शिवसेना-शिंदे गट सत्ता संघर्षांचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज दिला. या निकलात खऱ्या शिवसेनेवर शिंदे गटाचाच हक्क आहे असा निर्णय देत राहुल नार्वेकर यांनी Eknath Shinde यांना शिवसेना तर उध्दव ठाकरे यांना धक्का दिला आहे.
आपल्या निकालाचं वाचन सुरु करण्याआधी राहुल नार्वेकर यांनी सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानले. सत्ता संघर्षाचा हा निकाल १२०० पानी आहे. त्यातले ठळक मुद्दे त्यांनी वाचून दाखवले. तसंच त्यांनी शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या वकिलांचेही आभार मानले.
शिवसेनेवर Eknath Shinde यांचाच हक्क: विधानसभा अध्यक्षांनी दिला निकाल
अडीच वर्षांपासून चाललेल्या या सत्ता संघर्षांवर आता पडदा पडतो की महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रात आणखी वादळे निर्माण होतील हे आता पाहणे महत्वाचं ठरणार आहे.
Eknath Shinde यांनी शिवसेनेत बंडखोरी करुन ३८ आमदार फोडले व भाजपबरोबर हातमिळवणी करुन मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले.यावर ठाकरे गटाने आक्षेप घेत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. ९ महिन्यांच्या सुनावणी नंतर सर्वोच्च न्यायालयाने हा खटला विधानसभा अध्यक्षांच्या कक्षेत पाठवला. विधानसभा अध्यक्षांनी अनेक वेळा वेळ मागत अखेर आज या खटल्याचा निकाल दिला आहे.
विधिमंडळ पक्ष हा Eknath Shinde यांच्या गटाचा असल्याने खरी शिवसेना ही शिंदे गटाचीच आहे असा निर्णय विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनी दिला.
उद्धव ठाकरेंचा पक्षप्रमुख म्हणून निर्णय अयोग्य
Eknath Shinde नी बंडखोरी केल्यानंतर ठाकरे गटाने बंडखोर आमदारांना व्हीप जारी केला होता. परंतु सर्व बंडखोर आमदारांनी या व्हीपचे पालन केलं नाही. या उलट शिंदे गटाने शिवसेनेवर हक्क सांगून भरत गोगावले यांची प्रदोत म्हणून नेमणूक केली व ठाकरे गटाच्या आमदारांना व्हीप जारी केला.
शिंदेच्या बंडखोरी नंतर उद्धव ठाकरेंनी पक्षप्रमुख या अधिकाराने
Eknath Shinde यांची शिवसेना पक्षातून हकालपट्टी केली आणि शिंदे गटाच्या आमदारांना व्हिपचं पालन न केल्यामुळे अपात्र करण्यासाठी याचिका दाखल केली.
उद्धव ठाकरे यांनी २०१८ मध्ये केलेली घटना दुरुस्ती ही अयोग्य होती, असं निरीक्षण राहुल नार्वेकर यांनी नोंदवलं. तसेच निवडणूक आयोगाकडे १९९९ मध्ये घटनेत केलेले बदल बरोबर आहेत. त्यामुळं त्यावेळची घटना वैध मानता येईल. पण २०१८ मध्ये करण्यात आलेले बदल वैध नाही, असं राहुल नार्वेकर म्हणाले.
विशेष म्हणजे राहुल नार्वेकर यांनी उद्धव ठाकरे यांना Eknath Shinde यांची पक्षातून हकालपट्टी करण्याचा अधिकार नाही, असं निरीक्षण नोंदवलं. हा निर्णय राष्ट्रीय कार्यकारिणीने घ्यायचा असतो. उद्धव ठाकरेंनी असा निर्णय घेणं हे लोकशाहीला घातक असल्याचंही ते म्हणाले.
विधिमंडळ पक्षाने प्रदोत म्हणून केलेली भरत गोगवले यांची निवड रीतसर आहे व भरत यांनी जारी केलेला व्हीपच योग्य आहे असा निकाल विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनी दिला.
