वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या विश्वचषक स्पर्धेतील India Vs Newzealand या पहिल्या उपांत्य फेरीतील सामन्यात भारताने न्युझीलंडला ७० धावांनी हरवून अंतिम फेरीमध्ये दणदणीत प्रवेश केला. २०१९ विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात न्युझीलंडने भारताच्या केलेल्या पराभवाचा वचपा team इंडिया ने काढला आहे.
भारताने प्रथम फलंदाजी करताना न्युझीलंड समोर ५० षटकांमध्ये ३९७ धावांचे लक्ष ठेवले. या विशाल लक्षाचा पाठलाग करताना न्युझीलंड चा संघ फक्त ३२७ धावाच बनवू शकला व भारताने हा सामना ७० धावांनी जिंकून विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.
भारताने १२ वर्षांनंतर विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक दिली आहे. तसेच ही भारताची एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पोहोचण्याची ४ थी वेळ आहे. विराट कोहली श्रेयस अय्यर व मोहम्मद शमी हे या विजयाचे शिल्पकार ठरले आहेत.
India Vs Newzealand सामन्याची काही ठळक वैशिष्ट्ये
रोहित शर्माची झटपट फलंदाजी
भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय फलंदाजांनी एकदम वेगवान सुरुवात केली. रोहित शर्मा झटपट ४७ धावा बनवून बाद झाला त्यानंतर विराट कोहली आणि शुभमन गिल यांनी फलंदाजीची सूत्रे हातात घेऊन धावफलक हलता ठेवला.
किंग कोहली चे ५० वे विश्वविक्रमी शतक
किंग कोहली ने आपले एकदिवसीय कारकिर्दीतले पन्नासावे शतक झळकावत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा ४९ शतकांचा विश्वविक्रम मोडीत काढला. विराटने ११३ चेंडू मध्ये ११७ धावा बनवल्या.
श्रेयस अय्यरची वेगवान शतकी खेळी
श्रेयस अय्यरने आक्रमक आणि वेगवान खेळी करत ७० चेंडू मध्ये १०५ धावा काढल्या. श्रेयस अय्यरने या विश्वचषकात सलग दुसऱ्या सामन्यात शतक झळकावले. या आधीच्या नेदरलँड विरुद्धच्या सामन्यात त्याने शतक झळकावले होते.
शुभमन गिल आणि के एल राहुल चे योगदान
शुभमन गिलने नाबाद ८० धावा तर के एल राहुल ने नाबाद ३९ धावा बनवल्या व भारताची धावसंख्या ३५० पार नेण्यास मदत केली.अशाप्रकारे भारताने ५० षटकांमध्ये चार बाद ३९७ धावांचा डोंगर उभा केला.
शमीची ७ स्टार गोलंदाजी
भारताकडून मोहम्मद शमी ने सर्वाधिक ७ विकेट्स घेतल्या तर जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराझ आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी एक एक गडी बाद केले. मोहम्मद शमी ने या विश्वचषकात सर्वाधिक २२ विकेट्स घेतल्या आहेत. विश्वचषकात चार वेळा ५ गडी बाद करणारा पहिला गोलंदाज ठरला आहे.
India Vs Newzealand: न्यूझीलंडचे शर्थीचे प्रयत्न पडले अपुरे
अपयशी ठरली सलामी जोडी
न्यूझीलंडचे सलामी चे फलंदाज डेवेन कॉन्वे आणि रचिन रवींद्र हे आल्यापासूनच दडपणा खाली खेळताना दिसले. या दोघांनाही मोहम्मद शमीने स्वस्तातच बाद केले. न्यूझीलंडचे त्यावेळी धावसंख्या होती २ बाद २६ धावा.
कर्णधार विल्यमसन व डेरिल मिशेल ची दमदार भागीदारी
त्यानंतर फलंदाजीला आलेल्या डेरिल मिशेल आणि कर्णधार केन विल्यमसन यांनी सावध खेळी करत न्यूझीलंडच्या डावाची पडझड थांबवली. या दोघांनी मिळून १४९ चेंडूमध्ये १८१ धावांची भागीदारी करत डाव सावरला. तिसऱ्या विकेट साठी या दोघांनी भारतीय गोलंदाजांना बराच वेळ झुंजवले.
झटपट २ विकेट्स
कर्णधार केन विल्यमसन ६९ धावांवर खेळत असताना मोहम्मद शमी ने त्याला बाद केले. शमीला षटकार मारण्याचा नादात सूर्यकुमार यादव ने त्याचा झेल टिपला. पुढच्याच चेंडूवर मोहम्मद शमी ने फलंदाजीला आलेल्या टीम लेथम ला बाद केले.
मिशेल ची शतकी खेळी व्यर्थ
डेरेल मिशेल आणि ग्लेन फिलिप्स यांनी थोड्या प्रमाणात डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला. मिशेल एका बाजूने डाव सावरण्याचा प्रयत्न करत होता परंतु दुसऱ्या टोकाकडून एका पाठोपाठ फलंदाज बाद होत होते. मिशेल ने ११९ चेंडू मध्ये १३९ धावा बनवल्या. मिशेलचे भारता विरुध्द सलग दुसरे शतक आहे. भारतीय गोलंदाजी समोर झालेली डावाची पडझड न्यूझीलंड चे फलंदाज रोखू शकले नाहीत. पाठोपाठ एक असे न्यूझीलंडचा संपूर्ण डाव ३२७ धावांवर संपुष्टात आला.
सुमार गोलंदाजी
न्युझीलंड चे गोलंदाज सुद्धा फारशी चमक दाखवू शकले नाहीत. भारतीय फलंदाजांनी न्यूझीलंडच्या गोलंदाजीची एकदम पिसे काढली व ३९७ धावांचा डोंगर उभा केला. न्यूझीलंड कडून टीम साउदीने तीन तर ट्रेंट बोल्ट ने एक विकेट घेतली.
Way ahead
India Vs Newzealand सामन्यातील विजयासह टीम इंडियाने अंतिम फेरीत धडक दिली आहे. अंतिम फेरीत टीम इंडियाचा सामना ऑस्ट्रेलिया विरूध्द साऊथ आफ्रिका यांच्यातील विजेत्या संघाबरोबर अहमदाबाद येथे १९ नोव्हेंबर रोजी होणार आहे. ही भारतासाठी विश्र्वचषक जिंकण्याची सुवर्णसंधी आहे. सर्व भारतीय चाहते या क्षणाची आतुरतेने वाट पाहत आहेत.