SRH VS KKR: ईडन गार्डन्स वर कोलकाताच बलवान , हैदराबादला 80 धावांनी केले चीत

SRH VS KKR (कोलकाता नाइट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद) यांच्यातील आयपीएल २०२५ मधील सामना ३ एप्रिल रोजी कोलकात्याच्या ईडन गार्डन्स मैदानावर खेळला गेला. हा सामना गतविजेत्या केकेआर आणि उपविजेत्या एसआरएच यांच्यातील एक रोमांचक लढत म्हणून पाहिला जात होता. या सामन्यात कोलकाताने सर्वांगीण कामगिरी करत हैदराबादला ८० धावांनी धूळ चारली. दोन्ही संघांनी यापूर्वी आयपीएल २०२४ च्या अंतिम सामन्यात एकमेकांविरुद्ध खेळले होते, जिथे केकेआरने विजय मिळवला होता.

SRH VS KKR
आयपीएल २०२५ मधील १५ वा सामना SRH VS KKR यांच्यात ३ एप्रिल रोजी कोलकात्याच्या ईडन गार्डन्स मैदानावर खेळला गेला. या सामन्यात कोलकाताने हैदराबादला ८० धावांनी धूळ चारली.

SRH VS KKR: कोलकाताने दिले २०१ धावांचे आव्हान

SRH VS KKR  सामन्यात हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कोलकाताच्या फलंदाजांना ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर मोठी धावसंख्या उभारण्याची संधी मिळाली. केकेआरच्या सलामीवीरांनी आक्रमक सुरुवात केली. सुनील नरेन आणि क्विंटन डी कॉक यांनी पहिल्या सहा षटकांतच संघाला चांगली सुरुवात करून दिली. नरेनने आपल्या नेहमीच्या आक्रमक शैलीत फटकेबाजी करत हैदराबादच्या गोलंदाजांवर दबाव टाकला, तर डी कॉकने संयमी खेळ करत त्याला साथ दिली.

मधल्या षटकांत अजिंक्य रहाणे आणि वेंकटेश अय्यर यांनी फलंदाजीची सूत्रे हाती घेतली. रहाणेने कर्णधारपदाला साजेसा खेळ करत स्थिरता आणली, तर अय्यरने आक्रमक फटके खेळत धावगती वाढवली. हैदराबादच्या गोलंदाजांमध्ये मोहम्मद शमी आणि पॅट कमिन्स यांनी काही वेळ प्रतिकार केला, पण केकेआरच्या फलंदाजांनी त्यांच्यावर मात केली. शेवटच्या षटकांत आंद्रे रसेलने आपल्या विस्फोटक शैलीत चौकार-षटकारांचा वर्षाव करत संघाला २०० च्या धावसंख्येपर्यंत नेले.

SRH VS KKR: हैदराबादची अडखळती सुरुवात

लक्ष्याचा पाठलाग करताना हैदराबादची सुरुवात अडखळली. ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा लवकर बाद झाले, ज्यामुळे संघ दबावात आला. ईशान किशनही आपली चमक दाखवू शकला नाही. तो हि स्वस्तात बाद झाला. हेनरिक क्लासेन आणि नितीश रेड्डी यांनी मधल्या षटकांत काही आशा निर्माण केल्या, पण केकेआरच्या गोलंदाजांनी त्यांना रोखले. वरुण चक्रवर्ती आणि हर्षित राणा यांनी फिरकी आणि वेगाने हैदराबादच्या फलंदाजांना त्रास दिला. शेवटी, पॅट कमिन्सने काही फटके खेळले, पण ते विजयासाठी पुरेसे ठरले नाहीत. केकेआरने हा सामना ८० धावांनी जिंकला.

SRH VS KKR सामन्यात हैदराबादला बदला घेण्याची संधी होती, तर कोलकाताला आपले वर्चस्व कायम ठेवायचे होते. SRH VS KKR सामन्यात KKR सर्वच बाबतीत SRH पेक्षा वरचढ ठरला. फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात त्यांनी हैदराबादवर वर्चस्व गाजवले. आयपीएल २०२५ मध्ये केकेआरने आपली विजयी परंपरा कायम ठेवल्याचे या सामन्यात दिसून आले. या विजयासह KKR ने आईपीएल मध्ये SRH विरुद्ध सलग पाच सामने जिंकले आहेत.

SRH VS KKR हा सामना केकेआरच्या सर्वांगीण कामगिरीचा दाखला होता. ईडन गार्डन्सवर KKR ने आपला दुसरा विजय साकार केला तर हैदराबादचा सलग दुसरा पराभव झाला. २०२४ च्या तुलनेत हैदराबादची कामगिरी सुमार दर्जाची  होत आहे. हैदराबादला पुढील सामन्यांत सुधारणा करण्याची गरज पडणार आहे.

SEE TRANSLATION

The IPL 2025 match between Kolkata Knight Riders (KKR) and Sunrisers Hyderabad (SRH) was played on April 3 at Eden Gardens, Kolkata. This match was expected to be a thrilling contest between the defending champions KKR and the runners-up SRH. Kolkata delivered an all-round performance and defeated Hyderabad by 80 runs. Both teams had previously faced each other in the IPL 2024 final, where KKR emerged victorious.

SRH VS KKR: Kolkata Set a Target of 201 Runs

SRH captain Pat Cummins won the toss and elected to field first. KKR batters got a great opportunity to put up a big total on the Eden Gardens pitch. The KKR openers started aggressively. Sunil Narine and Quinton de Kock gave their team a solid start within the powerplay. Narine played in his usual attacking style, putting pressure on SRH bowlers, while de Kock provided steady support.

In the middle overs, Ajinkya Rahane and Venkatesh Iyer took charge of the innings. Rahane played a responsible knock, ensuring stability, while Iyer played aggressive shots to accelerate the run rate. Among SRH bowlers, Mohammed Shami and Pat Cummins tried to resist, but KKR batters overpowered them. In the final overs, Andre Russell unleashed his explosive batting skills, hitting multiple boundaries and sixes, taking KKR past the 200-run mark.

SRH VS KKR: Hyderabad’s Struggling Chase

Chasing the target, SRH had a shaky start. Travis Head and Abhishek Sharma got out early, putting the team under pressure. Ishan Kishan also failed to make an impact and was dismissed cheaply. Heinrich Klaasen and Nitish Reddy tried to build a partnership, but KKR bowlers did not allow them to settle. Varun Chakravarthy and Harshit Rana troubled the Hyderabad batters with their spin and pace attack. In the end, Pat Cummins played a few big shots, but it was not enough to secure a win. KKR won the match by 80 runs.

This match was an opportunity for SRH to take revenge, while KKR aimed to continue their dominance. In all aspects—batting, bowling, and fielding—KKR outperformed SRH. With this victory, KKR extended their winning streak against SRH to five consecutive matches in the IPL.

This match showcased KKR’s all-round brilliance. They secured their second victory at Eden Gardens, while SRH suffered their second consecutive loss. Compared to IPL 2024, SRH’s performance in 2025 has been disappointing, and they need to improve in their upcoming matches.

1 thought on “SRH VS KKR: ईडन गार्डन्स वर कोलकाताच बलवान , हैदराबादला 80 धावांनी केले चीत”

Leave a Comment