याच बरोबर राहुल नार्वेकर यांनी उद्धव ठाकरे गट आणि Eknath Shinde गट यांच्या एकमेकांना अपात्र ठरवण्याच्या याचिका फेटाळून लावल्या. यामुळे दोन्ही गटांचे आमदार हे पात्र ठरले आहेत. आमदार अपात्रतेच्या मुद्द्यावर दोन्ही बाजूकडील आमदारांना दिलासा दिला आहे.
सत्ता संघर्षाच्या या निकालावर प्रतिक्रिया
उद्धव ठाकरे
निर्णय देताना त्यांचा पायाच चुकलेला आहे. निर्लज्जपणाचा कळस त्यांनी गाठलेला आहे.नार्वेकरांनी सर्वोच्च न्यायालयाचा अपमान केला आहे.
शिवसेना ही शिंदेंची होऊच शकत नाही. निकालाची मॅच ही फिक्स होती.आम्ही आमची लढाई सर्वोच्च न्यायालयात लढणार आहोत.
आजही त्यांच्यात हिंमत नाही, ते स्वतःच्या ताकदीवर मतं मागू शकत नाहीत; म्हणून त्यांना माझा पक्ष आणि वडिलांचा चेहरा लागतो.
पक्षांतर कायदा मजबूत करण्याऐवजी; पक्षांतर कसं करावं अथवा पक्षांतराचा राजमार्ग कसा असायला पाहिजे, हे त्यांनी आज दाखवून दिलं!
संजय राऊत
आजचा निकाल हा विधानसभा अध्यक्षांनी दिल्लीच्या इशाऱ्यावर दिलेला आहे. गुजराती लॉबीच मुंबईमधून शिवसेना संपवण्याच स्वप्न पुर्ण करण्याच काम पदावर बसलेल्या एका मराठी माणसानं केलं आहे.
आदित्य ठाकरे
हा निकाल म्हणजे ह्या ट्रिब्युनलच्या निर्लज्जपणाचा कळस आहे. भाजप प्रणित गद्दारांची राजवट डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या राज्यघटनेच्या विरोधात असल्याचे उघड आहे.
लोकशाही संपवण्यासाठी त्यांना राज्यघटना पुन्हा लिहायची आहे.आज ह्या निकालाने आपल्या राज्यातील लोकशाही आणि राज्यघटनेच्या तत्त्वांचा आणि स्तंभांचा अधिकृतपणे खून केला आहे.
लोकशाही पुन्हा स्थापित करण्यासाठी आणि डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या देशाच्या संविधानाच्या रक्षणासाठी आम्ही लढा देऊ. हा निकाल फक्त शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्यांच्याबद्दल नव्हता.
हे आपल्या देशाच्या संविधानाबद्दल आणि लोकशाहीबद्दल आहे. आम्हाला आशा आहे की माननीय सर्वोच्च न्यायालय ह्या लांच्छनास्पद राजकीय खेळापासून संविधान आणि लोकशाहीचे संरक्षण करेल…!
शरद पवार
विधानसभा अध्यक्षांनी निकाल दिल्यानंतर उद्धव ठाकरेंना कोर्टात जावं लागेल असे मत शरद पवार यांनी व्यक्त केलं.
निकालाबाबत सत्ताधाऱ्यांनी आधीच भाष्य केलं होत. या निकालात विधिमंडळ पक्षाला महत्व देण्यात आले. विधिमंडळ पक्षाला कुठलाही अधिकार नसतो. मात्र शिंदे गटाकडून दिलेला व्हीप हा विधिमंडळ पक्षाकडून दिला गेलेला व्हीप आहे.
विधानसभा अध्यक्षांनी एकही गटाच्या आमदारांना अपात्र केलं नाही. उद्धव ठाकरेंना सर्वोच्च न्यायालयात न्याय मिळू शकतो. शिवसेना कुणी स्थापन केली होती हे लोकांना माहिती आहे.