भारतामध्ये फुटबॉल तसा कमी प्रचलित आहे. हा खेळ आपल्या देशात खुप कमी खेळला जातो. फुटबॉल या खेळाला भारतात लोकप्रियता मिळवून देण्यात फुटबॉलपटू Sunil Chhetri चे बहुमूल्य योगदान आहे. आज आपण याच खेळाडू बद्दल माहिती जाणून घेऊयात.
Sunil Chhetri ची कारकिर्द
‘कॅप्टन fantastic‘ म्हणून ओळखला जाणारा सुनील छेत्री भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार आहे. तो बंगळुरू एफसी आणि भारतीय राष्ट्रीय संघासाठी स्ट्राइकर म्हणून काम करणारा एक भारतीय फुटबॉल खेळाडू आहे.
सुनील छेत्री भारतीय संघाकडून कनिष्ठ आणि वरिष्ठ अशा दोन्ही प्रकारात खेळला आहे. दोन दशकांहून अधिक कालावधीची सुनील छेत्री ची कारकीर्द आहे. सुनील छेत्री गोल करण्याच्या क्षमतेसाठी, नेतृत्वासाठी आणि त्याच्या आक्रमक खेळीसाठी ओळखला जातो.
२००१ मध्ये वयाच्या सतराव्या वर्षी Sunil Chhetri ने दिल्लीत फुटबॉल खेळायला सुरुवात केली. २००२ मध्ये कोलकत्याच्या मोहन बागान या फुटबॉल क्लब कडून खेळण्याची संधी सुनील छेत्री ला मिळाली आणि त्याच्या व्यावसायिक कारकिर्दीला सुरूवात झाली. २००५ मध्ये फुटबॉल खेळत असताना सुनील छेत्री राष्ट्रीय फुटबॉल संघाचा एक भाग बनला.
२००५ मध्ये तो जेसीटी फुटबॉल क्लब मध्ये दिसला आणि या फुटबॉल क्लब कडून तो तीन वर्षे खेळला. बेंगळुरू फुटबॉल क्लब, मुंबई सिटी फुटबॉल आणि ईस्ट बंगाल फुटबॉल क्लब यासारख्या संघासाठी ही सुनील छेत्री खेळला आहे.
सुनील छेत्री सध्या भारतीय राष्ट्रीय फुटबॉल संघाकडून खेळतो. २००७, २००९, २०१२ मध्ये नेहरू कप तसेच भारतासाठी २०११ SAFF चॅम्पियनशिप जिंकण्यामध्ये त्याचा खूप मोठा वाटा होता. २००८ चा चॅलेंज कप देखील सुनील छेत्री ने जिंकला आहे.
१२ जून २००५ रोजी त्याने भारतीय राष्ट्रीय फुटबॉल संघाकडून खेळताना पाकिस्तान विरुद्ध पहिला गोल केला. १५ ऑक्टोंबर २०१९ मध्ये आंतरराष्ट्रीय फुटबॉल मध्ये टॉप १० गोल करणाऱ्यांच्या यादीत स्थान मिळवणारा सुनील छेत्री एकमेव भारतीय ठरला.
१६ ऑक्टोंबर २०२१ रोजी भारताने SAFF चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत नेपाळवर ३-० असा विजय मिळवला. यात सुनील छेत्री ने मेस्सी च्या ८० आंतरराष्ट्रीय गोलांची बरोबरी केली.
२१ जून २०२३ रोजी SAFF चॅम्पियनशिपच्या गट टप्प्यातील सामन्यात पाकिस्तानवर ४-० असा विजय मिळवला. या सामन्यात त्याने भारतासाठी चौथी हॅटट्रिक केली. सुनील छेत्री चा हा ९० वा आंतरराष्ट्रीय गोल होता. मलेशियन फुटबॉलपटू मुख्तार दाहारीच्या ८९ या गोलाच्या संख्येला मागे टाकून तो इराणच्या अली दाई नंतर आंतरराष्ट्रीय फुटबॉल मध्ये दुसरा सर्वाधिक गोल करणारा आशियाई खेळाडू ठरला.
