चेन्नईविरुद्ध 103 धावा ठोकून आयपीएल मधील चौथे वेगवान शतक करणारा Priyansh Arya कोण आहे.? जाणून घ्या सविस्तर माहिती

पंजाब किंग्सचा फलंदाज Priyansh Arya ने चेन्नई सुपर किंग्स विरुद्धच्या  सामन्यात १०३ धावांची खणखणीत खेळी खेळली. ही खेळी त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील पहिली शतकी खेळी ठरली आणि या सामन्यातील सर्वात महत्त्वाचा क्षण बनली. प्रियांश आर्य आईपीएल मधील वेगवान शतकवीरांच्या क्लब मध्ये सामील झाला.

priyansh aryapriyansh arya

या आधी सर्वात वेगवान शतके अनुक्रमे ख्रिस गेल (३० चेंडू ) , युसूफ पठाण (३७ चेंडू), डेविड मिलर (३८ चेंडू) आणि ट्रेव्हिस हेड (३९ चेंडू) यांनी केली आहे. त्याने अवघ्या ३९ चेंडूंमध्ये शतक पूर्ण केले, जे आयपीएल इतिहासातील भारतीय फलंदाजाकडून दुसरे सर्वात वेगवान शतक ठरले.

कोण आहे Priyansh Arya.?

प्रियांश आर्या हा दिल्लीचा २४ वर्षीय डावखुरा सलामीवीर आहे. त्याने २०२४ च्या दिल्ली प्रीमियर लीगमध्ये सहा षटकारांसह १२० धावांची खेळी खेळून सर्वांचे लक्ष वेधले होते. 2025 च्या आयपीएल लिलावात पंजाब किंग्सने त्याला ३. ८ कोटी रुपयांना विकत घेतले. त्याने यापूर्वी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्येही दिल्लीसाठी सर्वाधिक धावा केल्या होत्या.

प्रियांश आर्याची चेन्नई सुपर किंग्सविरुद्धची १०३ धावांची खेळी ही आयपीएल २०२५ मधील एक अविस्मरणीय क्षण ठरली. त्याच्या या खेळीने पंजाब किंग्सला मजबूत स्थितीत आणले आणि त्याला भारतीय क्रिकेटमधील उदयोन्मुख तारा म्हणून ओळख मिळवून दिली.

Priyansh Arya ची १०३ धावांची खेळी

प्रियांश आर्याने चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध ४२ चेंडूंमध्ये १०३ धावा केल्या, ज्यात ७ चौकार आणि ९ षटकारांचा समावेश होता. विशेष म्हणजे,  हा सामना पंजाब किंग्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात मुल्लांपूर, चंदीगड येथील महाराजा यादविंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला. पंजाब किंग्सने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत 219/6 अशी धावसंख्या उभारली, ज्यामध्ये प्रियांशच्या १०३ धावांचा मोठा वाटा होता.

प्रियांशने सामन्याच्या सुरुवातीपासूनच आक्रमक फलंदाजी केली. त्याने पहिल्याच षटकात खलील अहमदला षटकार ठोकत आपले इरादे स्पष्ट केले. त्यानंतर मथीशा पाथिरानाच्या एका षटकात त्याने सलग तीन षटकार आणि एक चौकार ठोकत आपले शतक पूर्ण केले. या खेळीमुळे पंजाब किंग्सला मजबूत पाया मिळाला, जरी दुसऱ्या बाजूने नियमित अंतराने विकेट पडत होत्या. त्याची खेळी संपली तेव्हा नूर अहमदने त्याला विजय शंकरच्या हाती झेलबाद केले, पण तोपर्यंत त्याने सामन्यावर आपली छाप पाडली होती.

सामन्यावर प्रभाव

एका बाजूने पंजाबची फलंदाजी ढासळत असताना Priyansh Arya ने पंजाब चा संपूर्ण डाव सांभाळला. पंजाब किंग्सची धावसंख्या Priyansh Arya च्या १०३ धावांमुळे पंजाब किंग्सला २१९ धावांपर्यंत मजल मारता आली. शशांक सिंग (५२) आणि मार्को जॅन्सन (३४) यांनीही चांगली साथ दिली. चेन्नईच्या गोलंदाजांना प्रियांशने हैराण केले. विशेषतः पाथिराना आणि रविचंद्रन अश्विन यांच्यावर त्याने हल्ला चढवला. ही खेळी प्रियांशच्या आयपीएल कारकिर्दीतील मैलाचा दगड ठरली आणि त्याला भावी स्टार म्हणून ओळख मिळवून दिली.

SEE TRANSLATION

Punjab Kings’ batsman Priyansh Arya played a brilliant innings of 103 runs against Chennai Super Kings.
This knock was his first century in the IPL and became the most important moment of the match. With this, Priyansh Arya joined the club of fastest centurions in IPL history.

Previously, the fastest centuries were scored by Chris Gayle (30 balls), Yusuf Pathan (37 balls), David Miller (38 balls), and Travis Head (39 balls). Priyansh completed his century in just 39 balls, making it the second-fastest century by an Indian batsman in IPL history.

Who is Priyansh Arya?

Priyansh Arya is a 24-year-old left-handed opening batsman from Delhi. He grabbed attention during the 2024 Delhi Premier League, where he scored an impressive 120 runs with six sixes. In the 2025 IPL auction, Punjab Kings bought him for ₹3.8 crore. He had previously been the highest run-scorer for Delhi in the Syed Mushtaq Ali Trophy.

His 103-run innings against Chennai Super Kings became one of the most unforgettable moments of IPL 2025, placing Punjab Kings in a strong position and establishing him as an emerging star in Indian cricket.

Priyansh Arya’s 103-Run Knock

Against Chennai Super Kings, Priyansh Arya scored 103 runs off 42 balls, including 7 fours and 9 sixes. The match was played at the Maharaja Yadavindra Singh International Cricket Stadium in Mullanpur, Chandigarh. Punjab Kings, batting first, put up a total of 219/6 in 20 overs, with Priyansh contributing significantly to the total.

From the very beginning, Priyansh played aggressively. He hit a six off Khaleel Ahmed in the first over itself, signaling his intent. He then smashed three consecutive sixes and a four in a single over from Matheesha Pathirana, completing his century in the process. Though wickets kept falling at the other end, Priyansh gave the team a solid foundation. His innings ended when Noor Ahmad got him caught by Vijay Shankar, but by then, he had already left a strong impact on the match.

Impact on CSK VS PBKS Match

While Punjab’s batting was faltering at one end, Priyansh Arya held the innings together. Thanks to his 103 runs, Punjab Kings managed to reach a total of 219 runs. Shashank Singh (52) and Marco Jansen (34) also provided good support. Priyansh’s aggressive play especially troubled Chennai’s bowlers, particularly Pathirana and Ravichandran Ashwin. This innings marked a milestone in Priyansh’s IPL career, earning him recognition as a future star.

Leave a Comment

Exit mobile version