Rohit sharma : हिटमॅन ऑफ द टीम इंडिया

Rohit Sharma Rohit Sharma

रो-हिटमॅन

Rohit Sharma चा जन्म ३० एप्रिल १९८७ रोजी नागपूर येथे झाला. रोहित शर्माचे वडील गुरुनाथ शर्मा तर आई पौर्णिमा शर्मा या विशाखापट्टणम येथील आहेत. त्यांची मातृभाषा तेलुगू आहे. रोहित शर्मा भारतीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघाचा एकदिवसीय, टी-२०, कसोटी क्रिकेट तसेच आयपीएलमध्ये तो मुंबई इंडियन्स संघाकडून खेळतो. तीनही फॉरमॅट मध्ये तो भारतीय संघाचा कर्णधार आहे.

रोहितचे बालपण मुंबईमध्ये त्याच्या आजोबा आणि काकांकडे गेले. आपल्या काकांच्या मदतीने त्याने १९९९ मध्ये एक क्रिकेट अकादमी मध्ये खेळण्यास सुरूवात केली. तेथे त्याचे प्रशिक्षक दिनेश लाड हे होते.

रोहितने आपल्या कारकिर्दीची सुरूवात एक ऑफस्पिनर म्हणुन केली होती. परंतु दिनेश लाड यांनी त्याची फलंदाजीची कुवत ओळखुन त्याला फलंदाजीवर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला. त्यांनतर रोहितने फलंदाज म्हणुन खेळायला सुरुवात केली.

रोहित सुरुवातीला आठव्या क्रमांकावर फलंदाजी करायचा. दिनेश लाड यांनी त्याला सलामीला खेळण्यास पाठवायला सुरुवात केली. रोहितने जसे फलंदाजीत पदार्पण केले, त्याने आपल्या पदार्पणाच्या सामन्यातच शतक झळकावले.

Rohit Sharma ची कारकिर्द

घरगुती क्रिकेट

२००५ साली रोहितने ग्वालियर येथे देवधर ट्रॉफी मधून घरगुती क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. त्या स्पर्धेत रोहितने शानदार कामगिरी केली. त्यांनतर रोहितने रणजी ट्रॉफी, प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये खेळावयास सुरुवात केली. रणजीमध्ये मुंबईसाठी खेळला. २००६ साली रणजी मध्ये त्याने गुजरात विरूद्धच्या सामन्यांत २६५ चेंडूत २०५ धावा काढल्या होत्या. तर बंगाल विरुध्दच्या अंतिम सामन्यात त्याच्या अर्धशतकाच्या जोरावर मुंबई सामन्यात आव्हान टिकवून ठेवू शकली होती.

Rohit Sharma ची कसोटी क्रिकेट कारकीर्द


रोहितने आपल्या कसोटी कारकिर्दीची सुरुवात ९ नोव्हेंबर २०१३ रोजी कोलकात्याच्या ईडन गार्डन मैदानावर वेस्ट इंडीज क्रिकेट विरुद्ध केली होती. त्या सामन्यात त्याने १७७ धावा काढल्या. पदार्पणाच्या सामन्यात शतक झळकावणारा तो दुसरा भारतीय फलंदाज ठरला.

ऑक्टोबर २०१९ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात रोहित शर्माने कसोटीतील पहिले द्विशतक झळकावले. बरोबरच रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधील २००० धावाही पूर्ण केल्या. या सामन्याच्या पाहिल्या डावात शर्माने २१२ धावांची खेळी खेळली. २०२० मध्ये शर्माची भारतीय कसोटी संघाच्या उपकर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली.

४ सप्टेंबर २०२१ मध्ये ओव्हल येथे इंग्लंडविरुद्ध १२७ धावांची खेळी शर्माने केली. या खेळीसह परदेशातील पहिले कसोटी शतक त्याने झळकावले. कसोटी क्रिकेट मधील ३००० धावांचा टप्पा त्याने गाठला. फेब्रुवारी २०२२ मध्ये रोहित शर्माची भारताच्या कसोटी संघाचा कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली.

