Raj Angad Sukhwinder Singh Bawa, commonly known as Raj Bawa, is an emerging Indian cricketer. He is an all-rounder who bats left-handed and bowls right-arm medium pace. He has the ability to perform well both with the bat and ball, which has led to him being referred to as the “next Hardik Pandya.”
Who is Raj Bawa?
Raj Bawa was born on 12th November 2002 in Nahan, Himachal Pradesh, and was raised in Chandigarh. His grandfather, Trilochan Singh Bawa, was a member of the Indian hockey team that won the gold medal at the 1948 London Olympics. His father, Sukhwinder Bawa, also played for the Haryana junior hockey team and later tried his luck in cricket.
Sukhwinder was selected for the Under-19 cricket camp in 1988, but due to a slipped disc injury, he had to quit playing at the age of 22. He then turned to coaching and mentored several young players, including former Indian all-rounder Yuvraj Singh.
Raj Bawa’s Cricketing Journey
Raj Bawa began his cricketing career playing local cricket for Chandigarh. At the age of 19, he made his first-class debut for the Chandigarh cricket team in the 2021–22 Ranji Trophy in February 2022. Notably, he took a wicket on his very first delivery, catching the attention of the cricketing world. He impressed during this match against Hyderabad and later made his T20 debut on 27th March 2022.
He rose to prominence during the 2022 ICC Under-19 Cricket World Cup, where he played a crucial role in India’s victory. In the tournament, he scored 252 runs in six matches at an average of 63, including one century and two half-centuries. His unbeaten 162 runs off 108 balls against Uganda was the highest individual score by an Indian player in the tournament, hitting 14 fours and 8 sixes.
As a bowler, he also performed well, taking 9 wickets at an average of 16.66. Particularly, in the final against England, he scored 35 runs and took 5 wickets, helping India win the Under-19 World Cup for a record fifth time. He was awarded the Player of the Match for his outstanding performance.
Raj Bawa in IPL and Professional Cricket
Following his success in the Under-19 World Cup, Punjab Kings bought Raj Bawa for INR 2 crore in the 2022 Indian Premier League (IPL) auction. Although he tried to make an impact in the IPL, he didn’t get many regular opportunities. In the 2025 IPL season, he joined the Mumbai Indians and made his debut against the Lucknow Super Giants, replacing Rohit Sharma. This was a significant opportunity, as playing for a successful team like Mumbai Indians is a dream for many young players.
Playing Style and Strengths
Raj Bawa is a middle-order left-handed batsman capable of both aggressive and composed batting. His 162-run innings against Uganda is a testament to his aggression, while the 35 runs under pressure in the final show his ability to perform in tough situations. As a bowler, he is a medium-pacer who can trouble batsmen with swing and accuracy.
Although Raj Bawa started with the Indian Under-19 team, his current goal is to secure a place in the senior Indian team. In 2022, he was also selected for the India A team, where he played in the ODI series against New Zealand A under Sanju Samson’s captaincy.
The IPL serves as a major platform for him to showcase his talent. If given consistent opportunities and if he continues to improve his performance, he could emerge as a strong alternative to Hardik Pandya in the Indian team. His performance in the Under-19 World Cup, entry into the IPL, and contribution to domestic cricket highlight his potential. With continued hard work and consistency, he has the potential to become a key player for the Indian cricket team.
SEE TRANSLATION
राज अंगद सुखविंदर सिंह बावा, ज्याला सामान्यतः Raj Bawa म्हणून ओळखले जाते, हा एक उदयोन्मुख भारतीय क्रिकेटपटू आहे. राज बावा हा एक अष्टपैलू खेळाडू आहे जो डाव्या हाताने फलंदाजी करतो आणि उजव्या हाताने मध्यमगती गोलंदाजी करतो. त्याच्यामध्ये फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीमध्ये उत्कृष्ट कामगिरी करण्याची क्षमता आहे. म्हणून त्याला “पुढील हार्दिक पंड्या” म्हणूनही संबोधले जाते.
कोण आहे Raj Bawa.?
Raj Bawa चा जन्म १२ नोव्हेंबर २००२ रोजी हिमाचल प्रदेशातील नाहन येथे झाला आणि तो चंडीगढमध्ये वाढला. त्याचे आजोबा त्रिलोचन सिंह बावा हे १९४८ च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघाचे सदस्य होते आणि त्यांनी सुवर्णपदक जिंकले होते. Raj Bawa चे वडील सुखविंदर बावा हे देखील हरियाणा ज्युनियर हॉकी संघाचे खेळाडू होते आणि नंतर त्यांनी क्रिकेटमध्येही आपले नशीब आजमावले.
सुखविंदर यांनी १९८८ मध्ये अंडर-१९ क्रिकेट शिबिरात निवड झाली होती, परंतु स्लिप डिस्कच्या दुखापतीमुळे त्यांना वयाच्या २२ व्या वर्षी खेळ सोडावा लागला. त्यानंतर त्यांनी क्रिकेट प्रशिक्षणाकडे वळून अनेक युवा खेळाडूंना मार्गदर्शन केले, ज्यात भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग यांचाही समावेश आहे.
