आयपीएलच्या 18 व्या हंगामातील अकरावा सामना SRH vs DC दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात डॉ. वाय. एस. राजशेखर रेड्डी एसीए-व्हीडीसीए क्रिकेट स्टेडियमवर झाला. दिल्ली कॅपिटल्स ने सनरायझर्स हैदराबादला पराभूत करत आयपीएलच्या आठव्या हंगामात आपला दुसरा विजय नोंदवला. तर तर सनरायझर्स हैदराबादचा हा सलग दुसरा पराभव आहे. प्रथम फलंदाजी करताना हैदराबादने दिल्ली कॅपिटल्सला विजयासाठी 164 धावांचं आव्हान दिलं होतं. हे दिल्ली कॅपिटल्सने आव्हान 7 गडी राखून पूर्ण केलं.
SRH vs DC: मिचेल स्टार्कच्या भेदक गोलंदाजी ने हैदराबादच्या डावाची पडझड
सनराइजर्स हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. अभिषेक शर्मा आणि ट्रॅव्हल्स हेड यांनी सनरायझर्स हैदराबादच्या डावाची सुरुवात केली. परंतु हैदराबादला लवकरच एक मोठा धक्का बसला. एक धाव चोरण्याच्या नादात अभिषेक शर्मा विपराज निगमच्या डायरेक्ट हिटवर धावबाद झाला. अवघ्या एक धावेवर अभिषेक शर्मा तंबूत परतला. त्यानंतर आलेला ईशान किशन ही विशेष अशी काही छाप सोडू शकला नाही. तो मिचेल स्टार्क च्या गोलंदाजीवर स्टब्स च्या हाती झेल देऊन परतला.
त्यानंतर आलेल्या नीतीश रेड्डी खाते न खोल खोलता पुन्हा परतला. तोही मिचेल स्टार्कच्या गोलंदाजी चा शिकार झाला. ट्रॅविस हेड ही विशेष असे काहीही करू शकला नाही. तो 22 धावांवर आउट झाला.
पहिल्या पाच षटकांमध्ये चार गडी गमावून 58 धावा बनवल्या. मिचेल स्टार्कने हैदराबादच्या पहिल्या 5 षटकांमध्ये 3 फलंदाजांना परत पाठवले.
त्यानंतर हेन्री क्लासेन आणि अनिकेत वर्मा यांनी सनरायझर्स हैदराबादचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पाचव्या विकेटसाठी त्यांनी अर्ध शासकीय भागीदारी केली. 32 धावा बनवून हेन्री क्लासेन सुद्धा बाद झाला. अनिकेत वर्माने एकाकी झुंज देत 74 धावांचे योगदान दिले.
हैदराबादची फलंदाजी गडगडली आणि त्यांचा डाव 163 धावांवर संपुष्टात आला. मिचेल स्टार्क ने शेवटच्या षटकांमध्ये आणखी 2 विकेट घेत हैदराबादच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले.
SRH vsDC : दिल्ली ची दमदार सुरुवात
दिल्लीकडून मॅकगर्क आणि फाफ डुप्लेसीस यांनी डावाची सुरुवात केली पावर प्ले मध्ये दोघांनी 52 धावा कुटल्या. उपकर्णधार फाफ डुप्लेसीसने 26 चेंडू मध्ये अर्धशतक ठोकले. अर्धशतक ठोकून डुप्लेसिस जिशान अन्सारीच्या गोलंदाजीवर बाद झाला.
नंतर आलेला अभिषेक पोरेल, के एल राहुल, स्टब्स यांनी अनुक्रमे 34, 15 आणि 21 धावांचे योगदान देत विजयासाठी असलेले 163 धावांचे आव्हान 16 षटकांमध्येच पूर्ण केले.
सनरायझर्स हैदराबाद कडून जीशान अन्सारीने आपल्या फिरकीने फाफ डुप्लेसिस, के एल राहुल आणि मॅकगर्क यांना बाद करत तीन फलंदाज तंबूत धाडले.
दिल्ली कॅपिटल्स ने हा सामना 7 गडी आणि 4 षटके राखून जिंकला. मिचेल स्टार्क हा सामनावीर ठरला. त्याने 4 षटकांमध्ये 35 धावा देत 5 गडी बाद केले.
IN ENGLIsh:
The 11th match of the 18th season of the IPL was played between Delhi Capitals and Sunrisers Hyderabad at Dr. Y. S. Rajasekhara Reddy ACA-VDCA Cricket Stadium. Delhi Capitals defeated Sunrisers Hyderabad to register their second win of the season, while this was the second consecutive loss for Sunrisers Hyderabad. Batting first, Hyderabad set a target of 164 runs for Delhi Capitals, which Delhi chased down comfortably with 7 wickets in hand.
SRH vs DC:Mitchell Starc’s Lethal Bowling Wrecks Hyderabad’s Innings:
Sunrisers Hyderabad captain Pat Cummins won the toss and chose to bat first. Abhishek Sharma and Travis Head opened the innings for Hyderabad, but they suffered an early blow. In an attempt to steal a quick single, Abhishek Sharma was run out by a direct hit from Vipraj Nigam and had to return to the pavilion for just 1 run.
Following him, Ishan Kishan also failed to make an impact and was caught by Stubbs off Mitchell Starc’s bowling. Then, Nitish Reddy came in but got out without even opening his account, becoming Starc’s second victim. Travis Head, too, could not contribute much and was dismissed for 22 runs.
By the end of the first five overs, Hyderabad had lost four wickets and managed only 58 runs. Mitchell Starc was the key bowler, sending three batsmen back to the pavilion in the first five overs.
Later, Heinrich Klaasen and Aniket Verma tried to stabilize Hyderabad’s innings. They put up a crucial partnership for the fifth wicket. Klaasen scored 32 runs before getting out, while Aniket Verma fought alone and contributed 74 runs.
Hyderabad’s batting collapsed, and their innings ended at 163 runs. Mitchell Starc took two more wickets in the final overs, breaking Hyderabad’s resistance and finishing with a five-wicket haul.
SRH vs DC:Dominant Start by Delhi Capitals:
For Delhi, McGurk and Faf du Plessis opened the innings and provided a solid start. In the powerplay, both batsmen smashed 52 runs. Vice-captain Faf du Plessis scored a quick half-century in just 26 balls before getting out to Zeeshan Ansari.
After that, Abhishek Porel, KL Rahul, and Stubbs contributed 34, 15, and 21 runs, respectively, helping Delhi chase the target of 164 runs in just 16 overs.
For Sunrisers Hyderabad, Zeeshan Ansari was the standout bowler, taking three wickets by dismissing Faf du Plessis, KL Rahul, and McGurk with his spin.
Delhi Capitals won the match convincingly by 7 wickets with 4 overs to spare. Mitchell Starc was named the Player of the Match for his outstanding bowling performance, taking 5 wickets for 35 runs in 4 overs.