एका कसोटी मालिकेत त्याने सर्वाधिक षटकार ठोकण्याचा वेस्ट इंडीजचा फलंदाज शिमरोन हेटमायरचा विक्रम मोडला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये रोहितने ५२ सामन्यांत ४७ च्या सरासरीने ३६७७ धावा काढल्या आहेत ज्यामध्ये १० शतके आणि १६ अर्ध शतकांचा समावेश आहे.

Rohit Sharma ची एकदिवसीय क्रिकेट कारकीर्द

२००७ साली आयर्लंड विरुद्ध रोहितने आपल्या एकदिवसीय क्रिकेट कारकिर्दीची सुरूवात केली. रोहितने आपले एकदिवसीय अर्धशतक पाकिस्तान विरूद्धच्या सामन्यात झळकावले. त्याने आपले पहिले शतक २०१० साली झिंबॉम्बे विरूद्धच्या सामन्यात केले. याच वर्षी रोहितने कोलकत्याच्या ईडन गार्डन्स मैदानावर श्रीलंके विरुद्धच्या सामन्यात त्याने २६४ धावा बनवून एक विश्वविक्रम नोंदवला.

एका सामन्यात २५० पेक्षा जास्त धावा काढणारा तो जगातली पाहिला फलंदाज ठरला. या सामन्यात त्याने भारताचा पूर्व क्रिकेटर वीरेंद्र सेहवागचा २१९ धावांचा रेकॉर्ड मोडला. २०११ च्या विश्वचषकापूर्वी दक्षिण आफ्रिकेतील खराब कामगिरीमुळे त्याला या स्पर्धेसाठी भारताच्या संघातून वगळण्यात आले होते.

त्याने २०१३ साली रोहित शर्माने ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीतील पहिले द्विशतक ठोकले. रोहित शर्माने या सामन्यात १५८ चेंडूत १२ चौकरासह १६ षटकारांचा मारा केला होता. त्याने ऑस्ट्रेलियाच्या शेन वॉटसनच्या १५ षटकारांचा विक्रम मोडीत काढला. एम चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात रोहित शर्माने २०९ धावा काढल्या. याच दिवशी रोहित शर्माला ‘हिटमॅन‘ हे नाव मिळाले.

एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये तीन द्विशतके करणारा रोहित शर्मा हा एकमेव खेळाडू आहे. तसेच ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात सर्वात जलद ४००० धावा पूर्ण करणारा तो पाहिला भारतीय खेळाडू आहे. असे बरेचसे विक्रम रोहितच्या नावे आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर २९ शतके आणि ५५ अर्धशतके आहेत.

डिसेंबर २०२१ मध्ये Rohit Sharma ची भारतीय क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली. रोहित शर्मा एक सलामीचा फलंदाज म्हणून क्रिकेट मध्ये खेळतो. त्याची आक्रमक फलंदाजीची शैली आणि षटकार मारण्याची क्षमता यामुळे त्याला हिटमॅन ही ओळख मिळाली.

रोहित शर्माची टी-२० क्रिकेटमधील कारकीर्द


Rohit Sharma ला २००७ च्या टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघात स्थान देण्यात आले. त्याने उपांत्यपूर्व फेरीत यजमान दक्षिण आफ्रिकाविरुद्ध ४० चेंडूत नाबाद ५० धावा केल्या.यामुळे भारताला हा सामना ३७ धावांनी जिंकता आला.

२ ऑक्टोंबर २०१५ मध्ये भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यात धर्मशाळा येथील एचपीसीए स्टेडियमवर झालेल्या पहिल्या टी-२० आतंरराष्ट्रीय सामन्यात शर्माने १०६ धावा केल्या. आंतरराष्ट्रीय क्रिकेट च्या तिन्ही फॉरमॅट मध्ये शतके झळकावणारा तो दुसरा भारतीय क्रिकेटपटू ठरला.

