CSK VS SRH: चेन्नईचा प्ले ऑफचा मार्ग खडतर, हैदराबादने चेपॉकवर केला 5 गडी राखून पराभव

चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद (CSK VS SRH) यांच्यात इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2025 मधील ४३ वा सामना, 25 एप्रिल रोजी चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर  खेळाला गेला . हा सामना दोन्ही संघांसाठी अत्यंत महत्त्वाचा होता, कारण दोन्ही संघ आयपीएल 2025 च्या गुणतालिकेत प्रत्येकी केवळ चार गुणांस खालच्या स्थानी होते.

CSK VS SRHCSK VS SRH

प्लेऑफच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी हा सामना जिंकणे आवश्यक होते. सनरायझर्स हैदराबादने या सामन्यात 5 गड्यांनी विजय मिळवला आणि चेपॉकवर CSK विरोधात प्रथमच विजय नोंदवला. तसेच २०२० नंतर पहिल्यांदा चेन्नई सुपर किंग्स ची टीम चेपॉक वर ऑल आऊट झाली. CSK VS SRH सामना महेंद्र सिंग धोनीचा 400 वा T20 सामना होता.

CSK VS SRH: चेन्नईची आशादायक सुरुवात, मधली फळी अपयशी

CSK VS SRH सामन्याच्या सुरुवातीला सनरायझर्स हैदराबादचा (SRH) कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्याने सांगितले की, मागील पराभवांनंतर नव्या मैदानावर खेळण्याची संधी आहे आणि दवमुळे गोलंदाजीला फायदा होऊ शकतो. चेपॉकच्या खेळपट्टीवर दव आणि मंद गतीमुळे गोलंदाजांना मदत मिळण्याची शक्यता होती. SRH च्या या निर्णयामुळे चेन्नई सुपर किंग्जला (CSK) प्रथम फलंदाजी करावी लागली.

कमिन्सच्या रणनीतीने CSK वर सुरुवातीला दडपण आणले, ज्याचा फायदा SRH ला मोहम्मद शमीच्या पहिल्या चेंडूवर शेख रशीदच्या विकेटने मिळाला. आयुष म्हात्रे, वय वर्षे 17, याने आक्रमक सुरुवात केली आणि पहिल्या चार षटकांत 6 चौकारांसह 30 धावा काढल्या, ज्यामुळे CSK चा स्कोअर 37/1 असा झाला. त्याला सॅम करनने साथ दिली, पण करन 9 धावांवर पॅट कमिन्सच्या गोलंदाजीवर बाद झाला.

म्हात्रेही हर्षल पटेलच्या गोलंदाजीवर बाद झाला, ज्याने त्याला मिड-ऑफवर झेलबाद केले. यानंतर रविंद्र जडेजा (21) आणि डेव्हाल्ड ब्रेव्हिस यांनी डाव सावरला. ब्रेव्हिसने विशेषतः प्रभावी फलंदाजी केली, 25 चेंडूत 42 धावा काढत चार षटकार ठोकले. त्याची खेळी ‘बेबी एबी’ या टोपणनावाला साजेशी होती. पण कमिंदु मेंडिसने घेतलेल्या अविश्वसनीय झेलमुळे ब्रेव्हिस बाद झाला, ज्याने CSK VS SRH सामन्याची दिशा बदलली.

CSK चा डाव मधल्या षटकांत गडगडला. शिवम दुबे (12), MS धोनी (6), अंशुल कांबोज (2) आणि नूर अहमद (2) स्वस्तात बाद झाले. हर्षल पटेलने 4 गडी बाद करत CSK च्या फलंदाजीला खिंडार पाडले, तर कमिन्स आणि जयदेव उनाडकट यांनी उरलेले गडी बाद केले. दीपक हुडाने शेवटी 22 धावांचे योगदान दिले, पण CSK 19.5 षटकांत 154 धावांवर सर्वबाद झाला. 12.4 षटकांपर्यंत 114/4 असा मजबूत स्कोअर असताना CSK ने शेवटच्या 42 चेंडूत केवळ 40 धावा जोडल्या, ज्यामुळे त्यांचा डाव कमकुवत झाला.

CSK VS SRH: हैदराबादची आव्हानात्मक सुरुवात, पण लक्ष्याचा यशस्वी पाठलाग

155 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना SRH ची सुरुवातही अडखळली. अभिषेक शर्मा, इशान किशन आणि नितीश कुमार रेड्डी लवकर बाद झाले. CSK च्या गोलंदाजांनी सुरुवातीला दडपण टाकले. हेन्रिक क्लासेनला रविंद्र जडेजाने बाद केले, ज्यामुळे SRH चा स्कोअर 54/3 असा झाला. इशान किशनने 34 चेंडूत 44 धावांची खेळी खेळली, पण तोही सॅम करनच्या गोलंदाजीवर बाद झाला. अनिकेत वर्मा (19) नूर अहमदच्या गोलंदाजीवर बाद झाला, ज्यामुळे SRH ला 6.1 षटकांत 49 धावांची गरज होती.

यानंतर कमिंदु मेंडिस आणि नितीश कुमार रेड्डी यांनी संयमी खेळी करत SRH ला विजयाच्या जवळ नेले. मेंडिसने विशेषतः स्वीप शॉट्सच्या मदतीने दडपण कमी केले, तर रेड्डीने स्थिर खेळी केली. शेवटच्या दोन षटकांत SRH ला फक्त 8 धावांची गरज होती, आणि मेंडिसने जडेजाच्या गोलंदाजीवर स्वीप शॉट खेळत दोन धावा काढल्या, ज्याने SRH ने 18.4 षटकांत 155/5 असा स्कोअर करत सामना जिंकला.

या विजयाने SRH गुणतालिकेत आठव्या स्थानावर पोहोचला, तर CSK दहाव्या स्थानावर कायम राहिला. CSK ला आता प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी सर्व सामने मोठ्या फरकाने जिंकावे लागतील, तर SRH ला त्यांच्या उर्वरित सामन्यांमध्ये सातत्य राखावे लागेल. नितीश रेड्डीने सामन्यानंतर सांगितले की, “आम्ही सामान्य खेळ खेळण्याचा प्रयत्न केला, मोठे फटके टाळले आणि मोठ्या सीमारेषेचा फायदा घेत दुहेरी धावा काढल्या.

Leave a Comment

FacebookTwitterEmailShare
Exit mobile version