३० नोव्हेंबर ला पार पडलेल्या ५ राज्यांपैकी ४ राज्यांच्या Vidhsnsabha Elections चे निकाल आज हाती आले. ३० नोव्हेंबर रोजी सायंकाळी विविध वृत्तवाहिन्यांनी वर्तविलेले अंदाज काही चुकीचे तर काही अंशी बरोबर ठरले आहेत. लोकसभेची सेमीफायनल म्हणुन पाहिल्या जाणाऱ्या या निवडणुकीत भाजपने चारपैकी तीन राज्यांमध्ये निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले.
Vidhansabha election २०२३ मधे भाजप चे निर्विवाद वर्चस्व
भारतीय जनता पक्षाने चारपैकी तीन राज्यांमध्ये मोठ्या फरकाने काँग्रेसवर विजय मिळवला. काँग्रेसच्या ताब्यात असलेली दोन राज्ये राजस्थान आणि छत्तीगडमध्ये भाजप ने हिसकावून घेतल. तर तेलंगणा य दक्षिणेकडील राज्यात काँग्रेस आपला करिष्मा दाखवण्यात यशस्वी ठरली. या चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या निकालावर राज्यानिहाय एक कटाक्ष.
मध्यप्रदेश Vidhsnsabha Election

मध्यप्रदेशात विद्यमान मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या नेतृत्वात भाजपने जवळजवळ १६५ जागांवर विक्रमी विजय मिळवला तर कमलनाथ यांच्या नेतृत्वात काँग्रेस ६६ जागांवर विजयी होण्यात यशस्वी ठरली आहे. मध्यप्रदेशात भाजपने जोरदार मुसंडी मारत सलग चौथ्यांदा सत्ता राखण्यात यश मिळवले आहे. भाजपने पहिल्यांदा मध्यप्रदेशामधे एवढ्या विक्रमी जागांवर विजय मिळवला आहे.
एक्झिट पोल्सच्या अंदाजानुसार भाजपला मध्यप्रदेशात १२५ जागांवर विजय मिळवता येईल असे अनुमान होते. परंतु भाजपने वर्तविलेल्या अंदाजापेक्षा जास्त जागांवर विजय मिळवत विक्रम प्रस्थापित केला. मध्यप्रदेशात भाजप सरकारने सुरु केलेल्या लाडली बहन योजनेचा फायदा झाला असं म्हटल जात आहे.
भाजपने मध्यप्रदेशात मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर केलेला नाही. मुख्यमंत्रीपद विद्यमान मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांना भेटणार की काँग्रेस मधून भाजप मध्ये आलेल्या ज्योतिरादित्य सिंधिया यांची वर्णी लागणार हे पाहणे खुप रंजक ठरणार आहे.
राजस्थान Vidhansabha Election
राजस्थान मध्ये मतमोजणीला सुरुवात झाली त्यावेळी भाजप आणि काँग्रेस मधे चढाओढ सुरू होती. परंतु काही वेळानंतर भाजप ने राजस्थानमधे मुसंडी मारत ११५ जागांवर विजय मिळवत काँग्रेसच्या हातून सत्ता हिसकावून घेतली. राजस्थानमध्ये काँग्रेसला फकत ६९ जागांवर विजय मिळवता आला आहे.
राजस्थानमध्ये एक्झिट पोल्सच्या अंदाजनुसर निकाल लागले आहेत. परंपरेप्रमाणे याही वेळी सत्ताबदल पहावयास मिळाला. १९९३ पासून राजस्थानच्या जनतेने दर विधानसभा निवडणुकांना सत्ताबदल करण्याची आपली परंपरा जपली आहे. काँग्रेसचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचं सत्ता राखण्याचं स्वप्न पुर्ण होऊ शकल नाही. राजस्थानमध्ये मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण हे रंजक ठरणार आहे. निवडणुकांचे नेतृत्व वसुंधरा राजे यांनी केले.
