शीख धर्माचे संस्थापक ‘गुरु नानक’
कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला Guru Nanak jayanti देशभर मोठया उत्साहाने साजरी केली जाते. हा दिवस गुरुपूरब किंवा प्रकाश पर्व म्हणूनही साजरा केला जातो. ही पौर्णिमा म्हणजे शीख धर्माचे संस्थापक, शिखांचे पहिले गुरू ‘गुरू नानक’ यांची आज जयंती. जगाला एकात्मतेचा, श्रद्धेचा आणि प्रेमाचा संदेश देणारे गुरु नानक यांच्या बद्दल जाणून घेऊयात….
Guru Nanak Dev यांचे प्रारंभिक जीवन
Guru Nanak यांच्या जन्म पंजाब मधील लाहोर जिल्ह्यात तळवंडी या गावात १५ एप्रिल १४६९ मध्ये झाला. आता हे गाव पाकिस्तान मध्ये असून ‘ननकाना साहब’ या नावाने ओळखले जाते. त्यांचे वडील मेहता काळू चंद खत्री तर आई त्रिप्ता देवी होय. तर बेबे नानकी ही त्यांची बहीण.
लहानपणापासूनच ते बुद्धिमान होते. अत्यंत लहान वयातच अनेक भाषांचे ज्ञान त्यांना प्राप्त झाले होते. Guru Nanak यांना लहानपणापासूनच अध्यात्मकची आवड होती. असे सांगितले जाते की त्यांनी वयाच्या पाचव्या वर्षी पहिला संदेश दिला.
शिख धर्माची स्थापना आणि प्रसार
पंधराव्या शतकाच्या उत्तरार्धात गुरु नानक देव यांनी शिख धर्माची स्थापना केली. त्यांचा हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन आणि ज्यू धर्माविषयी गाढा अभ्यास होता. त्यांनी जगाला शीख धर्माची शिकवण दिली. गुरु नानक देवांनी आपली समतेची आणि श्रद्धेची शिकवण जगासमोर मांडण्यासाठी अथक प्रयत्न केले.
गुरुनानक देव यांनी अफगाणिस्तान, इराण आणि अरब देशांमध्ये शीख धर्माचा प्रचार व प्रसार केला. त्यांनी मक्का आणी मदिना या पवित्र शहरांना भेट दिली.त्यांनी सध्याच्या श्रीलंका, काश्मीर, नेपाळ, ताश्कंद तिबेट आणि सिक्कीमला देखील भेटी दिल्या आहेत.
गुरुनानक देव यांनी मध्यपूर्व आणि दक्षिण आशियाई देशांना शीख धर्माची ओळख करून दिली. त्यांनी आपल्या प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यात संपूर्ण पंजाबमध्ये शीख धर्माचा प्रचार करण्यावर लक्ष केंद्रित केले.
Guru Nanak Dev यांनी जगाला दिलेली शिकवण
गुरुनानक यांनी आपले जीवन समता, करुणा आणि ईश्वर भक्तीचा संदेश देण्यासाठी समर्पित केले. त्यांनी मानवतेची एकता आणि निस्वार्थ जीवन जगण्याचे महत्त्व यावर जोर दिला. त्यांची शिकवण गुरु ग्रंथ साहिब या पवित्र धर्मग्रंथांमध्ये समाविष्ट आहे. एकता, श्रद्धा व प्रेमाने त्यांनी जगामध्ये विचारांची क्रांती मांडली.
हिंदू-मुस्लिम धार्मिक एकतेचा संदेश त्यांनी जगाला दिला. त्यांनी जात आणि धर्मामध्ये समानतेचा दृष्टिकोन मांडला. मूर्तिपूजा, धार्मिक श्रद्धा आणि भेदभाव यांच्या विरोधात गुरु नानक देव नेहमीच प्रचार करत. दुर्बल लोकांना ते मदत करत असत. सर्व धर्मीय लोकांना एकत्र आणण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असे.
Guru Nanak यांनी बंधुभाव प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न केले. ईश्वर एकच आहे आणि तो प्रत्येक चराचरात सामावलेला आहे अशी शिकवण त्यांनी जगाला दिली.
अहंकार हा मनुष्याचा सर्वात मोठा शत्रू आहे म्हणून मनुष्याने अहंकार बाळगू नये असे ते सांगत. प्रत्येक व्यक्तीने नम्र आणि चांगले जीवन जगले पाहिजे असे ते म्हणत.
कष्ट करून पैसा कमवा, गरजूंना मदत करा असे ते सांगत. त्यांच्या मते देव एक आहे आणि तो सर्वत्र आहे अशी त्यांची भावना होती.
Guru Nanak Dev यांचे प्रमुख १० सिद्धांत
१) ईश्वर एक आहे.
२) नेहमी एकाच ईश्वराची पूजा करावी.
