Israel Pallestine संघर्ष : गरज मानवता युद्धविरामाची

Israel Pallestin संघर्षाचा इतिहास

Israel Pallestine संघर्षाचा ठिणगीला अनेक वर्षांचा इतिहास आहे. यांच्यातील वाद हा एक जटील आणि दीर्घकालीन वाद आहे. पहिल्या महायुद्धात मध्यपूर्वेतील ऑटोमन साम्राज्याचा पराभव झाला. पॅलेस्टाईनचा प्रदेश ऑटोमन साम्राज्याने सोडून दिला आणि तो लीग ऑफ नेशन्सच्या आदेशाद्वारे ब्रिटिशांच्या ताब्यात आला.

Israel Pallestine वाद

संयुक्त राष्ट्राने १९४७ मध्ये पॅलेस्टाईनची विभागणी प्रस्तावित केली. यानुसार पॅलेस्टाईनच्या प्रदेशात दोन स्वतंत्र राज्य स्थापन झाली. एक निळा रंग असलेला इस्रायल आणि दुसरा हिरवा रंग असलेला पॅलेस्टाईन म्हणजेच एक ज्यूच राज्य आणि एक अरब राज्य यांची स्थापना झाली.

पहिल्या महायुद्धानंतर मोठ्या प्रमाणावर स्थलांतर होऊन लागले. ऑटोमन साम्राज्यात ज्यूची लोकसंख्या वाढली. काही वर्षांनी युरोपमध्ये ज्यूचा मोठ्या प्रमाणात छळ होऊ लागल्यामुळे त्यांनी तेथून पळ काढला. ज्यूंची समस्या कठीण बनली होती.

दुसऱ्या महायुद्धानंतर, १९४८ मध्ये अस्तित्वात आलेल्या संयुक्त राष्ट्र संघटनेकडे हा मुद्दा मांडण्यात आला. ज्यूंची जास्त लोकसंख्या असलेला भाग इस्रायल ला तर अरबांना पॅलेस्टाईन भाग देण्यात आला. यावेळी जेरुसलेंमचा मुद्दा उद्भवला. कारण इथे ज्यू आणि मुस्लिम लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर होती. या भागावर आंतरराष्ट्रीय नियंत्रण ठेवण्यात आले.

अरब इस्रायल युद्ध

संयुक्त राष्ट्र संघाच्या घोषणेनंतर लगेचच अरब इस्रायल युद्ध सुरू झाले. अरब राष्ट्रांनी इस्रायल वर हल्ला केला. या युद्धात नव्याने जन्म घेतलेल्या इस्रायल ने अरब राष्ट्रांना पराभूत केले. इस्रायलने पॅलेस्टाईनच्या जवळजवळ सर्व प्रदेशांवर ताबा मिळविला. १९४७ ला मिळालेल्या जागेपेक्षा जास्त प्रदेश इस्रायलकडे आला.

जून वॉर

५ जून १९६७ मध्ये इस्रायल आणि त्याचे शेजारी अरब राष्ट्र यांच्यात ५ जून ते १० जून असे सहा दिवसांचे युद्ध झाले. या युद्धाला ‘जून वॉर’ या नावाने देखील ओळखले जाते. इस्रायल सैन्याने या युद्धानंतर सिनाई द्वीपकल्प, वेस्ट बँक, पूर्व जेरुसलेम आणि गाझा तसेच पॅलेस्टिनी अरब प्रदेश प्रदेश ताब्यात घेतला. गोलान राईट्सचा सिरीयल प्रदेश ताब्यात घेतला.

योम किप्पूर युद्ध-१९७३

योम किप्पूर युद्धाला रमजान युद्ध म्हणून देखील ओळखले जाते. हे युद्ध ६-२५ ऑक्टोबर १९७३ दरम्यान लढले गेले. इस्रायल विरुद्ध इजिप्त व सीरिया यांच्यामध्ये हे युद्ध झाले. या युद्धाला चौथे अरब – इस्रायल युद्ध असेही म्हणतात. या युद्धात अमेरिकेचे इस्रायल ला तर इजिप्त- सिरियाला सोवियत युनियनचे पाठबळ होते. या दोन महासत्ता असलेल्या देशांनी या संघर्षात सहभाग घेतल्यामुळे तणाव वाढला होता. संयुक्त राष्ट्र संघाने हस्तक्षेप करून हे युद्ध थांबवण्याची घोषणा केली होती.