Raj Bawa च्या क्रिकेट कारकीर्दीची सुरुवात
Raj Bawa ने चंडीगढसाठी स्थानिक क्रिकेट खेळताना आपली कारकीर्द सुरू केली. वयाच्या १९ व्या वर्षी फेब्रुवारी २०२२ मध्ये २०२१-२२ रणजी करंडक स्पर्धेत चंडीगढ क्रिकेट संघाकडून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. विशेष म्हणजे, त्याने आपल्या पहिल्याच चेंडूवर विकेट घेतली आणि क्रिकेट विश्वाचे लक्ष वेधून घेतले. या सामन्यात हैदराबादविरुद्ध खेळताना आपली छाप पाडली. त्यानंतर ट्वेंटी-२० क्रिकेटमध्येही पदार्पण केले, जिथे त्यांनी २७ मार्च २०२२ रोजी आपला पहिला सामना खेळला.
त्याची खरी ओळख २०२२ आयसीसी अंडर-१९ क्रिकेट विश्वचषकातून झाली. या स्पर्धेत त्याने भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने सहा सामन्यांमध्ये ६३ च्या सरासरीने २५२ धावा केल्या, ज्यात एक शतक आणि दोन अर्धशतकांचा समावेश होता. युगांडाविरुद्ध १०८ चेंडूत १६२ धावांची नाबाद खेळी खेळली, जी या स्पर्धेतील भारतीय खेळाडूची सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या ठरली. या खेळीत १४ चौकार आणि ८ षटकार ठोकले.
गोलंदाजीतही त्याने १६.६६ च्या सरासरीने ९ विकेट्स घेतल्या. विशेषतः अंतिम सामन्यात इंग्लंडविरुद्ध ३५ धावा करताना ५ विकेट्स घेतल्या आणि भारताला रेकॉर्ड पाचव्यांदा विश्वचषक जिंकून देण्यात मोलाचा वाटा उचलला. या कामगिरीसाठी Raj Bawa ला सामनावीराचा पुरस्कार मिळाला.
आयपीएल आणि व्यावसायिक क्रिकेटमध्ये Raj Bawa
Raj Bawa च्या अंडर-१९ विश्वचषकातील यशस्वी कामगिरीमुळे त्याला २०२२ इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) लिलावात पंजाब किंग्जने २ कोटी रुपयांना खरेदी केले. Raj Bawa ने आयपीएलमध्ये आपला प्रभाव पाडण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याला नियमित संधी मिळाली नाही. त्यानंतर २०२५ च्या आयपीएल हंगामात तो मुंबई इंडियन्सने संघात सामील झाला . लखनऊ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामन्यात त्यांनी रोहित शर्माच्या जागी पदार्पणाची संधी मिळाली. ही संधी त्यांच्यासाठी महत्त्वाची ठरली, कारण मुंबई इंडियन्ससारख्या यशस्वी संघात खेळणे हे प्रत्येक युवा खेळाडूचे स्वप्न असते.
Raj Bawa च्या खेळाची शैली आणि सामर्थ्य
Raj Bawa डाव्या हाताने मधल्या फळीतील फलंदाज म्हणून आक्रमक आणि संयमी अशी दोन्ही प्रकारची फलंदाजी करू शकतो . त्याची युगांडाविरुद्धची १६२ धावांची खेळी त्याच्या आक्रमकतेचे उदाहरण आहे, तर अंतिम सामन्यातील ३५ धावा त्याच्या दबावाखाली खेळण्याच्या क्षमतेचे दर्शन घडवतात. गोलंदाजीत ते मध्यमगती गोलंदाज असून, स्विंग आणि अचूकतेने फलंदाजांना त्रस्त करू शकतो.
Raj Bawa ने भारताच्या अंडर-१९ संघातून सुरुवात केली असली तरी त्यांचे लक्ष आता वरिष्ठ भारतीय संघात स्थान मिळवण्यावर आहे. २०२२ मध्ये त्यांना इंडिया ‘ए’ संघातही स्थान मिळाले, जिथे त्यांनी न्यूझीलंड ‘ए’विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत भाग घेतला. या मालिकेत त्यांना संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली खेळण्याची संधी मिळाली.
त्याच्यासाठी आयपीएल हे एक मोठे व्यासपीठ आहे, जिथे ते आपली प्रतिभा जगाला दाखवू शकतात. जर त्यांना सातत्याने संधी मिळाली आणि त्यांनी आपली कामगिरी सुधारली, तर ते भारतीय संघात हार्दिक पंड्याचा पर्याय म्हणून उदयास येऊ शकतात. अंडर-१९ विश्वचषकातील त्यांची कामगिरी, आयपीएलमधील प्रवेश आणि स्थानिक क्रिकेटमधील योगदान यावरून त्याचे सामर्थ्य दिसून येते. जर त्याने आपली मेहनत आणि सातत्य कायम ठेवले, तर तो भारतीय क्रिकेट संघाचे महत्त्वाचा खेळाडू बनेल.