डिसेंबर २०१७ मध्ये श्रीलंकेविरुद्धच्या टी-२० मालिकेत रोहित शर्माने ३५ चेंडूत जलद शतक झळकावले. हे त्याचे टी-२० मधील दुसरे शतक ठरले. ४३ चेंडूत ११८ वेगवान धावांचा काढून त्याने डेव्हिड मिलर च्या विक्रमाची बरोबरी केली.

जुलै २०१८ मध्ये इंग्लंडमधील मालिके दरम्यान त्याने २००० धावांचा टप्पा पार केला. टी-२० आतंरराष्ट्रीय कारकीर्दीत विराट कोहलीनंतर ही कामगिरी करणारा तो दुसरा भारतीय फलंदाज ठरला. अशी कामगिरी करणारा तो जगातील पाचवा फलंदाज आहे. या मालिकेत शर्माने आपले तिसरे टी-२० शतक सुध्दा झळकावले आणि कॉलिन मुनरोच्या सर्वाधिक टी-२० शतकाच्या विक्रमाची बरोबरी केली.

नोव्हेंबर २०१८ मध्ये वेस्ट इंडीज विरुद्ध मालिकेत शर्माने चौथे टी-२० शतक झळकावून सर्वाधिक शतकांचा विक्रम केला.
ऑक्टोंबर २०२२ मध्ये रोहित शर्माने सिडनी मध्ये नेदरलँडविरुध्द ३४ वा षटकार मारून त्याने युवराज सिंगच्या नावावर असलेला टी-२० मधील सर्वाधिक षटकार ठोकण्याचा विक्रम मोडला.

Rohit Sharma ने २०१७ साली सर्वप्रथम भारतीय टी-२० संघाचे नेतृत्व केले. त्यांनतर रोहितच्या नेतृत्वात खेळलेले सर्व टी-२० सामने भारताने जिंकले आहेत. जुलै २०२२ मध्ये रोहित इंग्लंडमध्ये टी-२० आणि एकदिवसीय मालिका जिंकणारा पाहिला भारतीय कर्णधार आहे. Rohit Sharma ने टी-२० मध्ये ४ शतके तर २९ अर्धशतके झळकावली आहेत.

Rohit Sharma ची इंडियन प्रीमियर लीग कारकिर्द

२००८ मध्ये इंडियन प्रीमियर लीगची सुरुवात झाली,तेव्हापासून रोहित शर्मा आयपीएल खेळत आहे. सुरुवातीला रोहित शर्मा डेक्कन चार्जर्स संघाचा खेळाडू होता. २०१३ साली त्याला मुंबई इंडियन्स संघाने करारबद्ध केले. तेव्हापासून तो मुंबई इंडियन्स संघाचे नेतृत्व करत आहे. आयपीएल मधील सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून ओळखला जातो.

२०१२ च्या कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध १०९ धावा करून आयपीएल मधील त्याचे एकमेव शतक झळकावले. २०१३ पासून तो आयपीएल मधील एक यशस्वी खेळाडू आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्स संघाने आतापर्यंत ५ वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. मुंबई इंडियन्स २०१३,२०१५,२०१७, २०१९ आणि २०२० च्या आयपीएल चा चॅम्पियन संघ आहे.

२०२३ च्या आयपीएल मधील २५ व्या सामन्यांत रोहित शर्मा सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यांत ६००० धावांचा टप्पा पूर्ण करणारा चौथा खेळाडू ठरला. रोहित शर्माच्या आधी ही कामगिरी विराट कोहली,शिखर धवन आणि डेव्हिड वॉर्नर यांनी केली आहे. आयपीएल मधील सर्वाधिक वेळा म्हणजे तब्बल १८ वेळा’मॅन ऑफ द मॅच’ पुरस्कार रोहित शर्माने जिंकला आहे. आयपीएल मध्ये त्याचा ४ शतके तर ४२ अर्धशतकांचा विक्रम त्याच्या नावावर आहे.