Sunil Chhetri ची उल्लेखनीय कामगिरी
– सुनील छेत्री भारत, उत्तर अमेरिका आणि युरोप अशा तीन वेगवेगळ्या खंडात खेळणारा पहिला भारतीय खेळाडू आहे.
– सुनील छेत्री भारताकडून सर्वाधिक म्हणजेच १४३ सामने खेळणारा खेळाडू ठरला आहे आणि सर्वाधिक आंतरराष्ट्रीय गोल ९२ सुनील छेत्री ने केले आहेत.
– सुनील छेत्री ने भारतासाठी सर्वाधिक चार हॅटट्रिक साधली आहे. ताजिकिस्तान, व्हिएतनाम, चायनीज ताईपै आणि पाकिस्तान विरुद्ध त्याने या हॅटट्रिक केल्या आहेत.
– Sunil Chhetri ने AFC स्पर्धांमध्ये सर्वाधिक १९ गोल तर SAFF चॅम्पियनशिप मध्ये सर्वोच्च २३ गोल नोंदवले आहेत.
– इंडियन सुपर लीग मध्ये हॅटट्रिक करणारा सुनील छेत्री पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. या लीग मध्ये भारतीयांकडून सर्वाधिक दोन हॅटट्रिक सुनिल छेत्री च्या नावावर आहेत.
– इंडियन सुपर लीग मध्ये सर्वाधिक गोल ५६ तर आय-लीग मध्ये देखील सर्वोच्च ९४ गोल सुनील छेत्री च्या नावावर आहेत.
– सुपर कप मध्ये सर्वोच्च ९ गोल करणारा खेळाडू ठरला आहे.
– बेंगळुरूसाठी सुनिल छेत्रीने सर्वाधिक २५९ सामने खेळले आहेत आणि सर्वाधिक ११५ गोल केले आहेत.
Sunil Chhetri ला मिळालेले सन्मान आणि पुरस्कार
– सात वेळा AIFF ‘प्लेयर ऑफ द इयर’ पुरस्कार (२००७, २०११, २०१३, २०१४, २०१७, २०१८-२०१९ आणि २०२१-२२)
– २०११ साली राष्ट्रीय खेळातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल ‘अर्जुन पुरस्कार’ देण्यात आला.
– २०१९ भारताचा चौथा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘Padmashree’ देण्यात आला.
– २०२१ साली भारताचा सर्वोच्च क्रीडा सन्मान ‘खेलरत्न पुरस्कार’ देण्यात आला.
– ‘Asian icon‘ म्हणून गौरविण्यात आलेल्या सुनील छेत्री वर फिफा या जागतिक फुटबॉल संघटनेने ‘कॅप्टन fantastic’ नावाची डॉक्युमेंट्री तयार केली आहे.
FAQ
१) सुनील छेत्री ने फुटबॉल खेळायला केव्हा सुरुवात केली ?
– सुनील छेत्री ने २००२ मध्ये मोहन बागान येथून आपल्या व्यावसायिक कारकिर्दीची सुरुवात केली .
२) सुनील छेत्री किती क्लब साठी खेळला आहे ?
– ईस्ट बंगाल (२००८-२००९), डेम्पो (२००९-२०१०), मुंबई सिटी (२०१५-२०१६) आणि बेंगळूरू या क्लब साठी खेळला.
३) सुनील छेत्री चा जन्म कधी झाला ?
– सुनील छेत्री चा जन्म ३ ऑगस्ट १९८४ रोजी आंध्र प्रदेशातील सिकंदराबाद येथे झाला.
४) सुनील छेत्री कोण आहे?
– सिकंदराबाद येथे जन्मलेला सुनील छेत्री हा भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार आहे . भारतीय संघामध्ये स्ट्रायकर आणि विंगर म्हणून खेळतो .
५) सुनील छेत्री किती खंडात फुटबॉल खेळला आहे ?
– भारतीय संघाचा कर्णधार असलेला सुनील छेत्री भारत, उत्तर अमेरिका आणि युरोप अशा तीन वेगवेगळ्या खंडांमध्ये फुटबॉल खेळला आहे.
1 thought on “Sunil Chhetri : दि कॅप्टन फँटॅस्टिक”