CSK Vs RR: राजस्थानचे विजयाचे खाते उघडले, चेन्नईला दिली 6 धावांनी मात

राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग (CSK Vs RR) या सामन्यात शेवटच्या षटकापर्यंत चाललेल्या थरारामध्ये राजस्थान रॉयल्सने चेन्नईवर सहा धावांनी मात केली आहे या विजयासह राजस्थानने IPL 2025 मध्येआपले विजयाचे खाते खोलले तर चेन्नईचा सलग दुसरा पराभव झाला. या आधी चेन्नई आपल्या घरच्या मैदानावर कडून पराभूत झाली होती.

CSK Vs RRCSK Vs RR
राजस्थानचा चेन्नईवर ६ धावांनी विजय

CSK Vs RR: राजस्थान ने चेन्नई ला दिले १८३ धावांचे आवाहन 

CSK Vs RR या सामन्याची नाणेफेक चेन्नई ने जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. राजस्थान रॉयल्स ची सलामी जोडी यशस्वी जयस्वाल आणि संजू सॅमसन यांनी डावाची सुरुवात केली, परंतु जयस्वाल खलील अहमदच्या गोलंदाजीवर आर अश्विन च्या हातात झेल देऊन बाद झाला. त्याला चमकदार कामगिरी करता आली नाही.

त्यानंतर नितीश राणा फलंदाजी साठी आला. त्याने अश्विन च्या एका षटकामध्ये 19 धावा काढल्या. नितीश ने तुफानी फलंदाजी करताना 21 चेंडूतच अर्धशतक पूर्ण केले आणि संघाची धावसंख्या 6 षटकांमध्ये 75 च्या पार पोहचवली. राणा व संजू ची भागीदारी चेन्नई च्या नूर अहमद ने फोडली. त्याने संजू ला 20 धावांवर बाद करत राजस्थान रॉयल्सच्या धावगती वर ब्रेक लावला. राणाच्या तुफानी फटकेबाजीच्या जोरावर राजस्थानचा स्कोअर 10 षटकांमध्ये 100 पार पोहोचला.

अश्विनी ने आपल्या फिरकीच्या मदतीने राणाला एका चेंडूवर चकवले आणि धोनीने पाठीमागे त्याला स्टंप आऊट केले. नितीश राणाने 36 बॉल मध्ये दहा चौकार व पाच षटकारांच्या मदतीने 82 धावांची खेळी केली.नितीश राणा बाद झाल्यानंतर चेन्नईने राजस्थान रॉयल्सच्या धाव गतीवर थोडासा लगाम लावला. त्यानंतर आलेले फलंदाज ध्रुव जुळेल वानेंदू हसरांगा हे फलंदाज विशेष असा प्रभाव दाखवू शकले नाहीत. राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान परागने 37 धावांची खेळी केली. राजस्थान रॉयल्स ने चेन्नई सुपर किंग समोर 20 षटकांमध्ये 183 धावांचे आव्हान उभे केले.

CSK Vs RR: चेन्नई ची फलंदाजी गडगडली

जोफ्रा आर्चर ने आणि पहिल्याच षटकात रचिन रवींद्रला बात करत चेन्नईला खूप मोठा झटका दिला. त्यानंतर खेळपट्टीवर असणारे ऋतुराज गायकवाड आणि राहुल त्रिपाठी यांनी चेन्नईचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. त्यांनी सहा षटकांमध्ये 42 धावा धावफलकावर लावल्या.राहुल त्रिपाठी 23 धावांवर खेळत असताना वानिंदू हसरंगाने त्याला बाद केले. हेटमायरने त्याचा झेल पकडला.

राहुल त्रिपाठी नंतर ऋतुराज गायकवाड ची साथ देण्यासाठी शिवम दुबे क्रीजवर आला. परंतु रियान परागणे त्याचा वानिंदू हसरंगाच्या गोलंदाजीवर त्याचा अप्रतिम झेल टिपत त्याला बाद केले. पाठोपाठ विजय शंकर सुद्धा बाद होऊन तंबूत परतला. या दरम्यान कर्णधार ऋतुराज गायकवाडने आपले अर्धशतक पूर्ण केले. ऋतुराज वानिंदू हसरंगाला मारण्याच्या नादात बाद झाला. ऋतुराज ने ४४ चेंडूत ६३ धावा काढल्या.

CSK Vs RR सामन्यात शेवटच्या षटकात चेन्नईला विजयासाठी 20 धावांची गरज होती. क्रीजवर धोनी आणि जडेजा खेळत होते, परंतु संदीप शर्माच्या गोलंदाजीवर हेटमायर ने धोनीचा अफलातून झेल पकडला. धोनी बाद झाल्यानंतर सामन्याचे चित्र पूर्ण बदलले. सामना राजस्थान रॉयल्स च्या बाजूने झुकला. संदीप शर्माने आपला अनुभव पणाला लावत शेवटच्या षटकात चेन्नईला 176 धावांवर रोखले व सामन्यात 6 धावांनी विजय मिळवला.

 

SEE TRANSLATION

CSK vs RR: Rajasthan Royals Defeat Chennai Super Kings in a Thrilling Match

In a nail-biting match that went down to the last over, Rajasthan Royals defeated Chennai Super Kings by six runs. With this victory, Rajasthan opened their account in IPL 2025, while Chennai suffered their second consecutive defeat. Previously, Chennai had lost a match at their home ground.

CSK vs RR: Rajasthan Set a Target of 183 for Chennai

Chennai Super Kings won the toss and chose to bowl first. Rajasthan Royals’ openers, Yashasvi Jaiswal and Sanju Samson, started the innings, but Jaiswal was dismissed early, caught by R. Ashwin off Khaleel Ahmed’s bowling.

Nitish Rana then came in to bat and took charge, smashing 19 runs in a single over bowled by Ashwin. He reached his half-century in just 21 balls and helped Rajasthan cross the 75-run mark in six overs. However, Noor Ahmed broke the partnership by dismissing Sanju Samson for 20 runs, slowing down Rajasthan’s scoring rate.

Rana continued his aggressive batting, but Ashwin outfoxed him, leading to a stumping by MS Dhoni. Rana scored a blazing 82 off 36 balls, including ten fours and five sixes. After his dismissal, Chennai managed to restrict Rajasthan’s scoring pace. Late contributions from skipper Riyan Parag (37 runs) helped Rajasthan Royals set a target of 183 runs in 20 overs.

CSK vs RR: Chennai’s Batting Collapse

Jofra Archer gave Rajasthan an excellent start by dismissing Rachin Ravindra in the first over. Ruturaj Gaikwad and Rahul Tripathi attempted to rebuild Chennai’s innings, adding 42 runs in six overs. However, Tripathi (23 runs) was dismissed by Wanindu Hasaranga, caught by Hetmyer.

Shivam Dube joined Gaikwad at the crease but was dismissed soon after, thanks to a brilliant catch by Riyan Parag off Hasaranga’s bowling. Vijay Shankar also fell cheaply, further denting Chennai’s hopes. Amidst this collapse, skipper Ruturaj Gaikwad completed his half-century before getting out to Hasaranga while attempting a big shot. He scored 63 off 44 balls.

In the final over, Chennai needed 20 runs to win, with MS Dhoni and Ravindra Jadeja at the crease. However, Sandeep Sharma’s brilliance with the ball turned the game around. Hetmyer took a stunning catch to dismiss Dhoni, shifting the momentum completely in Rajasthan’s favor. Sharma’s experience helped Rajasthan restrict Chennai to 176 runs, securing a six-run victory.

Leave a Comment

Exit mobile version