IND vs AUS World Cup 2023 : भारताचे तिसऱ्यांदा विश्वविजेतेपदाचे स्वप्न अधुरे

IND vs AUS Final: आयसीसी विश्वचषक २०२३

१९ नोव्हेंबर २०२३ रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या IND vs AUS या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भाताचा पराभव करून विश्वचषकावर आपले नाव कोरले. ऑस्ट्रेलिया ६ व्यांदा विश्वचषक विजेता बनला.

IND vs AUS

सलामीवीर ट्रेव्हीस हेडचे शतक

ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारताने ऑस्ट्रेलियासमोर २४१ धावांचे लक्ष ठेवले होते. भारताच्या २४१ धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाच्या संघाने ४३ व्या ओव्हर मध्ये सामना जिंकला.

ऑस्ट्रेलियाचा सलामी वीर ट्रेव्हींस हेडच्या दमदार शेतकी खेळीमुळे भारताला पराभवाचा सामना करावा लागला. ट्रेव्हींस हेडने १२० चेंडू १३७ धावा केल्या तर लाबुशेन याने ५८ धावांची अर्धशतकी खेळी करत चांगली साथ दिली.

ऑस्ट्रेलिया टीम ने सहाव्यांदा आयसीसी विश्वचषकावर आपले नाव कोरले. तर भारताचे तिसऱ्यांदा विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न भंगले. ऑस्ट्रेलियाने या आधी १९८७, १९१९, २००३,२००७ आणि २०१५मध्ये विजेतेपद जिंकली आहेत.

यसीसी विश्वचषक स्पर्धेत भारताची चांगली कामगिरी

आयसीसी एकदिवशीय विश्वचषक २०२३ मध्ये भारताने सलग दहा वेळा विजय मिळविला. तुफान कामगिरी करीत भारतीय संघ अंतिम फेरीत पोहोचला होता. भारताने साखळी फेरीत सलग नऊ वेळा तर उपांत्य फेरीत एकदा न्युझीलँड बरोबर विजयी खेळी करून अंतिम फेरीत पोहोचला होता. मात्र अंतिम सामन्यात AND vs AUS विरुद्ध झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा सहा गडी राखून पराभव केला.

ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर ट्रेव्हिंस हेडने १४ चौकार व १ षटकाराच्या मदतीने ९५ चेंडूत आपले शतक झळकावून ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला. सलामीवीर हेड वर्ल्ड कप फायनल मध्ये शतक करणारा सातवा फलंदाज ठरला.

याआधी देखील २००३ मध्ये रिकी पॉंटिंग च्या नेतृत्वाखालील संघाने भारताचा आयसीसी विश्वचषक सामन्यात पराभव केला होता. भारताला दुसऱ्यांदा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आयसीसी विश्वचषक अंतिम सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले.

बारा वर्षानंतर आलेली संधी हुकली

IND vs AUS

या आधी भारतीय संघाने २०११ मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतात झालेली एकदिवशीय विश्वचषक स्पर्धा जिंकली होती. त्यानंतर २०१५ मध्ये ऑस्ट्रेलिया आणि २०१९ मध्ये इंग्लंडने विश्वचषक स्पर्धा जिंकली आहे.भारताला तब्बल बारा वर्षानंतर घरच्या मैदानावर ट्रॉफी जिंकण्याची संधी होती मात्र ती हुकली.

यजमानपद भारताकडे

यंदाच्या एकदिवशीय विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद भारताकडे होते. भारतात खेळला जाणारा हा चौथा क्रिकेट विश्वचषक होता. या आधी भारताने १९८७, १९९६ आणि २०११ मध्ये स्पर्धेचे आयोजन केले होते.ही या स्पर्धेची तेरावी आवृत्ती होती. आयसीसी दर चार वर्षांनी एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषकाचे आयोजन करते.

आयसीसी एकदिवसीय स्पर्धा भारतातील दहा वेगवेगळ्या शहरांमध्ये झाली. पहिला सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियम वर तर अंतिम सामना गुजरातच्या अहमदाबाद मधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झाला.ही स्पर्धा ५ ऑक्टोंबर ते १९ नोव्हेंबर दरम्यान खेळली गेली. IND vs AUS झालेल्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलिया सहाव्यांदा चॅम्पियन बनला.

सूर्यकिरण एरोबॅटिक्स टीम प्रात्यक्षिक

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर IND vs AUS अंतिम सामना पाहण्यासाठी आलेल्या चाहत्यांना एक वेगळाच थरार पाहण्यासाठी मिळाला.भारतीय हवाई दलाचे सूर्यकिरण विमाने यांनी सामना सुरू होण्यापूर्वी चित्तथरारक प्रात्यक्षिके दाखवली.

FAQ

१) आयसीसी विश्वचषक स्पर्धा २०२३ मध्ये IND vs AUS अंतिम सामन्यात कोणी शतक केले?
– आयसीसी विश्वचषक स्पर्धा २०२३ मध्ये IND vs AUS या अंतिम सामन्यात ट्रेव्हींस हेड या ऑस्ट्रेलियन खेळाडूने शतक केले. फायनल मध्ये शतक करणारा हेड सातवा फलंदाज ठरला.

२)आयसीसी विश्वचषक स्पर्धा २०२३ विजेतेपद कोणाला मिळाले?
– आयसीसी विश्वचषक स्पर्धा २०२३ मध्ये झालेल्या IND vs AUS यांच्या अतिंम सामन्यात ऑस्ट्रेलिया या संघाला सहाव्यंदा विजेतेपद मिळालं.

३) किंग कोहलीने आयसीसी विश्वचषक स्पर्धेत किती धावा केल्या?
– किंग कोहलीने आयसीसी विश्वचषक स्पर्धेत ६ अर्धशतक आणि ३ शतकासह एकूण ७६५ धावा केल्या. एकाच विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा किंग कोहली ठरला. त्याने मास्टब्लास्टर सचिन तेंडुलकरचा २० वर्षापूर्वीचा रेकॉर्ड मोडला.या स्पर्धेत सर्वोत्तम खेळाडू म्हणून त्याला निवडण्यात आले.आयसीसी विश्वचषक २०२३ चा’प्लेअर ऑफ द टूर्नामेंट’ठरला.

४)आयसीसी विश्वचषक स्पर्धा २०२३ मध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज म्हणून कोणाची निवड करण्यात आली?
आयसीसी विश्वचषक स्पर्धा २०२३ मध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज म्हणून मोहम्मद शमी ची निवड करण्यात आली.शमीने या विश्वचषकात केवळ ७ सामने खेळले.या ७ सामन्यात शमीला २४ विकेट्स भेटल्या.

५)भारतात खेळला गेलेला क्रिकेट विश्वचषक कितव्यांदा खेळला गेला?
– भारतात खेळला गेलेला क्रिकेट विश्वचषक चौथा क्रिकेट विश्वचषक होता. यावेळी सहयजमान नसण्याची ही पहिली वेळ होती.

६) यापूर्वी भारताने किती वेळा विश्वचषक जिंकला आहे ?
– भारताने यापूर्वी १९८३ व २०११ साली असे दोन वेळा विश्वचषक स्पर्धेचे विजेतेपद मिळविले आहे.

1 thought on “IND vs AUS World Cup 2023 : भारताचे तिसऱ्यांदा विश्वविजेतेपदाचे स्वप्न अधुरे”

Leave a Comment