Myanmar Earthquake: म्यानमारमध्ये २८ मार्च २०२५ रोजी सकाळी ११:५० वाजता ७.७ तीव्रतेचा भूकंप आला, ज्यामुळे देशात मोठ्या प्रमाणावर हानी झाली आहे. भूकंपाचे केंद्र म्यानमारच्या मध्य भागात, मोन्यवा शहराच्या सुमारे ५० किमी पूर्वेला होते. भूकंपामुळे म्यांमारची राजधानी नेपीडॉमध्ये १,००० खाटांचे जनरल हॉस्पिटल ‘मास कॅज्युअल्टी एरिया’ घोषित करण्यात आले आहे, जिथे अनेक जखमींची उपचारासाठी गर्दी झाली आहे.

थायलंडच्या बँकॉकमध्ये देखील भूकंपाचे तीव्र झटके जाणवले. थायलंडची राजधानी बँकॉकमध्ये ३० मजली इमारत कोसळल्याने १० लोकांचा मृत्यू झाला आहे, आणि २,००० हून अधिक इमारतींना नुकसान झाले आहे. बांगलादेशमध्ये देखील भूकंपाचे झटके जाणवले, ज्यामुळे राजधानी ढाकामध्ये लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. चीनच्या युन्नान प्रांतातही भूकंपाचे परिणाम जाणवले आहेत.
बेसुमार जीवित व वित्त हानी
Myanmar Earthquake मध्ये १,६४४ लोकांचा मृत्यू झाला आहे, तर ३,४०८ हून अधिक लोक जखमी झाले आहेत. भूकंपानंतर म्यानमारच्या सरकारने सहा प्रदेशांमध्ये आपत्कालीन स्थिती जाहीर केली आहे आणि आंतरराष्ट्रीय मानवीय मदतीसाठी अपील केले आहे. थायलंडमध्ये देखील आपत्कालीन स्थिती लागू करण्यात आली आहे, ज्यामुळे सर्व व्यापारिक क्रिया तात्पुरत्या स्थगित करण्यात आल्या आहेत.
म्यानमार ला आंतरराष्ट्रीय मदत
भारताने ‘ऑपरेशन ब्रह्मा’ अंतर्गत भारतीय नौदलाचे INS सतपुड़ा आणि INS सावित्री हे जहाजे ४० टन मदत सामग्रीसह म्यानमारकडे रवाना केले आहेत. तसेच, ८० सदस्यीय NDRF बचाव पथक C-130 विमानाद्वारे नेपीदा येथे पोहोचले आहे. भारताच्या पंतप्रधानांनी म्यानमारच्या सैन्य सरकारच्या प्रमुख जनरल मिन आंग ह्लाइंग यांच्याशी संवाद साधून भारताच्या मदतीची हमी दिली आहे.
भारताप्रमाणारेच इतर देशांनीही म्यानमारला तात्काळ मदत पाठविली आहे. युरोपियन युनियन (EU) ने २.७ दशलक्ष डॉलर्स (२३ कोटी रुपये) ची तात्काळ मदत म्यानमारला पाठविली आहे. रशियाने १२० बचावकर्मचारी आणि आवश्यक सामग्रीसह दोन विमाने पाठविली आहेत, तर चीन, हॉंगकॉंग, सिंगापूर आणि मलेशियाने देखील बचाव पथके पाठविण्याची घोषणा केली आहे.
Myanmar Earthquake: सध्याची स्थिती
Myanmar Earthquake नंतर म्यानमारच्या सहा राज्यांमध्ये आणीबाणी घोषित करण्यात आली आहे. बचाव कार्ये सुरू असून, आंतरराष्ट्रीय समुदायाकडून मदत पोहोचत आहे. २९ मार्च रोजी दुपारी ३:३० वाजता ५.१ तीव्रतेचा आणखी एक भूकंप आला, ज्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
म्यानमार आणि त्याच्या शेजारील देशांमध्ये आलेल्या या विनाशकारी भूकंपामुळे मोठ्या प्रमाणावर जीवित आणि मालमत्तेची हानी झाली आहे. आंतरराष्ट्रीय समुदाय या कठीण काळात म्यानमारच्या सोबत उभा राहून मदत पुरवित आहे. या आपत्तीमुळे संपूर्ण दक्षिण-आशियाई क्षेत्रात चिंता आणि सहानुभूतीचे वातावरण आहे. भारतासह अनेक देशांनी मदतीचे हात पुढे केले असून, बचाव आणि पुनर्वसन कार्ये वेगाने सुरू आहेत.
Myanmar Earthquake: Devastating 7.7 Magnitude Quake Strikes Myanmar on March 28, 2025
A powerful earthquake of magnitude 7.7 struck Myanmar on March 28, 2025, at 11:50 AM, causing widespread destruction across the country. The epicenter was located in central Myanmar, approximately 50 km east of Monywa city. Due to the earthquake, the 1,000-bed General Hospital in Myanmar’s capital, Naypyidaw, has been declared a ‘mass casualty area,’ where a large number of injured people are receiving treatment. Strong tremors were also felt in Bangkok, Thailand. A 30-story building collapsed in Thailand’s capital, leading to 10 deaths and damage to over 2,000 buildings.
Casualties and Emergency Response
In Myanmar earthquake has claimed 1,644 lives, with over 3,408 people injured. In response, the Myanmar government has declared an emergency in six regions and appealed for international humanitarian aid. Thailand has also declared an emergency, temporarily halting all commercial activities.
International Aid for Myanmar
India has launched ‘Operation Brahma’, deploying Indian Navy ships INS Satpura and INS Savitri with 40 tons of relief materials to Myanmar. Additionally, an 80-member NDRF (National Disaster Response Force) rescue team has been airlifted to Naypyidaw via a C-130 aircraft. India’s Prime Minister has assured Myanmar’s military government leader, General Min Aung Hlaing, of India’s full support.
Several other nations have also rushed aid to Myanmar. The European Union (EU) has sent an immediate relief fund of $2.7 million (₹23 crore). Russia has deployed 120 rescue personnel along with essential supplies on two aircraft. Meanwhile, China, Hong Kong, Singapore, and Malaysia have announced plans to send rescue teams.
Current Situation in Myanmar
A state of emergency remains in place across six states in Myanmar. Rescue operations are ongoing, and international aid is arriving. On March 29, at 3:30 PM, another earthquake of magnitude 5.1 struck the region, further spreading panic among the population.
The devastating earthquake has caused massive loss of life and property across Myanmar and its neighboring countries. The international community has stepped up relief efforts in this difficult time. Tremors were also felt in Bangladesh, causing panic in the capital, Dhaka, and the Yunnan province of China also experienced the earthquake’s effects. This disaster has raised concerns across South Asia, with many nations, including India, actively participating in rescue and rehabilitation efforts.