध्ये कितवे शतक झळकावले?
– Glenn Maxwell ने टी-२० मध्ये चौथे शतक झळकावले.
५) Ind Vs Aus तिसऱ्या टी-२० सामन्यात टॉस कुणी जिंकला?
– Ind Vs Aus तिसऱ्या टी-२० सामन्यात ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला.
६) Glenn Maxwell हा भारताविरुद्ध टी-२० मध्ये ५०० हून अधिक धावा करणारा कितवा फलंदाज आहे?
– Glenn Maxwell हा भारताविरुद्ध टी-२० मध्ये ५०० हून अधिक धावा करणारा तिसरा फलंदाज आहे. या आधी वेस्ट इंडीजचा निकोलस पूरण आणि ऑस्ट्रेलियाच्या अरॉन फींच यांच्या नावे हा विक्रम आहे.
७) Glenn Maxwell ने कोणत्या भारतीय खेळाडूच्या ४ टी-२० शतकांच्या विक्रमाशी बरोबरी केली?
– Glenn Maxwell ने रोहित शर्माच्या ४ टी-२० शतकांच्या विक्रमाशी बरोबरी केली.
८) Ind Vs Aus ४ था टी-२० सामना कुठे खेळला जाणार आहे?
– Ind Vs Aus ४ था टी-२० सामना शहीद वीर नारायण सिंह स्टेडियम, रायपूर येथे खेळला जाणार आहे.
Good….!!!