१९७८ चा कॅम्प डेव्हिड करार

१७ सप्टेंबर १९७८ मध्ये इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अन्वर सादात आणि इस्रायलचे पंतप्रधान मेनाकेम बिगीन यांच्यात करार झाला. यासाठी सादात आणि बिगिन यांना सामायिक १९७८ चा नोबेल शांतता पुरस्कार देण्यात आला. पण इजिप्तने इस्रायल ला मान्यता देणे हा वादग्रस्त निर्णय होता. इजिप्तच्या या निर्णयामुळे त्यांच्या राष्ट्रपतींची हत्या करण्यात आली.

पॅलेस्टाईन स्वातंत्र्य संघटना (पी एल ओ)

अरब राष्ट्रांसमोर हार न मानलेल्या इस्रायल वर आता पॅलेस्टाईन स्वातंत्र्य संघटनेने दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. पॅलेस्टाईनने इस्रायल वर अनेक हल्ले केले. तर त्याला प्रत्युत्तर इस्रायलने दिले. हा संघर्ष जवळ जवळ १९८७ ते १९९३ या दरम्यान चालू राहिला. या दरम्यान हमास या संघटनेचा उदय झाला. पी एल ओ आपल्या हक्कांसाठी लढत होती तर हमासचा इस्रायलच्या निर्मितीला तीव्र विरोध होता.

गाझा पट्टी

इस्रायल ने १९६७ मध्ये गाझा आपल्या ताब्यात घेतला होता. तो २००५ पर्यंत इस्रायल ताब्यात होता. याच काळात येथे ज्यूंच्या अनेक वसाहती उभारल्या गेल्या. इस्रायल ने २००५ मध्ये गाझा मधून आपले सैन्य आणि व वसाहती माघारी घेतल्या. हमास या संघटनेने २००६ मध्ये पॅलेस्टाईन मध्ये निवडणुका जिंकून गाझावर ताबा मिळविला. तेव्हापासून हमास आणि इस्रायल मध्ये अनेक युद्ध झाले आहेत.

Israel Pallestine Israel Pallestine

Israel Pallestine संघर्षाची सद्य परस्थिती

हमास चा इस्रायल वर हमला

७ ऑक्टोंबर २०२३ रोजी सकाळी हमास या दहशतवादी संघटनेने इस्रायलवर ५००० rockets डागून भीषण असा हल्ला केला. इजिप्त आणि सिरियाने ६ ऑक्टोंबर १९७३ रोजी इस्रायलवर हल्ला केला होता.हा हल्ला योम किप्पूर या ज्यू सणाच्या दिवशी झाला होता. या हल्ल्याला बरोबर ५० वर्षे पूर्ण झाली.७ ऑक्टोबर २०२३ रोजी शनिवारी सकाळी इस्रायल बेसावध असताना हमास ने हल्ला केला. यावेळी इस्रायली नागरिक योम किप्पूर हा ज्यू सण साजरा करत होते.

पॅलेस्टाईन दहशतवादी संघटना हमासने गाझापट्टीतून दक्षिण इस्रायलवर हल्ला केला.यावेळी हमासने हजारो रॉकेट इस्रायलवर डागले. तर दुसरीकडे इस्रायल मध्ये घुसखोरी केलेल्या दहशतवाद्यांनी इस्रायलमध्ये सुरू असलेल्या संगीत महोत्सवात गोळीबार करून अनेकांचे प्राण घेतले.या हल्ल्यात अनेक इस्रायली नागरिक आणि सैनिक मारले गेले.तर इस्रायली आणि परदेशी नागरिकांना गाझापट्टीत बंदीवान करून नेण्यात आले.