३) भगवंताचे अस्तित्व सर्वत्र आहे.
४) प्रत्येक प्राणीमात्रात तोच वास करत आहे
५) सर्व स्त्री पुरुष समान आहे. स्रियांचा कधीही अनादर करू नये.
६) प्रामाणिक आणि मेहनतीने पोट भरले पाहिजे.
७) वाईट काम करण्याचे मनात कधीच आणू नये.योग्य मार्गाने संपत्ती मिळवली पाहिजे.
८) नेहमी प्रसन्न राहावे.
९) शरीराला जिवंत ठेवण्यासाठी अन्न गरजेचे आहे, लोभ सोडून कठीण परिश्रम केले पाहिजे.
१०) मेहनतीने आणि प्रामाणिकपणे कमावलेल्या वस्तू किंवा पैसा दान म्हणून तुम्ही दिले पाहिजे.
उत्सव व परंपरा
या दिवशी शिख समाजातील भाविक हा सण मोठ्या श्रद्धा आणि भक्तीभावाने साजरा करतात. या दिवशी गंगेत स्नान करणे व दान करणे याला खूप महत्त्व आहे. दिवे दान करण्याला या दिवशी शुभ मानले जाते.
या दिवशी शीख धर्मियांकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. या उत्सवाची सुरुवात सकाळी मिरवणूक काढून होते. गुरुद्वारा, शिख प्रार्थना स्थळे या ठिकाणी अखंड पाठ आयोजित केले जातात. गुरु ग्रंथ साहिब चे अनेक दिवस सतत पठण चालते. गुरुनानक यांच्या जीवनावर आधारित भक्तीगीते,कीर्तने आणि प्रवचने आयोजित केली जातात.
लंगर या सामुदायिक भोजनाचे आयोजन केले जाते. लंगर या संकल्पनेचा मुख्य हेतू समानता हा आहे. लंगर मध्ये सर्व लोक सहभागी होतात व प्रसादाचा लाभ घेतात. सर्व लोक लंगर मधे आपली सेवा देतात. लंगरच्या माध्यमातून गुरु नानक देवांनी एक समानतेचा संदेश समाजाला दिला आहे.
FAQs
१) Guru Nanak यांनी शीख धर्माचा प्रचार व प्रसार करण्यासाठी कुठे कुठे प्रवास केला?
– गुरुनानक देव यांनी अफगाणिस्तान, इराण आणि अरब देशांमध्ये शीख धर्माचा प्रचार व प्रसार केला. त्यांनी मक्का आणी मदिना या पवित्र शहरांना भेट दिली. त्यांनी सध्याच्या श्रीलंका, काश्मीर, नेपाळ, ताश्कंद तिबेट आणि सिक्कीमला देखील भेटी दिल्या आहेत.
Guru Nanak Dev यांनी मध्यपूर्व आणि दक्षिण आशियाई देशांना शीख धर्माची ओळख करून दिली. त्यांनी आपल्या प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यात संपूर्ण पंजाबमध्ये शीख धर्माचा प्रचार करण्यावर लक्ष केंद्रित केले.
२) Guru Nanak Dev यांना कोणकोणत्या भाषा येत होत्या?
– गुरु नानक देव यांना स्थानिक भाषेबरोबरच पारशी आणि अरबी या भाषा येत होत्या.
३) गुरुनानक जयंती हा दिवस ‘प्रकाश पर्व’ दिवस का साजरा करतात?
– गुरु नानक यांनी आपले जीवन समाज सुधारण्यासाठी समर्पित केले होते. त्यांनी जातीवाद संपवण्यासाठी आणि लोकांना एकात्मतेने बांधण्यासाठी उपदेश दिले. समाजात ज्ञानाचा प्रकाश पसरवण्याचे काम त्यांनी केले. म्हणून गुरु नानक जयंती ही दिव्यांचा उत्सव म्हणून साजरी केली जाते.
४) गुरु नानक यांनी आपला उत्तराधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती केली?
– गुरु नानक यांनी आपला उत्तराधिकारी म्हणून आपला शिष्य भाई लेहना याची नियुक्ती केली. गुरु नानक त्यांची भक्ती आणि समर्पण याने प्रभावित झाले होते.त्यांनी त्याचे नाव ‘अंगद’ असे ठेवले.हेच शिखाचे दुसरे गुरु गुरु अंगद देव जी होय.
५) कोणत्या शीख गुरूने लंगर प्रथा सुरू केली?
– Guru Nanak Dev यांनी लंगर संस्था सुरू केली.त्यांनी लोकांना जात आणि वर्ग विचारात न घेता जेवायला सांगितले. शिखांचे तिसरे गुरु अमरदास जी म्हणाले की तुम्ही लंगर खाल्ल्याशिवाय देवापर्यंत पोहोचू शकत नाही.