हिटमॅन चे विक्रम

Rohit Sharma एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज ठरला आहे. एबी डिव्हिलियर्सला त्याने मागे टाकले आहे. सोबतच रोहितने कर्णधार म्हणून एका वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम केला आहे. त्याने याबाबतीत इंग्लंडच्या इयॉन मॉर्गनला मागे टाकले.

एकदिवसीय क्रिकेटमध्ये तीन द्विशतकांचा विश्वविक्रम रोहितच्या नावे आहे. अशी कामगिरी करणारा तो जगातील पाहिला फलंदाज ठरला आहे.

एकदिवसीय क्रिकेटमध्ये एकाच सामन्यात सर्वाधिक षटकार मारण्याचा विश्वविक्रम रोहितच्या नावावर आहे. ऑस्ट्रेलियन फलंदाज शेन वॉटसनचा १५ षटकारांचा विक्रम त्याने मोडीत काढला आहे.

ऑस्ट्रेलियामध्ये जाऊन ऑस्ट्रेलियन संघाविरुद्ध १७१ धावा बनवून सर्वाधिक जास्त धावा बनवणारा फलंदाज ठरला आहे. त्याने वेस्ट इंडीजचे महान फलंदाज सर विवियन रिचर्ड्स यांच्या १५३ धावांचा विक्रम मोडीत काढला.

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाच्या विरूध्द सर्वाधिक ५० षटकार मारणारा तो पाहिला फलंदाज ठरला आहे.

Rohit शर्माला मिळालेले पुरस्कार

२०१५ मध्ये रोहित शर्माला भारत सरकारद्वारे’अर्जुन पुरस्कार’ देण्यात आला.

एकदिवसीय क्रिकेटमध्ये दोन द्विशतक झळकविले म्हणून ESPN द्वारा २०१३ आणि २०१४ मध्ये सर्वोत्कृष्ट वनडे फलंदाज म्हणून गौरविले गेले.

२०१५ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरूध्द टी-२० सामन्यामध्ये शतक झळकावले यासाठी ESPN चा सर्वोत्कृष्ट फलंदाजांचा पुरस्कार.

२०१९ मध्ये आयसीसी क्रिकेट विश्वचषक मध्ये सर्वाधिक धावा केल्याबद्दल’गोल्डन बॅट’पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

२०२० मध्ये सर्वोच्च क्रीडा सन्मान ‘राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.

रोहित शर्मा Ro, Brothman, Hitman, Ro-Hit या नावाने ओळखला जातो.

FAQ

१) Rohit Sharma आयपीएल मध्ये कोणत्या संघाकडून खेळतो?
– रोहित शर्मा आयपीएल मध्ये ‘मुंबई इंडियन्स’ या संघाकडून खेळतो.

२) रोहित शर्माने आयपीएल मध्ये किती वेळा विजेतेपद जिंकले आहेत?
– रोहित शर्माने आयपीएल मध्ये एकूण ५ वेळा विजेतेपद जिंकले आहेत. (२०१३,२०१५,२०१७,२०१९ आणि २०२०)

३) रोहित शर्माचे पूर्ण नाव काय आहे?
– रोहित शर्माचे पूर्ण नाव रोहित गुरुनाथ शर्मा आहे.

४) रोहित शर्माचा जन्म कुठे झाला?
– रोहित शर्माचा जन्म एप्रिल ३०,१९८७ रोजी नागपूर येथे झाला.

५) Rohit Sharma कोणत्या नावाने ओळखला जातो?
– Rohit Sharma ‘हिटमॅन’ या नावाने ओळखला जातो.

2 thoughts on “Rohit sharma : हिटमॅन ऑफ द टीम इंडिया”

Leave a Comment

Exit mobile version