इस्रायल चे प्रत्तुत्यर

पॅलेस्टाईन दहशतवादी संघटनेने बेसावध इस्रायलवर हल्ला केल्यानंतर इस्रायल ने देखील त्याला जशास तसे प्रत्युत्तर दिले. इस्रायल ने गाझापट्टीवर हवाई हल्ले केले .त्यात मोठ्या प्रमाणावर पॅलेस्टिनी मारले गेले आहेत. इस्रायल ने गाझापट्टीवर आपले सैनिक वाढविले.तसेच इस्रायल ने गाझामध्ये अन्न,इंधन आणि जीवनावश्यक वस्तू मिळू नयेत म्हणून संपूर्ण नाकाबंदी केली आहे. गाझा मधील वीज पुरवठा खंडित केला आहे. इस्रायली सैनिकांनी हमासची अनेक ठिकाणे उध्वस्त केली.

Israel Pallestine संघर्षांची कारणे

Israel Pallestine संघर्ष खूप दिवसांपासून चालू आहे. यांच्यातील तणाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. सध्याचा सुरू झालेला हा वाद रमजान महिन्यातील आहे. जेरुसलेमच्या जुन्या शहरातील अल अक्सा मशिदीच्या आवारात काही ज्यूनी प्रार्थना केली. इस्लाम धर्मियांचे तिसरे पवित्र स्थान आहे. ही मशीद मुस्लिम आणि ज्यू दोघांसाठी पवित्र आहे. काही ज्यूनी अल अक्साच्या आवारात प्रार्थना केली. अल-अक्साच्या आवारात ज्यूना प्रार्थना करण्याची परवानगी नाही.

मागील काही वर्षात इस्रायली राष्ट्रवादी व धार्मिक नेत्यांनी अल अक्सा माशिदीला भेटी दिल्या. हमासने  त्याचा निषेध केला. त्यामुळे हमास आणि इस्लामिक जिहाद ने इस्रायल वर हल्ला केला असावा अशी शक्यता आहे.

जगातली बहुतांश युद्धे ही वैयक्तिक महत्वकांक्षेपायी लढली गेली आहेत. याला राज्यकर्त्यांच्या महत्वकांक्षा कारणीभूत ठरल्या आहेत. Israel Pallestine संघर्षाला देखिल हे एक कारण असू शकते.

Israel Pallestine युद्धाचे सामान्य जनतेवरील परिणाम

Israel Palestine यांच्यातील भीषण युद्धामुळे दोन्ही बाजूकडील हजारो लाखो लोकांचे जीवन उद्ध्वस्त झाले आहे. लोक बेघर झाले आहेत. कुटंबच्या कुटुंब मृत्युमुखी पडली आहेत. हजारो लहान मुले, अबालवृद्ध, महिला पुरुष मृत्यूमुखी पडले आहेत.

अन्न, पाणी, औषधे अशा अतिशय गरजेच्या गोष्टींसाठी लोकांनां वणवण करावी लागत आहे. इस्रायल ने गाझा पट्टीत अन्न पाणी इंधन अशा गोष्टींची नाकेबंदी केली असल्याने तेथील नागरिकांचे अतोनात हाल होत आहेत.

Israel Pallestine युध्दात विशेषत लहान मुले खुप प्रभावित झालेली आहेत. या युद्धाचे silent victims म्हणजे ही लहान निष्पाप मुले आहेत.

दुनियेच्या नजरेतून Israel Pallestine संघर्ष

Israel Pallestine संघर्षावर संपूर्ण जगातील बहुतांश देश हे इस्रायल व पॅलेस्टाईन मध्ये झालेल्या नरसंहराचा निषेध करताना दिसत आहेत. युनायटेड नेशन्स ने युद्धविरामासाठी इस्रायलकडे अपील केलेली आहे. परंतु अजूनही हा युद्ध विराम अमलांत आणला गेलेला नाही.

Israel Pallestine युद्धात दररोज हजारो लोक नाहक मृत्यूमुखी पडत आहेत, जखमी होत आहेत. निष्पाप मुलांचा बळी जात आहे. सामान्य जनता या संघर्षात होरपळून जात आहे. अन्न पाणी, उपचारांवाचून जनतेचे अतोनात हाल होत आहे. मानवतेच्या दृष्टीने हा सर्व संहार लवकरात लवकर थांबवला जायला हवा. सर्वोतोपरी प्रयत्न होऊन मानवता युद्धविराम हा लवकरात लवकर घडून यायला हवा.

You may also Like

Leave a Comment

Exit mobile version