तेलंगणा Vidhansabha Election
तेलंगणामधे काँग्रेसने स्पष्ट बहुमत मिळवले आहे. सत्ताधारी पक्ष बीआरएस आणि मुख्यमंत्री केसीआर यांना मोठा धक्का बसला आहे. दक्षिणेकडील या राज्यात काँग्रेसने एकहाती सत्ता मिळवली. काँग्रेसने तेलंगणामधे ६४ तर बीआरएस ने ३९ जागांवर विजय मिळवला. तर भाजपला फक्त ७ जागा मिळू शकल्या.
तेलंगणामधे एक्झीट पोल्सच्या कलांनुसार काँग्रेसला स्पष्ट बहुमत भेटले तर बीआरएस आणि बीआरएस प्रमुख केसीआर यांना मोठा धक्का बसला आहे. केसीआर तिसऱ्यांदा सत्ता राखण्यात अयशस्वी ठरले आहेत. कर्नाटकनंतर तेलंगणातील विजयासह काँग्रेस ने दक्षिणेकडील २ राज्यांमधे आपली सत्ता स्थापन केली आहे. याउलट भाजप दक्षिणेकडे खूपच कमजोर आहे. एक्झिट पोल्सच्या अंदाजाप्रमाणे तेलंगणामधे भाजप तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला.
छत्तीसगड Vidhsnsabha Election
छत्तीसगड मध्ये एक्झीट पोल्सच्या कलांनुसार काँग्रेस सत्ता राखण्यात यशस्वी होईल असा अंदाज होता परंतु जसजशी मतमोजणी पुढे जात आहे तसे मोठे उलटफेर पाहण्यास मिळाले.
दुपारपर्यंत भाजप आणि काँग्रेसमधे खुप मोठी रस्सीखेच सुरु राहिली. कधी काँग्रेस तर कधी भाजप आघाडीवर घेत होते. पण शेवटी भाजप ने बाजी मारत काँग्रेस च्या हातातील छत्तीसगड मध्ये सत्ता काबीज केली. भाजपने ५४ तर काँग्रेस ३५ जागांवर विजय मिळवला.
काँग्रेसला या निवडणुकीत छत्तीसगढ मधे खूप मोठा फटका बसला तर भाजप ने मोठा उलटफेर करत सत्ता काबीज केली. भुपेश बघेल यांच्या नेतृत्वात काँग्रेस सत्ता राखू शकली नाही.
Vidhansabaha Election एक्झिट पोल्स नुसार काँग्रेस आणि भाजपला मिळतेजुळते यश मिळेल असे भाकीत वर्तवले होते. परंतु भाजपने चारपैकी तीन राज्यांमधे दणदणीत विजय मिळवत पोल्स काही अंशी चुकीचे ठरवले. हिंदी पट्टयात भाजपला भरभरून असा जनमताचा कौल मिळाला आहे. दक्षिणेकडील राज्यांत मात्र भाजप नाममात्रच आहे.
या Vidhansabha Elections मधे काँग्रेस दक्षिण भारतात आपली छाप सोडण्यात बऱ्याच अंशी सफल झालेला आहे. कर्नाटक पाठोपाठ तेलंगणा मधे सुध्दा एकहाती विजय मिळवत काँगेस ने दक्षिणेकडे आपले पाय रोवले आहेत.
२०२४ मधे होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुका लक्षात घेता काँगेस आणि भाजप यांच्या दृष्टीने हे vidhansabha Elections खूप महत्त्वपूर्ण होते. सत्ता काबीज करण्यासाठी अतिशय अटीतटीची लढत होती. जोरदार प्रचार, आश्वासनांचा पाऊस पाडण्यात आला होता.
पण शेवटी महत्वाचा ठरतो तो जनमताचा कौल. मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधे जनमत भाजपच्या बाजूने राहिले तर तेलंगणात जनतेने काँग्रेसला पसंती दर्शविली.