MI vs GT: IPL 2025 च्या १८ वय मोसमातील ९ वा सामना मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियम वर २८ मार्च २०२५ रोजी खेळाला गेला. या हंगामात दोन्हीही संघाना विजयाची प्रतीक्षा होती. गुजरात टायटन्स ने मुंबई इंडियन्स चा ३६ धावांनी पराभव करून आपल्या विजयाचे खाते उघडले. पहिल्या सामन्यात मुंबई चा चेन्नई कडून पराभव झाला होता, त्यामुळे मुंबई इंडियन्स चे चाहते विजयाच्या अपेक्षेमध्ये होते, परंतु गुजरात ने पुन्हा त्यांचा अपेक्षाभंग केला.
MI vs GT: गुजरात टायटन्स ची दमदार खेळी
मुंबई चा कर्णधार हार्दिक पांड्या ने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गुजरात कडून शुभमं गिल आणि सी सुदर्शन या सलामी जोडीने डावाची सुरुवात केली. पॉवर प्ले मध्ये या जोडीने ६६ धावांची भागीदारी केली. कर्णधार गिल हार्दिक पांड्याच्या गोलंदाजी वर ३८ धावांवर नमन धीर च्या हातात झेल देऊन परतला. गुजरात कडून जोस बटलर आणि साई सुदर्शन यांनी चांगली खेळली करत गुजरात टायटन्स ला १९७ धावांपर्यंत मजल मारण्यास मदत केली. साई सुदर्शन ने ६३ तर जोस बटलर ने ३९ धावा केल्या.
Mi vs GT: मुंबई ची डगमगती सुरुवात
मुंबई इंडियन्स च्या रोहित शर्मा आणि रायन रिकल्टन या सलामी जोडीने डावाची सुरुवात केली. चेन्नई बरोबर ० वर बाद झालेल्या रोहित शर्मा ने आक्रमक सुरुवात करताना पहिल्या षटकात मोहम्मद सिराज ला पाठोपाठ २ चौकार मारले. परंतु सिराज ने त्याला लगेच बाद करत मुंबई इंडियन्स ला पहिला जबरदस्त झटका दिला.
थोड्याच वेळात रोहित पाठोपाठ रिकल्टन सुद्धा बाद झाल्याने मुंबई च्या डावाची पडझड सुरु झाली. त्यानंतर आलेल्या तिलक वर्मा ने डाव सावरायचा प्रयत्न केला, परंतु प्रसिद्ध कृष्णाने त्याला निर्णायक क्षणी बाद केले. सूर्यकुमार यादव सुद्धा ४८ धावा करून बाद झाल्याने मुंबई इंडियन्स च्या अडचणीत वाढ झाली व डावाची पडझड ही होतच गेली.
जलदगतीने विकेट्स गमावल्या मुळे मुंबई इंडियन्स गुजरात टायटन्स ने दिलेल्या १९७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यात अयशस्वी ठरले. मुंबई इंडियन्स चा डाव २० ओव्हर्स मध्ये १६० धावांवर आटोपला. गुजरात ने मुंबई वर ३६ धावांनी विजय मिळवला. आपल्या पहिली विजयाच्या प्रतीक्षेत असलेल्या मुंबई इंडियन्स ला अजूनही विजयची प्रतिक्षाच राहील.
SEE TRANSLATION
MI vs GT: Gujarat Titans Defeat Mumbai Indians by 36 Runs in IPL 2025
The 9th match of the 18th season of IPL 2025 was played between Mumbai Indians and Gujarat Titans at the Narendra Modi Stadium in Ahmedabad on March 28, 2025. Both teams were still waiting for their first win of the season. Gujarat Titans opened their winning account by defeating Mumbai Indians by 36 runs. Mumbai had already faced defeat against Chennai in their first match, and their fans were hoping for a victory. However, Gujarat once again shattered their expectations.
MI vs GT: Dominant Performance by Gujarat Titans
Mumbai captain Hardik Pandya won the toss and chose to bowl first. Gujarat’s opening pair, Shubhman Gill and Sai Sudarshan, provided a strong start, putting up a 66-run partnership in the powerplay. Captain Gill was dismissed for 38 runs off Hardik Pandya’s bowling, caught by Naman Dhir. Jos Butler and Sai Sudharsan continued to play well, helping Gujarat Titans reach a competitive total of 197 runs. Sai Sudarshan scored 63, while Jos Butler contributed 39 runs.
MI vs GT: Mumbai’s Struggles Continue
Mumbai Indians’ openers, Rohit Sharma and Ryan Rickelton, began their innings with intent. Rohit, who was dismissed for a duck in the previous match against Chennai, started aggressively, hitting two consecutive boundaries off Mohammed Siraj in the first over. However, Siraj dismissed him soon after, delivering a major blow to Mumbai.
Shortly after Rohit’s dismissal, Ryan Rickelton also got out, triggering a collapse in Mumbai’s batting lineup. Tilak Varma attempted to stabilize the innings, but Prasidh Krishna dismissed him at a crucial moment. Suryakumar Yadav fought hard, scoring 48 runs, but his dismissal further deepened Mumbai’s troubles.
Losing wickets at regular intervals, Mumbai Indians failed to chase down Gujarat’s target of 197 runs. They were restricted to 160 runs in 20 overs, falling short by 36 runs. While Gujarat secured their first win of the season, Mumbai Indians continue to wait for their maiden victory.